शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

  • एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
  • बिटकॉइन घोटाळ्यातील ऑडिओ क्लिपमध्ये आवाज सुप्रिया सुळे आणि पटोलेंचाच; अजित पवारांचा दावा
  • पुणे जिल्ह्यात दुपारी १ वाजेपर्यंत २९.०३ टक्के मतदान.
  • गडचिराेली - मुलचेरा तालुक्यात १११ वर्षांच्या आजीने प्रत्यक्ष बुथवर जाऊन केले मतदान
  • केदार दिघेंवर पैसे वाटप केल्याचा शिंदे गटाचा आरोप, पोलिसांत गुन्हा दाखल
  • Jio युजर्स सतर्क व्हा! तुमच्या एका चुकीमुळे कॉल हिस्ट्री दुसऱ्याच्या हाती लागू शकते
  • झारखंडने महाराष्ट्राला पछाडले! तिकडे दुपारी एक वाजेपर्यंत ४७.९२ टक्के, इकडे एवढेच मतदान
  • दुपारी दीड वाजेपर्यंत अहिल्यानगर जिल्ह्यात सरासरी 32 टक्के मतदान
  • लातूर जिल्ह्यात दुपारी १ वाजेपर्यंत ३३.२७% मतदान
  • महाविकास आघाडीमधील ठाकरेंच्या शिवसेनेचे कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघाचे उमेदवार केदार दिघे आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांविरोधात कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
  • सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघात दुपारी एक वाजेपर्यंत सरासरी एकूण २९.४४% मतदान झालेले आहे
  • सपाला मतदान करण्यास विरोध केला म्हणून तरुणीची हत्या; मैनपुरी हादरली, बलात्काराचाही संशय
  • PM नरेंद्र मोदींचा जगात डंका; आता गयाना आणि बार्बाडोसकडून 'सर्वोच्च सन्मान' जाहीर!
  • रत्नागिरी जिल्ह्यात मतदानाला उत्साही सुरुवात, ११ वाजेपर्यंत २२.९३ टक्के मतदान
  • कोल्हापुरातील शिरोलीत भगवी टोपी घालण्यावरुन हिंदूत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते आणि पोलिस यांच्यात वाद
  • हर्षवर्धन पाटील यांनी बावडा येथे सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क
  • भुसावळ रेल्वे विभागाच्या डीआरएम इति पांडेय यांनी भुसावळ येथील डी.एस. हायस्कूल केंद्रात मतदानाचा हक्क बजावला.
  • आमदार राजू कारेमोरे त्यांच्या पत्नी रंजिता कारेमोरे व मुलगी वैभवी व वैभव सहकुटुंब त्यांची मूळ गाव एकलारी येथील मतदान केंद्रावर मतदान करताना.
  • ठाणे जिल्ह्यात ११ वाजेपर्यंत १६.६३ टक्के मतदान
  • केंद्रीय सहकार आणि नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पत्नी मोनिका आणि कन्या सिद्धी यांच्यासमवेत कोथरूड येथील एमआयटी स्कुलमध्ये मतदानाचा हक्क बजावला.
  • १०३ वय वर्ष असणारे स्वातंत्र्यसैनिक जी.जी. पारिख यांनी मलबार हिल मतदार संघात मतदानाचा हक्क बजावला.
  • मुलुंड म्हाडा कॉलनीत राहणाऱ्या प्रणव पालवे (२१) या तरुणाने दोन्ही डोळ्यांनी दिसत नसतानाही पहिल्यांदा मतदानाचा हक्क बजावला.
  • ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन व त्यांच्या पत्नी साधना महाजन यांनी जामनेर येथील मतदान केंद्रात मतदानाचा हक्क बजावला.
  • अकोला जिल्ह्यात सकाळी ११ वाजेपर्यंत सरासरी १६.३४ टक्के मतदान!
  • विधानसभा निवडणुकीत 'आप' कोणाला तिकीट देणार? अरविंद केजरीवालांकडून मोठा खुलासा
  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कल्याण-डोंबिवलीचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी ठाणे येथील वागळे इस्टेट येथील एलिमेंट आयटी पार्क येथील मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला.
  • सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघात सकाळी सात ते अकरा या वेळेत 15.66% मतदान झालेले आहे.
  • दुसऱ्या सत्रात नाशिकमध्ये वाढला मतदानाचा टक्का
  • ठाणे - येणारे सरकार पूर्णपणे महायुतीचं, बहुमताचं असेल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मतदानानंतर प्रतिक्रिया.
  • नाशिक : जिल्ह्यात सकाळी ११ वाजेपर्यंत सरासरी १८.८२ टक्के मतदान. शहरात सर्वाधिक मध्य मतदारसंघात १८.४२टक्के मतदान. जिल्ह्यात दिंडोरी मतदारसंघात २६.४१टक्के तर मालेगाव मध्यमध्ये २२.७६ टक्के मतदान.
  • रायगड जिल्हा ७ विधानसभा मतदारसंघ सकाळी ७ ते ११ या कालावधीत २०.४०% मतदान
  • कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघात ११ वाजेपर्यंत १८.२२ टक्के मतदान झाले.
  • सकाळच्या दोन तासांत नाशिक शहरात सरासरी ६ टक्के मतदान
  • अकोल्यात जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अजित कुंभार यांनी मतदान केंद्राची पाहणी करीत, मतदान प्रक्रियेची माहिती घेतली. ज्येष्ठ मतदारांशी संवाद साधला!
  • वर्सोवा विधानसभेच्या महायुतीच्या उमेदवार डॉ.भारती लव्हेकर यांनी आज सकाळी चार बंगला येथील ग्यान केंद्र शाळेत मतदानाचा हक्क बजावला.
  • नितीन गडकरी यांनी सहपरिवारासोबत टाऊन हॉल महाल येथे मतदानाचा हक्क बजावला.
  • जळगाव : पळासखेड ता. भडगाव येथे सकाळी १०.३० वाजेपर्यंत १८००पैकी ३०जणांनी मतदानाचा हक्क बजावला होता.
  • पोलीस आयुक्त मुंबई विवेक फणसळकर यांनी बजावला मतदानाचा अधिकार
  • तिरोडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजय रहांगडाले व गोंदिया विधानसभा मतदारसंघाचे आमदार विनोद अग्रवाल यांनी कुटुंबीयांसह बजाविला मतदानाचा अधिकार.
  • विषारी हवा, प्रदूषणामुळे परिस्थिती गंभीर; दिल्ली सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होमचा निर्णय
  • राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी बजावला मतदानाचा अधिकार
  • नांदेड: रवी नगर भागात एक तासापासून ईव्हीएम बंद आहे, मतदार प्रतीक्षेत, दोन मशीनमध्ये झाला बिघाड, १८२ मतदान केंद्र क्रमांक
  • सोलापूर : सोलापुरातील सर्वच मतदान केंद्रावर मतदानास प्रारंभ; बूथ प्रमुख, नेतेमंडळी व पक्षाच्या प्रमुखांसोबत कार्यकर्त्यांचे मतदान सुरू

Weekly Horoscope: साप्ताहिक राशीभविष्य - ११ डिसेंबर ते १७ डिसेंबर; मेहनतीचं फळ मिळणार, आर्थिक लाभही संभवतो

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2022 12:52 PM

1 / 12
मेष - हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. आपण आपल्या व्यक्तिगत जवाबदाऱ्या सुद्धा उत्तम प्रकारे पार पाडू शकाल. कुटुंबीयांच्या मनात आपल्या बद्धलचा आदर वाढेल. नोकरी करणाऱ्यांना मेहनतीचे चांगले परिणाम मिळतील. ते आपल्या कामाचा आनंद घेऊ शकतील. त्यांना खूप मेहनत करण्याची संवय लागेल. ह्याच सवयीचा ते फायदा घेतील. मेहनतीचा हाच नशा त्यांच्या मनाचा ताबा घेईल जो त्यांना प्रत्येक कामात यशस्वी करेल. ह्या आठवड्यात व्यापाऱ्यांना लाभ होईल. आपणास चांगली प्राप्ती होईल. आपणास प्रत्येक कामात यश प्राप्त होईल. आपला वैवाहिक जोडीदार आपणास आपल्या कामात खूप चांगली मदत करेल. ते आपल्या प्रकृतीची काळजी घेतील. त्यामुळे आपल्या मनात त्यांच्याप्रती प्रेम भावना वाढून आपले संबंध सुखद होतील. जीवनात बदल घडून जुन्या समस्येतून आपली मुक्तता होईल. ह्या आठवड्यात प्रेमीजनांना आपल्या प्रेमिकेस मनातील भावना व्यक्त करून दाखविण्याची संधी मिळेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगले परिणाम मिळतील.
