शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Weekly Horoscope: या राशींना धनलक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न राहील; नवनवीन संधी चालून येतील

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2024 11:58 AM

1 / 14
या सप्ताहात बुधाचा राशीपालट आहे. ग्रहस्थिती अशी गुरू आणि हर्षल मेषेत, केतु कन्येत, मंगळ, शुक्र, प्लूटो आणि बुध मकरेत आहे. १९ फेब्रुवारीला बुध कुंभेत जाईल. तेथे त्याची युती रवी आणि शनी यांच्याशी होईल. राहू आणि नेपच्यून मीन राशीत आहे.
2 / 14
चंदाचे भ्रमण वृषभ, मिथुन, कर्क आणि सिंह राशीतून राहील, मंगळवारी जया एकादशी, बुधवारी प्रदोष आणि भीष्म द्वादशी, गुरुवारी गुरुपुष्यामृत, तर शनिवारी माघ स्नान समाप्ती आहे. रविवार, दि. १८ फेब्रुवारी २०२४ रोजी माघ शुक्ल नवमी (सकाळी ८:१६ पर्यंत) राहील, सकाळी ९:२३ पर्यंत रोहिणी, तर त्यानंतर मृग नक्षत्र राहील. रात्री ९:५४ पर्यंत वृषभ, तर त्यानंतर मिथुन रास राहील. आज दिवस चांगला आहे. राहू काळ सायंकाळी ४:३० ते ६ या वेळेत राहील.
3 / 14
मेष - मोठे यश मिळेल : हाती घ्याल ते तडीस न्याल, अशी परिस्थिती राहील. चांगल्या बातम्या कानावर पडतील. धनलक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न राहील. विविध प्रकारचे लाभ होतील. आवडत्या खाद्यपदार्थाचा आस्वाद घेता येईल. घराच्या सजावटीकडे लक्ष द्याल, एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. त्या निमित्ताने लोकांच्या भेटीगाठी होतील, जवळच्या सहलीला जाऊन याल, भावंडांच्या भेटीगाठी होतील. परीक्षांचे निकाल मनासारखे लागतील. नोकरीत नवीन संधी मिळेल. सुखसोयी वाढवून मिळतील. टीप- रविवार, सोमवार, बुधवार, गुरुवार चांगले दिवस.
4 / 14
वृषभ - मिकल ग्रहमानाची अनुकूलता तुमच्या बाजूने राहील. सप्ताहाची सुरुवात उत्साहात होईल. महत्त्वाचे प्रकल्प हाती घेऊन ते यशस्वीपणे पूर्ण कराल. लोकांचे चांगले सहकार्य मिळेल. वडीलधाऱ्या मंडळींचा सल्ला उपयुक्त ठरेल. मौजमजा करण्यासाठी वेळ मिळेल. जवळच्या प्रवासाचा योग येईल. नातेवाईक भेटतील. त्यांच्याशी बोलून मन मोकळे होईल. व्यवसायात अनुकूल स्थिती राहील. फार मोठी गुंतवणूक करताना खबरदारी घ्या. नोकरीत कामाचे स्वरूप बदलेल. उच्च पद प्राप्त होऊ शकते. टीप- रविवार, सोमवार, बुधवार, गुरुवार चांगले दिवस.
5 / 14
मिथुन- आणी दूर होतील : व्यवसायात सतत व्यस्त राहाल. मालाची विक्री चांगली होईल. हाती पैसा खेळता राहील. काहीना प्र प्रवास घडून येईल. मौजमजा करण्यासाठी वेळ आणि पैसा: खर्च कराल. तुमच्या समोरील अनेक अडचणी दूर होतील. मनात सकारात्मक विचार राहतील. जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील. वडिलोपार्जित संपत्तीची कामे ऐरणीवर येतील. थोडे प्रयत्न केल्यास कामे होतील. आवडते पदार्थ ताटात दिसतील. भावंडांच्या भेटीगाठी होतील. बाजारपेठेचा अभ्यास करून निर्णय घ्या. टीप- सोमवार, मंगळवार, बुधवार चांगले दिवस.
