Weekly Horoscope During the week you will have to put in extra effort and effort
साप्ताहिक राशीभविष्य: आव्हानात्मक आठवडा; कर्ज, रोग व शत्रू हात धुवून आपल्या मागे लागण्याची शक्यता By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2024 1:32 PM1 / 12आठवड्याच्या सुरवातीस आपणास आर्थिक बाबी, रोजगार, कारकीर्द व व्यापार ह्यात प्रगतीची संधी मिळेल. आपण जर वेळ व ऊर्जेचे योग्य नियोजन केले तर आपणास अपेक्षित यश प्राप्त होईल. आपल्या मित्रांच्या मदतीने आपली स्थगित कामे पूर्ण होतील. आपण जर राजकारणात असाल तर आठवड्याच्या अखेर पर्यंत एखादी महत्वाची जवाबदारी किंवा पद प्राप्त होऊ शकते. आठवड्याच्या उत्तरार्धात व्यापाऱ्यांना निव्वळ अपेक्षित लाभच होणार नाही तर त्यांना आपला व्यवसाय विस्तार करण्याची संधी सुद्धा मिळेल. ह्या दरम्यान नोकरी करणाऱ्या व्यक्तींना अतिरिक्त प्राप्तीचे स्रोत सुद्धा मिळतील. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगली बातमी मिळेल. प्रेम संबंध प्रगल्भ होतील. दांपत्य जीवन आनंदमय असेल. 2 / 12आठवड्यात आपणास घरी तसेच बाहेर लहान - सहान गोष्टींकडे दुर्लक्ष करावे लागेल. कार्यक्षेत्री आपले विरोधक आपले लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे. आपणास अनपेक्षितपणे एखादा प्रवास करावा लागू शकतो, ज्यात वेळेचा व पैश्याचा अपव्यय होण्याची संभावना आहे. आठवड्याच्या मध्यास घर दुरुस्तीसाठी खर्च जास्त होण्याची शक्यता आहे, व त्यामुळे आपले अंदाजपत्र खिळखिळे होऊ शकते. आठवड्याच्या उत्तरार्धात आपणास सर्तक राहावे लागेल. प्रणयी जीवनासाठी हा आठवडा काहीसा प्रतिकूल असू शकतो. गैरसमजामुळे प्रेमिकेशी आपले मतभेद होऊ शकतात. असे असले तरी एखाद्या महिला मित्राच्या मदतीने ते दूर करण्यात आपण यशस्वी होऊन आठवड्याच्या अखेरीस आपले प्रेम संबंध पुन्हा दृढ करू शकाल. आपल्या वैवाहिक जोडीदाराच्या प्रकृतीमुळे आपले मन काहीसे चिंतीत होऊ शकते.3 / 12आठवड्यात आपणास अतिरिक्त परिश्रम व प्रयत्न करावे लागतील, जेणे करून कोणत्याही कार्यात आपण यशस्वी होऊ शकाल. ह्या आठवड्यात ऋतुजन्य विकार किंवा जुनाट आजार उफाळून येण्याची संभावना असल्याने आपणास आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींची नवीन ठिकाणी बदली झाल्याने किंवा जबरदस्तीने जवाबदारी मिळाल्याने त्यांचे मन काहीसे खिन्न होऊ शकते. आठवड्याच्या उत्तरार्धात कारकिर्द किंवा व्यापारा निमित्त प्रवास होण्याची शक्यता आहे. ह्या आठवड्यात आपणास कुटुंबियांचे व मित्रांचे पूर्ण सहकार्य मिळेल. आपले जर एखाद्या व्यक्तीवर प्रेम जडले असेल तर कुटुंबीय आपल्या प्रेम विवाहावर शिक्का मोर्तब करू शकतात. आठवड्याच्या अखेर पर्यंत मुलांसंबंधी चांगली बातमी ऐकण्यास मिळू शकते, ज्यामुळे घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. आरोग्याच्या