2 / 12
वृषभ - हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. आपणास शासनाकडून थोडा लाभ संभवतो. आपण जर शासनाशी संबंधित व्यवसाय करत असाल तर ह्या आठवड्यात आपणास चांगले परिणाम मिळतील. विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखावह असून सुद्धा आपला वैवाहिक जोडीदाराशी काही कारणाने वाद संभवतो. दोघेही हट्टाला पेटतील. अशा परिस्थितीत आपणास शांत राहावे लागेल. परस्पर संवादाने समस्या सोडविण्याचा प्रयत्न करावा लागेल. प्रेमीजनांसाठी हा आठवडा खूपच चांगला आहे. आपली प्रकृती सुद्धा उत्तम राहील. नोकरी करणाऱ्या व्यक्ती कामाचा आनंद घेऊ शकतील. ते आपले काम उत्तम प्रकारे पूर्ण करू शकतील. आपणास कुटुंबीयांचा पाठिंबा असल्याचे दिसून येईल. आपणास आपल्या भावंडांचे सहकार्य मिळेल. व्यापारवृद्धी होईल. आठवड्याचे सुरवातीचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत. विद्यार्थ्यांची अभ्यासात प्रगती होईल.
3 / 12
मिथुन - हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. आपल्या व्यवसायात मोठी वाढ होऊन नफ्यात वृद्धी होईल. त्यामुळे आपण आनंदित व्हाल व आपले मनोबल उंचावेल. किरकोळ खर्च झाले तरी आपणास काही त्रास होणार नाही. आपण विरोधकांवर मात करू शकाल. आपणास शासनाकडून एखादा मोठा लाभ होण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्ती कामाचा आनंद घेऊ शकतील. त्यांची मेहनत लोकांच्या नजरेत भरेल. तसेच त्यांना मेहनतीचे चांगले परिणाम मिळतील. विवाहितांचे वैवाहिक जीवन खूपच सुखावह होईल. एकमेकांप्रती प्रेम वाढून रोमांस सुद्धा होऊ शकेल. त्यामुळे दोघातील आकर्षण वाढेल. आपणास आपल्या वैवाहिक जोडीदाराशी भांडण टाळावे लागेल. प्रेमीजनांसाठी हा आठवडा सामान्य आहे. आपण आपल्या प्रेमिकेशी विवाहा विषयी मोकळेपणाने बोलावे. विद्यार्थ्यांना अभ्यासाचा आनंद घेता येईल. त्यांना अभ्यासात चांगल्या व समजूतदार व्यक्तीचे मार्गदर्शन मिळू शकेल. हा संपूर्ण आठवडा प्रवासास अनुकूल आहे.
