शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Weekly Horoscope: साप्ताहिक राशीभविष्य - १७ जुलै ते २३ जुलै २०२२; मकर राशीच्या लोकांना नोकरीत चांगला काळ, योग्य फळ मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2022 8:25 AM

1 / 12
हा आठवडा आपल्यासाठी अंशतः फलदायी आहे. आठवड्याच्या सुरवातीस आपणास चांगली प्राप्ती झाल्याने आपणास अत्यंत आनंद होईल व आपण मनाने प्रसन्न राहाल. आठवड्याच्या मध्यास खर्चात थोडी वाढ झाली तरी आठवड्याच्या अखेरीस ते नियंत्रणात येतील. आपण काही कारणाने व्यथित व्हाल व त्यामुळे मानसिक ताणास बळी सुद्धा पडाल. तेव्हा सावध राहावे. तसेच कोणत्याही प्रकारच्या चिंतेचा किंवा समस्येचा प्रभाव आपल्यावर होणार नाही ह्याची काळजी घ्यावी. व्यापारात चढ - उतार येण्याची संभावना सुद्धा आहे. व्यवसायाचा हा एक अलिखित नियम असल्याने घाबरू नये. आपण आपले काम चालूच ठेवावे. कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नये. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या कामावर लक्ष केंद्रित करण्याची पुन्हा संधी मिळेल. त्यांच्या कामाची प्रशंसा होईल.
2 / 12
हा आठवडा आपल्यासाठी खूपच चांगला आहे. आठवड्याच्या सुरवातीस आपण आपल्या कामात व्यस्त राहून आपली कामे मन लावून कराल. त्यामुळे आपले संपूर्ण लक्ष कामावरच केंद्रित होऊन आपली कामगिरी उत्तम होईल. वरिष्ठ आपल्या कामगिरीने खुश होतील. आपण आपल्या कौटुंबिक जीवनात समेट घडवून आणण्याचा प्रयत्न सुद्धा कराल. आपणास कुटुंबियांचे सहकार्य मिळेल. ते एखाद्या गोष्टी बद्धल त्यांच्या मनातील गोंधळ आपल्या समोर व्यक्त करण्याची संभावना आहे. आपण त्यांचे म्हणणे ऐकून त्यांना आवश्यकतेनुसार मदत सुद्धा करावी. आपली प्रकृती उत्तम राहील. कुटुंबात एखादे शुभ कार्य संभवते. एखादा समारंभ आयोजित होण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्ती आपल्या कामाचा आनंद घेऊ शकतील. व्यापाऱ्यांचा विकास होईल. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात तणाव निर्माण होण्याची संभावना आहे. तेव्हा थोडे सावध राहावे.
3 / 12
हा आठवडा आपल्यासाठी खूप चांगले परिणाम घेऊन येणारा आहे. आठवड्याच्या सुरवातीस आपण लांब पल्ल्याचा प्रवास करू शकाल. ह्या प्रवासा बद्धल आपण अनेक दिवसां पासून विचार केलेला असेल. आता तो केल्याने आपणास मानसिक संतोष व आनंद प्राप्त होईल. नोकरी करणाऱ्या व्यक्ती कामाचा आनंद घेऊ शकतील. आपले ज्ञान आपल्या उपयोगी आल्याने आपणास खूप फायदा होईल. हा आठवडा प्रेमीजनांसाठी खूप चांगला आहे. आपण आपल्या प्रेमिकेसह दूरवर फिरावयास जाऊ शकाल. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात प्रेमाचा वर्षाव होत राहील. आपण एकमेकांच्या सहवासाची एकही संधी सोडणार नाही. व्यापाऱ्यांना त्यांच्या व्यवसायात नवीन लोकांशी हात मिळवणी कर याची संधी मिळेल.
4 / 12
हा आठवडा आपल्यासाठी साधारण फलदायी आहे. आठवड्याच्या सुरवातीस कोणतेही महत्वाचे काम करू नये. आठवड्याचे मधले दिवस खूपच चांगले आहेत. नशिबाची साथ मिळाल्याने प्रत्येक कार्यात आपण यशस्वी व्हाल. आपल्या प्राप्तीत वाढ होईल. आपणास समाजात सन्मान प्राप्त करण्याची नवी संधी सुद्धा मिळू शकेल. कुटुंबात आपला मान वाढेल. नोकरी करणाऱ्यांना काही समस्यांना सामोरे जावे लागेल. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचा आहे. आपण आपल्या कार्यात खूप चांगली प्रगती करू शकाल. विवाहितांचे वैवाहिक जीवन तणावग्रस्त असण्याची संभावना आहे. प्रेमीजनांसाठी हा आठवडा चांगला आहे. आपण आपल्या संबंधांचा मोकळेपणाने आनंद घेऊ शकाल. विद्यार्थी आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकतील.