6 / 14
कर्क- धनलक्ष्मीची कृपा राहील : सप्ताहाची सुरुवात उत्साहात होईल. चांगल्या बातम्या कानावर पडतील. धनलक्ष्मीची तुमच्यावर कृपा राहील. मात्र, अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. काही किरकोळ स्वरूपाच्या अडचणी येतील आणि जातीलही. महत्त्वाची कामे थोड्या फार प्रयत्नात यशस्वी होतील. जीवनसाथीशी सूर जुळतील. तरुण वर्गाला प्रेमात अपेक्षित प्रतिसाद मिळेल. भेटवस्तूंची देवाणघेवाण होईल. कुणी तुम्हाला मोहाच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करेल. खाण्या-पिण्याची चंगळ राहील, टीप- रविवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार चांगले दिवस.
7 / 14
सिंह- मोहात पडू नय नका: ग्रहमानाची अनुकूलता तुमच्या बाजूने राहील. नोकरीत सतत व्यस्त राहाल, नवनवीन संधी चालून येतील. कामाचा ताण सांभाळताना तारेवरची कसरत करावी लागेल. कुणी तुम्हाला मोहात अडकवण्याचा प्रयत्न करेल. त्या दृष्टीने थोडे सावध राहा. लगेच हुरळून जाऊन निर्णय घेऊ नका. आर्थिक प्राप्तीचे प्रमाण चांगले राहील. मात्र, चैनीवर खर्च करण्याकडे कल राहील. घरातील कामांकडे दुर्लक्ष करू नका. घरातील एखादी जबाबदारी पुढाकार पुढाकार घेऊन पार पाडा, सकारात्मक पद्धतीने विचार करा. टीप- रविवार, सोमवार, शनिवार चांगले दिवस.
8 / 14
कन्या- भाग्याची चांगली साथ तुम्हाला मिळेल. समाजात तुमचा मान वाढेल, एखाद्या कार्यक्रमात सहभागी व्हाल. मुलांशी संवाद ठेवा. त्यांच्या संगतीकडे लक्ष द्या. पर्यटनाच्या माध्यमातून फिरणे होईल. नोकरीत नवीन संधी मिळेल. घरी पाहुणे मंडळी येतील, धनलक्ष्मीची तुमच्यावर कृपा राहील. काहींना भेटवस्तू मिळतील. एखादे काम चुटकीसरशी होऊन जाईल. जवळच्या मित्र-मैत्रिणींना भेटण्याची संधी मिळेल. त्यामुळे मन आनंदून जाईल. आवडते घंद जोपासण्यासाठी थोडा वेळ द्या. टीप- रविवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार चांगले दिवस.
9 / 14
तूळ- मोठी संधी मिळेल : सप्ताहाच्या सुरुवातीला काही अडचणी असतील; मात्र त्या फार काळ टिकणार नाहीत. अनपेक्षितपणे कुणाची तरी मदत मिळेल आणि तुमची अडचण दूर होईल. काहीना पर्यटनाची संधी मिळेल. समाजात तुमचा गौरव होईल. तुमच्या कामाची प्रशंसा केली जाईल. नोकरीत मोठी संधी मिळेल. नवीन ओळखी होतील. सुखसोयी वाढवून मिळतील. घरात खेळीमेळीचे वातावरण राहील. एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. विविध मार्गानी धनप्राप्ती होईल. सतत लोकांच्या संपर्कात याल, टीप- मंगळवार, बुधवार, शुक्रवार, शनिवार चांगले दिवस.