4 / 12
कर्क - हा आठवडा आपल्यासाठी खूपच चांगला आहे. आपण धनवान होऊ शकाल अशी एखादी संपत्ती खरेदी करण्यात आपणास यश प्राप्त होईल. आपली आर्थिक स्थिती मजबूत होईल. प्राप्तीत वाढ होईल. खर्च सुद्धा थोडे वाढतील. परंतु आर्थिक स्थिती प्रबळ असल्याने आपणास वाढीव खर्चांचा त्रास होणार नाही. विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखद होईल. प्रणयी जीवनात काही समस्या निर्माण होण्याची संभावना आहे. काही कारणाने कुटुंबियांशी आपला वाद संभवतो. कुटुंबियांचे मन जिंकण्याचा प्रयत्न केल्यास त्यांचे आपणास सहकार्य मिळू शकेल. व्यापाऱ्यांना परदेशी गुंतवणुकीतून लाभ मिळेल किंवा परदेशात आपल्या व्यापाराचा विस्तार करून लाभ मिळविता येईल. नोकरी करणाऱ्यांच्या कामात वाढ होईल. आपल्या शत्रूंपासून सावध राहावे. ते आपल्या विरुद्ध षडयंत्र रचण्याची संभावना आहे. शरीराची थोडी काळजी घ्यावी. भोजनातील अतिरिक्तपणा आपले नुकसान करण्याची संभावना आहे. प्राणायाम करून मानसिक ताण दूर करण्याचा प्रयत्न करावा. हा संपूर्ण आठवडा प्रवासास अनुकूल आहे.
5 / 12
सिंह - हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. आठवड्याच्या सुरवातीस आपण मानसिक तणावाने त्रस्त होण्याची संभावना आहे. आपल्या खर्चात सुद्धा वाढ होईल, ज्याचा आपल्या आर्थिक स्थितीवर प्रतिकूल परिणाम होईल. प्रकृती चांगली राहील. आपणास शासनाकडून एखादा मोठा लाभ संभवतो. आपण जर सरकारी नोकरीत असाल तर आपणास सरकारी घर किंवा वाहन मिळण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्ती कामाचा आनंद घेऊ शकतील. आपली कामावर पकड घट्ट होईल. आपण कामात नैपुण्य मिळवाल. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी चांगला आहे. आपण दूरवरच्या ठिकाणी किंवा राज्यात आपल्या कामाचा विस्तार करण्यात यशस्वी व्हाल. विवाहितांचे वैवाहिक जीवन सामान्य राहील. आपणास आपल्या वागणुकीवर लक्ष द्यावे लागेल. प्रेमीजन मुक्तपणे आपल्या प्रणयी जीवनाचा आनंद घेऊ शकतील. त्यांच्या संबंधात भरपूर रोमांस सुद्धा असेल. आपण आपल्या प्रेमिकेसाठी एखाद्या चांगल्या शायरीचे वर्णन सुद्धा करू शकाल. विद्यार्थी अभ्यासाचा आनंद घेऊ शकतील. त्यांना अभ्यासात चांगले परिणाम मिळू शकतील.
6 / 12
कन्या - हा आठवडा आपल्यासाठी अंशतः फलदायी आहे. आपल्या कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. घरी एखादे नवीन कार्य होण्याची शक्यता असून त्यासाठी लोकांची ये - जा होईल. त्यामुळे आपणास अनेक लोकांना भेटता येईल. कुटुंबातील वातावरणामुळे लोक उत्साहित होतील. नोकरी करणाऱ्या व्यक्ती आपल्या कामावर लक्ष देऊन कुटुंबियांशी समन्वय साधू शकतील. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी सुद्धा फायद्याचा आहे. त्यांना सरकारी क्षेत्राकडून जो काही लाभ मिळत असेल त्याचा पूर्ण फायदा घेण्याचा प्रयत्न त्यांनी करावा. विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखावह होईल. कौटुंबिक सौख्यामुळे वैवाहिक जीवन सुद्धा सुखद होईल. प्रेमीजन आपल्या मनातील भावना मुक्तपणे प्रेमिके समोर व्यक्त करू शकतील. आपली मनःस्थिती चांगलीच असेल. विद्यार्थी अभ्यासाच्या बाबतीत खूपच गंभीर होऊन अभ्यासात प्रगती करू शकतील. आठवड्याचे सुरवातीचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.
