शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

साप्ताहिक राशीभविष्य: 'या' राशीच्या व्यक्तींना पगारात वाढ; विद्यार्थ्यांसाठी आठवडा चांगला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2023 9:27 AM

1 / 13
या आठवड्याचे एकूण ग्रहमान पाहता आगामी सप्ताह आपल्यासाठी कसा असेल? करिअर, नोकरी, शिक्षण, व्यवसाय, कुटुंब याबाबत कोणत्या राशींना लाभ मिळू शकतील? कोणत्या राशींना आगामी काळ संमिश्र ठरू शकेल? जाणून घ्या...
2 / 13
मेष - हा आठवडा आपल्यासाठी सामान्यच आहे. विवाहित व्यक्ती आपल्या वैवाहिक जीवनात नवीन उमेदीचे स्वागत करून एखादे नवीन काम करण्याचा प्रयत्न करतील, ज्यात ते यशस्वी होतील. प्रेमीजन त्यांच्या नात्यात अत्यंत खुश असल्याचे दिसून येईल. असे असले तरी अधून - मधून होणारे वाद त्यांना समस्यां बद्धल विचार करावयास लावतील. अर्थात ह्या समस्या त्यांना समजू शकणार नाहीत. नोकरीच्या ठिकाणी परिस्थिती आपणास अनुकूल राहील. आपणास सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळाल्याने आपली स्थिती मजबूत होईल. आपणास कार्यालया कडून एखादे वाहन किंवा घर मिळू शकते. व्यापाऱ्यांचे काही नवीन लोकांशी किंवा सरकारी अधिकाऱ्यांशी ओळख होऊ शकते. हि ओळख व्यापारात योग्य तितका लाभ मिळवून देणारी असेल. हा आठवडा विद्यार्थ्यांसाठी चांगला आहे
3 / 13
वृषभ - हा आठवडा आपणास मोठे यश प्राप्त करून देणारा आहे. आपणास जर घर बांधण्याची इच्छा असेल तर ह्या आठवड्यात ती इच्छा पूर्ण होऊ शकेल. जमीन - जुमल्याशी संबंधित बाबीत आपणास अनुकूल परिस्थिती राहील. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना काहीशा तणावांना सामोरे जावे लागले तरी सुद्धा त्यांची कामगिरी उत्तम होईल. प्राप्ती चांगली होईल. आपणास प्रॉपर्टीतून सुद्धा लाभ होईल. आपण चांगल्या लाभाची अपेक्षा बाळगू शकता. ह्या आठवड्यात किरकोळ खर्च होतील. घरात एखादी व्यक्ती आजारी पडण्याची संभावना आहे. विशेषतः वयोवृद्ध व विवाहित व्यक्ती त्यांच्या वैवाहिक जीवनात खुश असल्याचे दिसून येईल. आपल्या जोडीदाराचा कुटुंबियांशी उत्तम समन्वय साधला गेल्याने सुद्धा आपण खुश व्हाल. प्रणयी जीवनासाठी आठवडा उन्नतीदायक आहे. आपण आपल्या नात्यात प्रगती करू शकाल. आपणास आपल्या मित्रांचा सुद्धा पाठिंबा मिळेल. विद्यार्थ्यांसाठी आठवडा चांगला आहे. ते आपल्या अध्ययनात खूप मेहनत करतील.
4 / 13
मिथुन- हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. विवाहित व्यक्ती त्यांच्या वैवाहिक जीवनात समाधानी असल्याचे दिसून येईल. जोडीदाराप्रती प्रेम व आकर्षण वाढेल. हा आठवडा प्रणयी जीवनासाठी अनुकूल आहे. आपण आपल्या प्रणयी नात्यात गोडवा निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील राहाल. मित्रांसह मौजमजा करण्यात वेळ घालवाल. नोकरीच्या ठिकाणी मन लावून काम कराल. आपले वरिष्ठ आपणास एखादे नवीन काम देऊन आपल्यावर बारकाईने लक्ष ठेवतील, तेव्हा आपले काम चोख करण्याचा प्रयत्न करावा. व्यापाऱ्यांना ह्या आठवड्यात थोडे सावध राहावे लागेल. एखादी व्यक्ती आपल्या कामात अडथळा निर्माण करण्याची संभावना आहे. हा आठवडा विद्यार्थ्यांसाठी चांगला आहे. अभ्यासात त्यांचे मन रमेल. त्याचे चांगले परिणाम सुद्धा त्यांना मिळतील.