5 / 12
हा आठवडा आपल्यासाठी खूपच चांगला आहे. आठवड्याचे मधले दिवस काहीसे प्रतिकूल आहेत. आठवड्याच्या अखेरीस आपण आपली कामे झटपट पूर्ण करू शकाल. शारीरिक थकवा वाढून अशक्तपणा सुद्धा जाणवेल. ह्या व्यतिरिक्त मानसिक ताणामुळे आपल्या कामात अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. आठवड्याचे अखेरचे दिवस खूप चांगले आहेत. आपणास धनलाभ संभवतो. विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखद होईल. प्रेमीजनांचे प्रणयी जीवन रोमांसाने भरलेले राहील. आपण आपल्या प्रणयी जीवनाचा आनंद घेण्यासाठी दूरवर फिरावयास जाण्याचा कार्यक्रम ठरवू शकता. नोकरी करणाऱ्यांची पदोन्नती संभवते. आपल्या इच्छा पूर्ण होतील. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी खूपच चांगला आहे. दूरवरच्या ठिकाणी किंवा राज्यात काम केल्याने आपणास खूप मोठा लाभ होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगले परिणाम मिळतील.
6 / 12
हा आठवडा आपल्यासाठी अंशतः फलदायी आहे. आपण आजारी पडण्याची शक्यता असल्याने आपणास आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. आपल्या खाण्या - पिण्यावर सुद्धा आपणास लक्ष ठेवावे लागेल. आपण कामात गर्क राहाल. आपणास नशिबाची साथ सुद्धा मिळू शकते. त्यामुळे आपण नोकरीच्या ठिकाणी चांगली कामगिरी करून आपल्या वरिष्ठांना प्रिय व्हाल. आपली कुशाग्र बुद्धिमत्ता आपणास खूपच उपयुक्त होईल. ह्या आठवड्यात व्यापाऱ्यांना सुद्धा मोठा फायदा होईल. संपत्तीत वाढ संभवते. ह्या दरम्यान आपण जुन्या आठवणीत रमून जाल. प्रेमीजनांचा जर प्रेमभंग झाला असेल तर ते पुन्हा एकमेकांना भेटून आपले संबंध नव्याने सुरवात करू शकतील. विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखद होईल. विद्यार्थ्यांना अभ्यासात काही अडथळ्यांना सामोरे जावे लागू शकते.
7 / 12
हा आठवडा आपल्यासाठी सामान्य फलदायी आहे. आठवड्याच्या सुरवातीस आपण आपल्या प्रणयी जीवनात खूप व्यस्त राहाल. ह्या आठवड्यात प्रेमीजनांनी त्यांच्यातील गैरसमज दूर करून प्रेमात वाढ करण्याचा प्रयत्न करावा. आपल्या संबंधात रोमांस टिकून राहिल्याने आपणास संबंधात नावीन्य जाणवेल. विवाहित व्यक्ती आपल्या मुलांना एखादी अद्भुत भेट देऊ शकतील. पूर्वीच्या मानाने विवाहितांच्या वैवाहिक जीवनात थोडी सुधारणा होत असल्याचे दिसून येईल. प्राप्ती सामान्यच राहील. खर्चात वाढ होईल. हा आठवडा प्रकृतीच्या दृष्टीने चांगला आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्ती आपल्या कुशाग्र बुद्धिमत्तेच्या जोरावर आपली कामे वेळेवर पूर्ण करू शकतील. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी काहीसा प्रतिकूल आहे. वि या यांना अ यासात चांगले परिणाम मिळतील.
8 / 12
हा आठवडा आपल्यासाठी खूप चांगला आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्ती त्यांच्या कामात खूप प्रगती करतील. त्यांची पदोन्नती सुद्धा संभवते. त्याच बरोबर पगारवाढ होण्याची शक्यता सुद्धा आहे. आपण खूपच आनंदित व्हाल, परंतु अति आत्मविश्वासा पासून दूर राहून आपले काम अधिक चांगले करण्याचा प्रयत्न करावा. असे केल्यानेच आपण यशस्वी होत आहात तसेच पुढे सुद्धा व्हाल. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी काहीसा प्रतिकूल आहे. आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करावी, अन्यथा आपणास अडचणींना सामोरे जावे लागेल. विवाहित व्यक्ती त्यांच्या संबंधांच्या बाबतीत खूप जागृत व गंभीर होतील. आपण आपल्या वैवाहिक जोडीदाराची काळजी घ्याल. आपणास सासुरवाडी कडील लोकांशी वार्तालाप करण्याची संधी सुद्धा मिळेल. प्रेमीजनांसाठी हा आठवडा नवीन आशा घेऊन येणारा आहे.