7 / 12
तूळ - ह्या आठवड्यात आपल्या जीवनात नवीन खुशीचे आगमन होईल. आठवड्याच्या सुरवातीस आपण लांब पल्ल्याचा प्रवास कराल. आपणास एखाद्या रमणीय स्थळास जाऊन वेळ घालविण्यास आवडेल. आठवड्याच्या मध्यास आपण आपले संपूर्ण लक्ष आपल्या कामावर केंद्रित कराल. नोकरी करणाऱ्यांचे मनोबल उंचावल्याने त्यांची प्रतिमा सुद्धा उंचावेल. व्यापाऱ्यांना व्यापारात यश प्राप्ती होईल. कार्यात यश मिळाल्याने आपले मन आनंदित होऊन आपला आत्मविश्वास सुद्धा वृद्धिंगत होईल. आपण आपल्या कार्यात प्रगती करू शकाल. मित्रांचे सहकार्य मिळेल. ते आपणास प्रत्येक कामात मदत करतील. कुटुंबात आपली भावंडे व आई - वडील सुद्धा आपल्या पाठीशी उभे असल्याचे दिसून येईल. आपण सर्व कामे उत्साहात कराल. विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखावह होईल. हा आठवडा प्रेमीजनांसाठी चांगला आहे. विद्यार्थ्यांना आपली मेहनत वाढवावी लागेल. हा संपूर्ण आठवडा प्रवासास अनुकूल आहे.
8 / 12
वृश्चिक - हा आठवडा आपल्यासाठी सामान्य फलदायी आहे. आठवड्याच्या सुरवातीच्या दिवसां नंतर आपणास नशिबाची साथ मिळून आपण कार्यात यशस्वी व्हाल. आपणास शासनाकडून एखादा लाभ होण्याची दाट शक्यता आहे. हा आठवडा सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी अनुकूल आहे. खर्च कमी होतील. पैश्यांची प्राप्ती वाढेल. प्राप्ती चांगली झाल्याने मन प्रसन्न होईल. हा आठवडा आर्थिक समृद्धी देणारा आहे. आपण आपल्या प्रयत्नाने यश प्राप्त कराल. नोकरीत मेहनत करून आपणास चांगले परिणाम मिळतील. व्यापाऱ्यांना कामाचा व्याप वाढविण्यासाठी नवीन योजना बनविण्यास हा आठवडा अनुकूल आहे. ते आपल्या कामास नवीन स्वरूप देण्याचा विचार करू शकतील. विवाहितांचे वैवाहिक जीवन सामान्य राहील. परस्पर संघर्ष संभवतो. तेव्हा सावध राहावे. हा आठवडा प्रेमीजनांसाठी चांगला आहे. विद्यार्थी आपल्या अभ्यासात खूप मेहनत करतील. त्यामुळे ते चांगल्या परिणामाची अपेक्षा बाळगून असतील.
9 / 12
धनु - हा आठवडा आपल्यासाठी सामान्य फलदायी आहे. आठ्वड्याच्या सुरवातीस आपण आपले वैवाहिक जीवन सुखावह करण्याचा प्रयत्न कराल. त्यासाठी आपल्या वैवाहिक जोडीदारास आनंदात ठेवाल. हा आठवडा प्रेमीजनांसाठी सामान्य आहे. आपण आपल्या कामात मेहनत करून प्रगती साधाल. व्यवसाय करण्याच्या हेतूने केलेले प्रयत्न यशस्वी होऊन आपणास चांगला नफा होईल. हा आठवडा नोकरी करणाऱ्यांसाठी प्रगती करण्याचा आहे. आपल्या अपेक्षेनुसार सर्व गोष्टी घडून आपणास चांगला नफा मिळविण्याची संधी मिळेल. व्यापाऱ्यांचा व्यवसाय शीघ्र गतीने प्रगती करेल. नशिबाची साथ मिळून आपल्या प्राप्तीत वाढ होईल. कौटुंबिक जीवनात परस्पर प्रेम भावना वाढेल. आपण कोणतीही गोष्ट सरळ व स्पष्टपणे सांगण्यास प्राधान्य दिल्याने काही लोकांच्या नजरेत आपली प्रतिमा मलीन होऊ शकते. विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगले परिणाम मिळतील.