10 / 14
वृश्चिक-प उच्च पद व्यवसायात अनुकूल वातावरण राहील. एखाद्या उलाढालीत मोठा फायदा होऊ शकतो. नवीन प्रयोग करून पाहिले जातील. गुंतवणूक फायदेशीर ठरेल. भावंडांच्या भेटीगाठी होतील, नोकरीत अनुकूल बदल होऊ शकतात. काहींना उच्च पद प्राप्त होईल. जीवनसाथीचे चांगले सहकार्य मिळेल. भेटवस्तू देण्यास हरकत नाही. भाग्याची चांगली साथ राहील. काहींना प्रवास घडून येतील. सामाजिक कार्यात आघाडीवर राहाल. घरी पाहुणे मंडळी येतील. तुमचे निर्णय बरोबर ठरतील. टीप- रविवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार चांगले दिवस.
11 / 14
धनू -धनलक्ष्मीची कृपा राहील: विविध मार्गानी धनप्राप्ती होईल. जुनी गुंतवणूक फायदेशीर ठरेल, मालमत्तेच्या व्यवहारात फायदा होईल. अचानक धनलाभ होऊ शकतो. तुमचे बाजारपेठेचे अंदाज बरोबर ठरतील. सुरुवातीला मनात काही शंका असतील; मात्र त्यांचे निरसन होईल. आरोग्याची काळजी घ्या. मुलांच्या यशामुळे आनंद वाटेल. सामाजिक कार्य करणाऱ्यांचा गौरव होईल. आपणास सतत व्यस्त राहावे लागेल, भविष्यातील योजनांची आखणी करण्यासाठी वेळ काढा. टीप- सोमवार, मंगळवार, शुक्रवार, शनिवार चांगले दिवस.
12 / 14
मकर- प्रेमात सफलता मिळेल : सप्ताहाची सुरुवात उत्साहात होईल; मात्र आपण फार बेफिकीरपणे वागू नका. काही लोक तुमच्या उत्साहाचा रसभंग करण्यासाठी प्रयत्न करतील. फार दगदग होईल अशी कामे अंगावर ओढवून घेऊ नका. आरोग्याची काळजी घ्या. काहींना अचानक धनलाभ होऊ शकतो. मौजमजा करण्यासाठी वेळ आणि पैसा खर्च कराल. जवळच्या लोकांच्या सहवासात मन रमेल, तरुण वर्गाला प्रेमात अपेक्षित प्रतिसाद मिळेल. विवाहेच्छुकांसाठी अनुकूल काळ आहे. टीप- रविवार, बुधवार, गुरुवार चांगले दिवस.
13 / 14
कुंभ- विद्यार्थ्यांना अनुकूल काळ : नोकरीत सतत व्यस्त राहाल. कामानिमित्त प्रवास घडून येतील. एखाद्या प्रकल्पासाठी गरजेपेक्षा जास्त वेळ द्यावा लागेल. चैनीच्या वस्तू खरेदी कराल, घरात एखाद्या कार्यक्रमाची लगबग राहील, खचर्चाचे प्रमाण वाढते राहील. कामाच्या नादात तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका. आराम आणि आहार याकडे लक्ष द्या. प्रेमात सफलता मिळेल. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना चांगला काळ आहे. तुमच्या बोलण्याचा मान राखला जाईल. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. टीप- रविवार, सोमवार, मंगळवार चांगले दिवस.
14 / 14
मीन - अनुकूल परिस्थिती राहील : ग्रहमानाची एकंदरीत अनुकूलता तुमच्या बाजूने राहील. व्यवसायात चांगली परिस्थिती राहीलः मात्र अपेक्षेपेक्षा जास्त वेळ द्यावा लागेल. जवळच्या प्रवासाचे योग येतील. भावंडांच्या भेटीगाठी होतील. बाजारपेठेचा अभ्यास करून महत्त्वाचे निर्णय घ्या. आर्थिक प्राप्तीचे प्रमाण समाधानकारक राहील, भेटवस्तू व विविध प्रकारचे लाभ होतील. मुले प्रगती करतील. परीक्षांचे निकाल मनासारखे लागतील. टीप- रविवार, सोमवार, बुधवार चांगले दिवस. -विजय देशपांडे (ज्योतिषविशारद ).
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य