दृष्टीने आपणास आपला आहार व दिनचर्या याकडे लक्ष द्यावे लागेल.4 / 12आठवड्यात व्यापारात काही आव्हानांना सामोरे जावे लागू शकते. बाजारात अडकलेल्या पैश्यांच्या चिंतेमुळे आपली चिडचिड होऊ शकते. नोकरी करणाऱ्यांना सुद्धा कार्यक्षेत्री काही समस्या व अडचणींचा सामना करावा लागू शकतो. आपणास प्राप्तीच्या प्रमाणात खर्चांवर नियंत्रण ठेवावे लागेल. प्रकृतीकडे लक्ष द्यावे. वाहन चालवताना सावध राहावे. ह्या दरम्यान आजारपण, दुखापत किंवा अन्य समस्या संभवतात. जुने आजार पुन्हा उफाळू शकतात. प्रेम संबंधात सावध राहावे. आपल्या प्रेमिकेच्या भावनांचा आदर राखावा. आपले प्रेम संबंध उत्तम प्रकारे जपून ठेवावेत, अन्यथा विविध प्रकारच्या समस्यांचा सामना आपणास करावा लागू शकतो. मुलां संबंधी एखादी बाब आपल्या काळजीस कारणीभूत ठरू शकते. असे सर्वकाही असले तरी कठीण प्रसंगी आपला वैवाहिक जोडीदार आपल्या पाठीशी सावली प्रमाणे उभा राहील.5 / 12आठवड्यात कोणत्याही कार्यात यशस्वी होण्यासाठी आपणास अतिरिक्त परिश्रम व प्रयत्न करावे लागतील. आपल्या कार्यक्षेत्री गुप्त शत्रूं पासून सतर्क राहावे लागेल. आठवड्याच्या मध्यास कुटुंबातील एखाद्या व्यक्ती बरोबर मतभेद होण्याची संभावना असल्याचे लक्षात ठेवावे. हे मतभेद दूर करण्यासाठी आपणास संवादात्मक व समजूतदारपणा दाखवावा लागेल. आठवड्याच्या उत्तरार्धात व्यवसाया निमित्त केलेले प्रवास सुखद व लाभदायी होतील. त्यामुळे आपणास भविष्यात एखाद्या लाभदायी योजनेत सहभागी होण्याची संधी मिळेल. ह्या आठवड्यात आपण व आपली प्रेमिका या दरम्यान काही गैरसमज होऊ शकतात, परंतु ते दूर करण्यासाठी आपणास वाद घालण्या ऐवजी संवाद साधावा लागेल. आपण जर तसे केले नाहीत तर आपल्या संबंधात दुरावा येऊन चांगले असलेले संबंध कायमचे दुरावू शकतात. आपले वैवाहिक जीवन सुखद व्हावे म्हणून आपण जोडीदाराच्या भावनांकडे दुर्लक्ष करू नये.6 / 12आठवड्यात कुटुंब व कार्यक्षेत्राशी संबंधित कोणताही निर्णय आपण भावनेच्या भरात घेऊ नये. आठवड्याच्या मध्यास कामा निमित्त आपणास एखादा दूरवरचा प्रवास करावा लागू शकतो. ह्या प्रवासा दरम्यान आपणास आपल्या प्रकृतीची व सामानाची काळजी घ्यावी लागेल. पैतृक संपत्तीशी संबंधित काही वाद संभवत असल्याने आपण तक्रारीस वाव देऊ नये. व्यापाऱ्यांसाठी हा आठवडा काहीसा आव्हानात्मक होऊ शकतो. नोकरी करणाऱ्यांना एखादे विशिष्ट कार्य पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहावे लागेल. आपल्या प्राप्तीपेक्षा खर्चाचे प्रमाण जास्त असल्यामुळे आपण काहीसे उदास व्हाल. प्रणयी जीवनात आपणास आपल्या प्रेमिकेशी एकनिष्ठ राहावे लागेल. प्रेमात विचारपूर्वक पाऊल उचलावे, अन्यथा आपणास समस्यांना सामोरे जावे लागू शकते. आपल्या वैवाहिक जोडीदाराची प्रकृती व मुलांच्या भविष्याची काळजी ह्यामुळे आपण चिंतीत होऊ शकता. परंतु, आपण चिंतीत न होता त्यांची