5 / 13
कर्क - हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. आपण जर विवाहित असाल तर वेळेचा सदुपयोग करावा. तसेच आपल्या नात्यात गोडवा निर्माण करण्याचा प्रयत्न करावा. सध्या ह्या दृष्टीने आपणास अनुकूल वातावरण आहे. प्रणयी जीवनासाठी आठवडा काहीसा प्रतिकूल असू शकतो. परंतु, आपण आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर आपल्या प्रेमिकेचे हृदय जिंकू शकाल. आठवड्याच्या सुरवातीस आपण एखाद्या ठिकाणी फिरावयास जाऊ शकाल. मित्रांच्या सहवासात आपण बराचसा वेळ घालवू शकाल. ह्या आठवड्या आपल्या माणसांच्या सहवासात सुद्धा बराचसा वेळ घालवू शकाल. हा आठवडा मानसिक सौख्य देणारा आहे. कौटुंबिक जीवन सुद्धा समाधानी राहील. घरात एखादा सोहळा असल्याने पाहुण्यांची वर्दळ राहील. त्यामुळे घरात सकारात्मक वातावरण निर्माण होईल. आपण स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेऊ शकाल. आपला आत्मविश्वास उंचावलेला असेल. त्यामुळे आपण व्यापारात नवीन धाडस करण्याचा विचार कराल. एखादी नवीन गुंतवणूक सुद्धा करू शकता. नोकरी करणाऱ्यांसाठी सुद्धा आठवडा अनुकूल आहे. विद्यार्थ्यांसाठी आठवडा चांगला आहे. त्यांना अभ्यासात सकारात्मक परिणाम मिळण्याची दाट संभावना आहे.
6 / 13
सिंह- हा आठवडा आपणास अनुकूल आहे. विवाहित व्यक्ती वैवाहिक जीवनातील तणाव दूर करत असल्याचे दिसून येईल. त्याच बरोबर अधून - मधून ते प्रणयाचा आनंद सुद्धा घेतील. हा आठवडा प्रेमीजनांसाठी चढ - उतारांचा आहे. आपण जर प्रेमिकेस पूर्वी विवाहासाठी मागणी घातली असेल तर आठवडा अनुकूल आहे, अन्यथा वेळ सुद्धा लागू शकतो. घरी पाहुण्याची वर्दळ राहील. एखादा समारंभ होऊ शकतो. एखादे चांगले काम होऊ शकते. मात्र, ह्या आठवड्यात खर्चात खूप मोठी वाढ होईल. प्राप्ती सामान्यच झाल्याने आपणास खर्चांवर नियंत्रण ठेवावे लागेल. नोकरीच्या ठिकाणी आपली स्थिती चांगली राहील. आपणास सहकाऱ्यांचा पाठिंबा मिळाल्याने कामाच्या बाबतीत आपली स्थिती मजबूत होईल. व्यापारी आपला व्यापार वाढविण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येईल. हळू - हळू त्यांना त्याचा लाभ मिळत असल्याचे सुद्धा दिसू लागेल. हा आठवडा विद्यार्थ्यांना अनुकूल आहे. अभ्यासात त्यांचे मन रमेल.
7 / 13
कन्या -ह्या आठवड्यात आपला आत्मविश्वास उंचावलेला दिसून येईल. विवाहित व्यक्ती त्यांच्या वैवाहिक जीवनात असलेल्या समस्या दूर करण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येईल. वैवाहिक जीवनातील समस्यांचे निराकरण करण्यासाठी सासुरवाडी कडील लोकां समोर ते आपले विचार मांडतील. प्रणयी जीवनासाठी आठवडा अनुकूल आहे. आपली प्रेमिका एखादा महत्वाचा सल्ला आपणास देईल, जो आपल्या पसंतीस उतरेल. आपण एकाचवेळी काही नवीन कामे आपल्या हाती घ्याल, ज्यामुळे आपण त्रस्त व्हाल. परंतु हि कामे पूर्ण करण्याची क्षमता आपल्यात असल्याने योग्य नियोजन करून ती करावीत. असे केल्याने आपणास कोणत्याही समस्येस सामोरे जावे लागणार नाही. प्रकल्प यशस्वी झाल्याने आपली प्राप्ती वाढेल व त्यामुळे आपली आर्थिक स्थिती उंचावेल. मित्रांचा पाठिंबा मिळून नोकरीतील स्थिती चांगली होईल. आपण पगारवाढीवर हक्क सांगू शकाल. व्यापाऱ्यांना काही गुप्त योजनांवर काम करावे लागू शकते. आठवडा आपणास अनुकूल असल्याने आपण त्याचा भरपूर लाभ घ्यावा. हा आठवडा विद्यार्थ्यांसाठी अनुकूल आहे. ते मेहनतीसह आपल्या अभ्यासात प्रगती करू शकतील.