10 / 12
मकर - हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. आठवड्याच्या सुरवातीस आपण स्वतःसाठी खूप पैसे खर्च कराल. काही नवीन कपड्यांची खरेदी कराल. आपणास नवीन वस्तूंची खरेदी करण्यास आवडेल. आठवड्याच्या मध्यास आपण आपले वैवाहिक जीवन सुखद करण्याचा प्रयत्न कराल. आठवड्याच्या अखेरीस सासुरवाडी कडील लोकांची भेट घेण्यास प्राधान्य द्याल. त्याच बरोबर आपले वैवाहिक जीवन सुखावह होईल. प्रेमीजनांना सुद्धा सुखद परिणाम मिळतील. प्रेम व रोमांस करण्याची संधी मिळेल. मात्र, रागाच्या भरात कोणतेही कृत्य करू नये. व्यापाऱ्यांना व्यापाराशी संबंधित कार्यात यश प्राप्त होईल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना कामा निमित्त प्रवास करावे लागतील. त्यांना कदाचित कामासाठी परदेशवारी करण्याची संधी सुद्धा मिळू शकते. आपली प्रकृती उत्तम राहिल्याने आपला आत्मविश्वास वाढेल. आपण शासनाकडून चांगला लाभ सुद्धा मिळवू शकाल. विद्यार्थी अभ्यास करण्यात चांगली सिद्धी प्राप्त करू शकतील. 
11 / 12
कुंभ - हा आठवडा आपल्यासाठी चांगली बातमी घेऊन येणारा आहे. आपले प्रणयी जीवन सुखद होईल. आपल्या संबंधात प्रेम, रोमांस, सर्जनात्मकता अशा सर्व गोष्टींचा समावेश असेल. त्यामुळे आपण व आपली प्रेमिका एकमेकांकडे पूर्णपणे आकर्षित व्हाल व त्यामुळे आपले संबंध अधिक दृढ होतील. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात तणावाची परिस्थिती असल्याचे दिसून येईल. असे होऊ न देण्याचा प्रयत्न करावा. अन्यथा काळजीने आपल्या दोघांच्या प्रकृतीवर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी सामान्य आहे. आपल्या योजना वेळेवर पूर्ण होण्यासाठी आपणास खूप मेहनत करावी लागेल. वेळेवर कामे पूर्ण करून आपण चांगला नफा मिळवू शकाल. नोकरी करणाऱ्यांना बढती मिळण्याची संभावना आहे. आपणास एखादा मोठा लाभ मिळू शकेल. सरकारी नोकरी करणाऱ्यांना सुद्धा विशेष लाभ मिळू शकेल. आपणास शासकीय नोकरी मिळण्याची संभावना आहे. विद्यार्थी अभ्यासात नवीन काही शिकून नवीन काही करण्यात यशस्वी होऊ शकतील.
12 / 12
मीन - हा आठवडा आपल्यासाठी चांगला असला तरी अखेरचे दोन दिवस आव्हानात्मक असतील. त्या वेळेस आपणास आपल्या विरोधकां पासून सावध राहावे लागेल. त्याच दरम्यान खर्चात सुद्धा वाढ होईल. कौटुंबिक जीवन सुखावह होईल. कुटुंबात सुख शांती नांदेल. एकमेकांप्रती प्रेम भावना वृद्धिंगत होईल. नोकरी करणाऱ्या व्यक्ती सुद्धा आपल्या कामावर लक्ष केंद्रित करू शकतील. परंतु गप्पा मारण्यात आपला वेळ वाया दवडू नये. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी चांगला आहे. आपल्या योजना यशस्वी होऊन व्यवसाय पूर्व पदावर येईल. विवाहितांचे वैवाहिक जीवन प्रेमाने परिपूर्ण असेल. आपण आपल्या वैवाहिक जोडीदाराचा आदर कराल. त्यांना खुश करण्याचा प्रयत्न कराल. हा वैवाहिक जीवनातील एक सर्वोत्तम क्षण असेल. प्रेमीजन आपल्या प्रेमिकेच्या भावना जाणून घेण्याचा प्रयत्न करून तिच्यासह बाहेर फिरावयास जाण्याची तयारी करतील. विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगले परिणाम मिळतील. आपल्या प्रकृतीत सुद्धा आता सुधारणा होऊ लागेल.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य