योग्य काळजी घेण्यावर भर द्यावा.7 / 12 आठवड्यात आपले लक्ष विचलित होणार नाही ह्याची दक्षता आपणास घ्यावी लागेल. आठवड्याच्या सुरवातीस घर दुरुस्ती किंवा घरासाठी उपयुक्त वस्तूंची खरेदी ह्यात जास्त खर्च होण्याची संभावना आहे. कठोर परिश्रम करूनच आपणास धन प्राप्ती होण्याची संभावना आहे. व्यापाऱ्यांना बाजारात अडकलेले पैसे परत मिळविण्यात त्रास होण्याच्या शक्यतेमुळे त्यांनी आर्थिक देवाण - घेवाण करताना सावध राहावे. आठवड्याच्या मध्यास विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष लागणार नाही. युवकांचा बहुतांश वेळ मनोरंजनात जाईल. आठवड्याच्या उत्तरार्धात नोकरी करणाऱ्यांच्या जीवनात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्या महिलांसाठी हा आठवडा शुभ फलदायी आहे. जमीन किंवा घराच्या खरेदी - विक्रीची योजना तयार करण्यास हा आठवडा अनुकूल आहे. प्रेम संबंध प्रगल्भ होत असल्याचे दिसून येईल. प्रेमिकेशी प्रेम व सामंजस्य सुधारेल. दांपत्य जीवन सुखद होईल.8 / 12 आठवड्यात आपणास आळस व अहंकार दूर सारण्याचा प्रयत्न करावा लागेल, अन्यथा आपल्या समोर येणाऱ्या सुवर्ण संधी हातून निसटून जातील. कामात विशेष यश प्राप्तीसाठी आपल्या वेळेचे व ऊर्जेचे योग्य नियोजन आपणास करावे लागेल. निर्धारित ध्येय पूर्ण करण्यात आपली प्रकृती प्रभावित होऊ शकते, तेव्हा त्याची काळजी घ्यावी. आठवड्याच्या मध्यास व्यापाऱ्यांना चढ - उतारांचा सामना करावा लागू शकतो. परीक्षेत व स्पर्धेत अपेक्षित यश प्राप्तीसाठी विद्यार्थ्यांना भरपूर परिश्रम करावे लागतील. आठवड्याच्या उत्तरार्धात एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीच्या भेटीचा लाभ, भविष्यात होऊ शकतो. नोकरी करणाऱ्यांची पदोन्नती किंवा बदली संभवते. वैवाहिक जोडीदाराच्या एखाद्या मोठ्या साध्यतेमुळे घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. प्रेम संबंध दृढ होतील. प्रेमिकेच्या सहवासात सुखद क्षण घालविण्याची संधी मिळेल. वैवाहिक जोडीदाराशी प्रेम व सामंजस्य टिकून राहील.9 / 12आवश्यक कामे पूर्ण करण्यासाठी आपणास अधिक प्रयत्नशील राहावे लागेल. दीर्घ काळापासून स्थगित झालेले एखादे काम आपण एखाद्या व्यक्तीच्या किंवा आपल्या मित्राच्या मदतीने पूर्ण करू शकाल. ह्या आठवड्यात नोकरी करणाऱ्यांना एखाद्या चांगल्या संधीचा शोध घेण्यात यश प्राप्त होऊ शकते. आपल्या कारकिर्दीत किंवा व्यवसायात प्रगती करण्यात एखाद्या मित्राची महत्वाची भूमिका असू शकते. आपणास आपले प्रेम व्यक्त करण्याची इच्छा असेल तर ह्या आठवड्यात ती व्यक्त करण्यात आपण यशस्वी होऊ शकता. जे प्रणयी जीवन जगत आहेत त्यांच्यात सामंजस्य वाढेल. आपल्या प्रेमिकेच्या सहवासात सुखद क्षण घालविण्याची संधी आपणास मिळेल. कुटुंबियांसह एखादी सहल संभवते. प्रकृती सामान्यच राहील.10 / 12आठवड्यात आपणास आपले संबंध व प्रकृती याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. जर जमीन, घर किंवा संपत्तीशी संबंधित एखादा वाद असेल तर कोर्टात जाण्या ऐवजी सामंजस्य दाखवून बाहेरच त्याचे निराकरण करणे उपयुक्त ठरेल. कार्यक्षेत्री वरिष्ठ व कनिष्ठ यांचे अपेक्षेनुसार सहकार्य न मिळण्याची स्थिती निर्माण होईल. ह्या दरम्यान व्यापाऱ्यांना आर्थिक देवाण - घेवाण करताना सावध राहावे लागेल. एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीच्या मदतीने कौटुंबिक व व्यावसायिक समस्यांचे निराकरण करण्यात आपण यशस्वी होण्याची संभावना आहे. ह्या दरम्यान संततीशी संबंधित एखादे यश आपल्या आनंदास व सन्मानास कारणीभूत ठरू शकते. प्रेम संबंध दृढ होतील. कदाचित कुटुंबीय आपल्या प्रेमाचा स्वीकार करून विवाहास मान्यता देतील. वैवाहिक जोडीदारासह आपण एखादी तीर्थ यात्रा करू शकता. आहार व आपली दिनचर्या ह्यावर विशेष लक्ष द्यावे.11 / 12हा आठवडा आपल्यासाठी आव्हानात्मक असू शकतो. कर्ज, रोग व शत्रू हात धुवून आपल्या मागे लागण्याची शक्यता असल्याने आपणास आपल्या आर्थिक स्थितीवर विशेष लक्ष द्यावे लागेल. आपल्या अंदाजपत्रावर दबाव येऊ शकतो. इतकेच नव्हे तर कर्ज घेण्याची स्थिती सुद्धा निर्माण होऊ शकते. त्यामुळे संबंधित खर्चांवर नियंत्रण ठेवून आर्थिक नियमांचे पालन करावे लागेल. आपण जर व्यापारात प्रगती करण्याचा विचार करत असाल तर एखाद्या अनुभवी व्यक्तीचा किंवा हितचिंतकाचा सल्ला घेणे उपयुक्त ठरेल. प्रणयी जीवनात काही समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे आपण त्रस्त व्हाल. कौटुंबिक समस्यांमुळे आपले वैवाहिक जीवन प्रभावित होऊ शकते. अशा वेळी संवेदनशीलता व शंका समजून घेण्याचा प्रयत्न करावा. अशा प्रसंगी आपली संवाद क्षमता व आपले सहकार्य महत्वाचे ठरेल. सर्व समस्यांत शांतता व सामंजस्य दाखविण्याचा प्रयत्न करावा.12 / 12आठवड्यात आपणास एखादा महत्वाचा निर्णय घ्यावा लागेल. आपणास हितचिंकांचा सल्ला व कुटुंबियांचा प्रस्ताव ह्यावर लक्ष द्यावे लागेल. व्यावसायिक बाबीत सुद्धा सावध राहावे. व्यापारात आपणास चढ - उतार पाहावयास मिळण्याची शक्यता आहे. अर्थात हा व्यापाराचाच एक भाग असल्याने घाबरून जाण्याची गरज नाही, परंतु त्यावर नियंत्रण ठेवण्याची तयारी असली पाहिजे. असे केल्यास येणाऱ्या कालखंडात परिस्थिती आपल्या नियंत्रणात येईल. जर आपल्या प्रणयी जीवनात किंवा वैवाहिक जीवनात एखादी समस्या निर्माण झाली असेल तर संवाद साधून त्याचे निराकरण करावे. अन्यथा कटुता निर्माण होऊ शकते. अशा प्रसंगी आपल्या आनंदात खोडा घालणाऱ्या व्यक्तींपासून आपणास दूर राहावे लागेल. आठवड्याच्या अखेरीस आपणास एखाद्या मांगलिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. आपल्या जीवनातील सुखद व महत्वपूर्ण अनुभवाच्या रूपात ह्या संधीचा स्वीकार आपण करावा. आणखी वाचा Subscribe to Notifications