8 / 13
तूळ - हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. प्रणयी जीवनासाठी आठवडा अनुकूल आहे. नात्यातील प्रेम वृद्धिंगत होईल. विवाहित व्यक्ती आपल्या वैवाहिक जीवनात प्रगती साधण्यासाठी एखादे नवीन पाऊल उचलतील. आठवड्याच्या सुरवातीस काही फुटकळ खर्च झाले तरी प्राप्ती चांगली झाल्याने आपणास काही त्रास होणार नाही. जमीन - जुमल्याशी संबंधित गोष्टीत यश प्राप्ती होईल. सरकारी क्षेत्राकडून चांगला लाभ होण्याची संभावना आहे. आपण जर सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करत असाल तर आपणास त्यात यश प्राप्त होऊ शकते. प्रलंबित कामे होतील. आपली सामाजिक स्थिती मजबूत होईल. नशिबाच्या प्रबलतेमुळे प्रलंबित कामे सुद्धा पूर्णत्वास जातील. खाजगी जीवन असो किंवा व्यावसायिक जीवन, आपणास ते उत्तम असल्याची जाणीव होईल. विद्यार्थ्यांना ह्या आठवड्यात खूप मेहनत करावी लागेल. त्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे लागेल.
9 / 13
वृश्चिक -हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात अनेक चढ - उतार येतील. आपण एखाद्या बाहेरील व्यक्तीकडे आकर्षित होण्याची संभावना आहे. त्या पासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा, अन्यथा आपल्या दांपत्य जीवनातील तणाव वाढेल. प्रेमीजनांसाठी आठवडा अनुकूल आहे. आपणास आपल्या प्रेमिकेचे बोल ऐकून शांती मिळेल व त्यामुळे आपले नाते रोमँटिक होईल. आठवड्याच्या सुरवातीस धनप्राप्ती होऊन आपली आर्थिक स्थिती सुधारेल. आपले मन धार्मिक व अध्यात्मिक प्रवृत्तींमध्ये गुंतले गेल्याने आपण पूजा - अर्चा करण्याकडे अधिक लक्ष द्याल. समाजात आपली प्रतिष्ठा उंचावेल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी आठवडा चांगला आहे. आपण जर वायफळ गोष्टीं पासून दूर राहिलात तर हा आठवडा आपल्यासाठी उन्नतीदायक होईल. व्यापाऱ्यांसाठी आठवडा चांगला असला तरी त्यांना आपल्या व्यावसायिक भागीदाराचा पाठिंबा मिळविण्यासाठी त्याच्याशी मोकळेपणाने बोलावे लागेल. आपला व्यावसायिक भागीदार आपल्या पासून काही लपवत असल्याने हे गरजेचे आहे. ह्या आठवड्यात विद्यार्थ्यांना खूप मेहनत करूनच यश प्राप्त होईल. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची कामगिरी उत्तम होईल.
10 / 13
धनु - हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. विवाहित व्यक्ती त्यांच्या वैवाहिक जीवनात असमाधानी असल्याचे दिसेल. सासुरवाडीचा वाढता हस्तक्षेप आपणास रुचणार नाही. प्रेमीजनांसाठी आठवडा चांगला आहे. त्यांना बाहेर फिरावयास जाण्याची संधी मिळेल. एखाद्या मंदिरात ते दर्शनासाठी सुद्धा जाऊ शकतात. आपण कौटुंबिक समस्या समजून घेऊन घरगुती खर्च सुद्धा कराल. नशिबाची साथ मिळाली तरी अचानकपणे एखादे पूर्णत्वास आलेल्या कामात बिघाड होऊ शकतो, तेव्हा खूप सावध राहावे. व्यापारासाठी आठवडा चढ - उतारांचा आहे. सरकारी क्षेत्राच्या विरोधात जाऊन एखादे काम करणे आपल्यासाठी नुकसानदायी होऊ शकते. ह्या आठवड्यात शासकीय यंत्रणे कडून आपल्यावर दंडात्मक कारवाई होण्याची संभावना असल्याने सतर्क राहावे. नोकरीच्या ठिकाणी परिस्थितीत चढ - उतार येतील. सध्या नवीन नोकरी मिळण्याची संभावना नसल्याने चालू नोकरी टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करावा. चालू नोकरीत काम करणे हा एकमेव विकल्प आपल्या समोर राहील. ह्या आठवड्यात आपली प्रकृती बिघडण्याची संभावना आहे.