9 / 12
हा आठवडा आपल्यासाठी नवीन आशा घेऊन येणारा आहे. आठवड्याच्या सुरवातीस आपण प्रवास करू शकाल. तसेच आपल्या एखाद्या मित्राच्या सहवासात वेळ घालवाल. त्यामुळे आपले मन प्रफुल्लित होईल. हा आठवडा प्रेमीजनांसाठी प्रतिकूल आहे. आपली प्रेमिका अडचणीत सापडण्याची संभावना आहे. विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखद होईल. आपल्या संबंधात प्रेम व रोमांस वाढेल. आपल्या संबंधात बदल कसा झाला हे आपणास समजू शकणार नाही. आपला वैवाहिक जोडीदार आपल्याप्रती अधिक आकर्षित होत असल्याचे आपणास जाणवेल. त्यामुळेच संबंध अधिक दृढ होतील. अचानक धनलाभ संभवतो. एखाद्या अफवेमुळे आपण विचलित होण्याची संभावना असल्याने सावध राहावे. नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा सामान्य आहे. कामात खूप चढ - उतार येतील याची जाणीव ठेवावी. व्यापाऱ्यांसाठी हा आठवडा चांगला आहे.
10 / 12
हा आठवडा आपल्यासाठी साधारण फलदायी आहे. आपल्या प्राप्तीत वाढ होईल. धन वाढल्याने आपले मनोबल उंचावेल. प्रकृती उत्तम राहील. आपल्यात आव्हानांना सामोरे जाण्याची हिंमत सुद्धा राहील. त्यामुळे व्यवसायात आपण जोखीम पत्करून वाटचाल कराल व त्याचा आपणास चांगला लाभ होईल. नोकरी करणाऱ्या व्यक्ती आपल्या कामाच्या बाबतीत गंभीर होतील. त्यांना त्यांच्या कामाचे यथोचित फळ मिळेल. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात तणाव निर्माण होईल. आपला वैवाहिक जोडीदार अहंकारी असल्याने आपण त्यांना समजू शकणार नाही, व त्यामुळे गैरसमज होऊन संबंधात अडचणी वाढण्याची संभावना आहे. तेव्हा थोडे सावध राहावे. हा आठवडा प्रेमीजनांसाठी खूप चांगला आहे.
11 / 12
हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. प्रकृती नरम - गरम राहील. आपली झोप कमी होण्याची शक्यता आहे. खर्चात वाढ संभवते. मानसिक ताणाचा प्रभाव आपल्यावर होणार नाही ह्याची काळजी आपणास घ्यावी लागेल. पैश्यांची आवक वाढल्याने आर्थिक स्थिती मजबूत होईल. नोकरी करणाऱ्या व्यक्ती आपल्या कामाप्रती गंभीर होतील, ज्याची आपणास गरजच आहे. कामचोर होणे आपल्यासाठी नुकसानदायी ठरेल. हा आठवडा व्यावसायिकांसाठी साधारण फलदायी आहे. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात समजूतदारपणा वाढल्याने त्यांचे वैवाहिक जीवन सुखद होईल. प्रेमीजन आपल्या प्रणयी जीवनाचा आनंद घेऊन खुश होतील. त्यांना आपल्या प्रेमिकेशी जवळीक साधता येईल.
12 / 12
हा आठवडा आपल्यासाठी साधारण फलदायी आहे. आठवड्याच्या सुरवातीस आपण मोठी गुंतवणूक करू शकाल, परंतु ह्या दरम्यान आपल्या खर्चात सुद्धा वाढ होईल. आपणास प्राप्तीचा एखादे नवीन स्रोत मिळू शकेल. आपण घरात पूजेचे आयोजन सुद्धा करू शकाल. आपल्या प्रकृतीत सुधारणा होईल. नोकरी करणाऱ्या व्यक्ती आपल्या कामात खूप मेहनत करतील. परंतु नशीब बलवत्तर असल्याने आपल्या कामात अतिरिक्त मेहनत करण्याची गरज भासणार नाही. आपली कामे आपोआप पूर्ण होतच राहतील. नोकरीचा अर्ज करण्यासाठी हा आठवडा अनुकूल आहे. हा आठवडा व्यावसायिकांसाठी खूप फायदेशीर आहे. आपल्या कामावरची पकड आपली नव्याने ओळख निर्माण करेल. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात आनंद पसरेल. प्रेमीजनांच्या प्रणयी जीवनात एखादी समस्या उदभवण्याची संभावना आहे. आपल्या प्रेमिकेची हुशारी आपणास खूप मदत करू शकेल. ती आपणास आपल्या एखाद्या कामात मदत करेल. हा आठवडा विद्यार्थ्यांसाठी चांगला आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य