11 / 13
मकर - हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखद होईल. जोडीदाराच्या वागण्यात बदल झाल्याने आपण त्रस्त व्हाल. जोडीदार काही कटू शब्दांचा वापर करेल, तेव्हा वाद - विवादात वेळ घालविण्या ऐवजी शांत राहणे उचित ठरेल. प्रणयी जीवनासाठी आठवडा चांगला आहे. आपल्यातील जवळीक वाढेल. नशिबाच्या प्राबल्यामुळे कार्यात यश प्राप्त होईल. नोकरीच्या ठिकाणी आपणास आपले कौशल्य दाखविण्याची संधी मिळेल. अनेक दिवसांपासून असलेली नीरसता दूर होऊन वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल. व्यापाऱ्यांना हा आठवडा अनुकूल आहे. त्यांना त्यांच्या कामात यश प्राप्त होईल. एखाद्या चांगल्या व्यावसायिक भागीदारामुळे व्यापारात खूप मोठा लाभ होऊ शकेल. ह्या आठवड्यात विद्यार्थ्यांना अभ्यासात खूप मेहनत करावी लागेल. उच्च शिक्षणात यश प्राप्त होईल. तांत्रिक विषयांचे शिक्षण घेणारे विद्यार्थी कामगिरी उंचावण्यात यशस्वी होतील. ह्या आठवड्यात आपली प्रकृती उत्तम राहील.
12 / 13
कुंभ - हा आठवडा आपल्यासाठी अनुकूल आहे. विवाहित व्यक्ती त्यांच्या वैवाहिक जीवनाचा आनंद उपभोगू शकतील. जोडीदार त्यांच्या प्रेमळ बोलण्याने व नखऱ्याने आपले हृदय जिंकून घेईल. आपणास जोडीदाराचा सहवास हवा हवासा वाटू लागेल. आपल्या नात्यात नावीन्य निर्माण होईल. प्रणयी जीवनासाठी आठवडा अनुकूल आहे. आपण आपल्या मनातील सर्व गोष्टी आपल्या प्रेमिकेस मोकळेपणाने सांगाल. आपल्या मनातील गोष्टी तिच्याही मनात असतील. तेव्हा मोकळेपणाने बोला. आठवड्याच्या सुरवातीस आपण एखादा व्यावसायिक प्रवास करण्याची संभावना आहे. ह्या प्रवासात एखाद्या व्यक्तीशी जवळीक वाढू शकते. आपणास मात्र त्याचा चांगला फायदा होईल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी सुद्धा आठवडा अनुकूल आहे. आपण आपल्या विरोधकांवर मात करून आपली कामे सहजपणे कराल. आपले वरिष्ठ सुद्धा आपल्या कामगिरीने प्रभावित होतील. हा आठवडा विद्यार्थ्यांसाठी चांगला आहे. त्यांना स्पर्धेत सुद्धा यश प्राप्त होईल.
13 / 13
मीन - हा आठवडा आपल्यासाठी खूपच चांगला आहे. आठवड्याच्या सुरवातीस आपण आपल्या प्रेमिकेस खुश करण्याचा प्रयत्न करून आपले नाते अधिक दृढ कराल. तिला एखादी मोठी व चांगली भेटवस्तू द्याल. आपण दूरवरच्या ठिकाणी फिरावयास जाऊ शकता. त्यामुळे आपले प्रणयी जीवन अधिक मधुर होईल. विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखद होईल. आपला जोडीदार कुटुंबाप्रती असलेली स्वतःची जवाबदारी ओळखून त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या कामात चांगले परिणाम मिळतील. शासनाकडून सुद्धा फायदा संभवतो. आपण जर व्यापार करत असाल तर आपण आपल्या क्षेत्रात प्रगती कराल. ह्या आठवड्यात आपल्या काही नवीन ओळखी होतील. त्याचा व्यापारात फायदा होऊन आपल्या प्राप्तीत सुद्धा वाढ होईल. ह्या आठवड्यात आपल्या खर्चात कपात होईल. आपण धार्मिक कार्यांवर सुद्धा खर्च कराल. विद्यार्थ्यांना आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे लागेल.