शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Weekly Horoscope: साप्ताहिक राशीभविष्य - 10 ते 16 जुलै 2022; व्यापारी आणि प्रेमीजनांसाठी चांगला काळ, जाणून घ्या, कसा असेल तुमचा आठवडा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2022 9:25 AM

1 / 12
मेष - हा आठवडा आपल्यासाठी साधारण फलदायी आहे. आठवड्याच्या सुरवातीस, आपण आपला व्यवसाय व कौटुंबिक जीवन सुखद करण्याचा प्रयत्न कराल. व्यावसायिक कारणांमुळे केलेले प्रवास आपल्यासाठी लाभदायी ठरतील. नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा चांगला आहे. आपण आपल्या कामात मग्न राहिल्याने आपले काम खुलून दिसेल व आपली प्रशंसा होईल. आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा थोडा प्रतिकूल आहे. आपण आजारी पडण्याची संभावना सुद्धा आहे. विवाहितांचे वैवाहिक जीवन सामान्यच राहील. प्रेमीजनांना मात्र ह्या आठवड्यात चांगले परिणाम मिळतील. आपल्या प्रेमिकेच्या सहवासात जास्तीत जास्त वेळ घालविण्यासाठी आपणास एखादा लांब पल्ल्याचा प्रवास करण्याची संधी सुद्धा मिळू शकेल. हा आठवडा विद्यार्थ्यांसाठी चांगला आहे. आपण अभ्यासाचा आनंद घेऊ शकाल व त्यामुळे आपणास चांगले परिणाम मिळतील. आठवड्याचे अखेरचे तीन दिवस प्रवासास अनुकूल आहेत.
2 / 12
वृषभ - हा आठवडा आपल्यासाठी साधारण फलदायी आहे. ह्या आठवड्यात आपण कोणतेही नवीन काम हाती घेऊ नये. सध्या जे काही चालले आहे ते चालूच ठेवावे. हा आठवडा आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी प्रतिकूल असल्याने सावध राहावे. व्यापारात प्रगती साधण्यासाठी आगामी काळात अधिक प्रयत्न करावे लागतील. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या मेहनतीचे यथोचित फळ मिळेल. आपण खूप मेहनत कराल व त्याचीच आपणास संवय लागेल. परंतु त्याने आपली प्रकृती बिघडण्याची संभावना आहे. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात रोमांसचा वर्षाव होत राहील. प्रेमीजन आपल्या प्रेमिकेची ओळख कुटुंबियांना करून देऊ शकतील. आपल्या दोघांच्याही घरच्या लोकांत ये - जा चालू होईल. घरी काही चांगली कामे होण्याची सुद्धा संभावना आहे. आपली प्रकृती उत्तम राहील. आर्थिक दृष्ट्या हा आठवडा सामान्यच आहे. आठवड्याचे मधले दिवस प्रवासास अनुकूल आहेत.
3 / 12
मिथुन - हा आठवडा आपल्यासाठी साधारण फलदायी आहे. आठवड्याच्या सुरवातीस आपल्या प्राप्तीत वाढ होताना दिसून येईल. आता आपण नेहमीच्या प्राप्ती व्यतिरिक्त अतिरिक्त प्राप्तीसाठीचे स्रोत सुद्धा मिळवू शकाल. विवाहितांचे वैवाहिक जीवन परस्पर समजुतीने वाटचाल करेल. प्रेमीजनांना सुखद परिणाम मिळतील. आपल्यात जो गैरसमज झाला होता त्यात आता सुधारणा होऊ लागेल. व्यावसायिकांसाठी हा आठवडा खूप चांगला आहे. सरकारी निविदा मिळविण्याचा लाभ आपणास मिळू शकतो. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना स्वतःची मेहनत चालूच ठेवावी लागेल. मानसिक ताणातून आपणास दिलासा मिळेल. आपणास नशिबाची साथ मिळून खुश होण्याची संधी मिळेल. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा सामान्य आहे. आठवड्याचे अखेरचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.
4 / 12
कर्क - हा आठवडा आपल्यासाठी साधारण फलदायी आहे. आठवड्याची सुरवात खूप चांगली होऊन आपण उर्जावान व्हाल. आपले प्रणयी जीवन सुद्धा खूप चांगले राहील. आपणास आपल्या प्रेमाची अनुभूती येईल. आपण एकमेकांच्या सहवासात बराच वेळ घालवू शकाल. आपण एकत्रितपणे रात्री भोजनाचे आयोजन सुद्धा करू शकाल. हा आठवडा विवाहितांसाठी सामान्यच आहे. आपणास संबंधांचे महत्व समजू शकेल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना कामात काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. तेव्हा आपणास फक्त स्वतःच्या कामावरच लक्ष केंद्रित करावे लागेल. इतर गोष्टीने आपण व्यथित होऊ नये. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी चांगला आहे. आपणास निव्वळ आपल्या कार्याची गंभीरता समजून घ्यावी लागेल. हा आठवडा विद्यार्थ्यांसाठी चांगला आहे. आपण समजूतदारपणे आपला अभ्यास करू शकाल. आठवड्याचे सुरवातीचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.
5 / 12
सिंह - हा आठवडा आपल्यासाठी खूप चांगला आहे. आपण आपल्या कौटुंबिक जवाबदाऱ्या उत्तम प्रकारे पार पाडू शकाल. तसेच कुटुंबियांच्या सहवासात वेळ घालवाल. आपण आपल्या इच्छांचा सुद्धा विचार कराल. कामात सुद्धा आपण उत्तम समन्वय साधू शकाल. असे केल्याने आपणास चांगले परिणाम मिळतील. ह्या आठवड्यात नोकरी करणाऱ्यांसाठी कामाची पर्वणी असेल. आपण आपले काम लक्षपूर्वक कराल व त्यामुळे आपणास चांगले परिणाम मिळतील. व्यापाऱ्यांना ह्या आठवड्यात चांगली बातमी मिळेल. विवाहितांच्या वैवाहिक जीवनातील तणाव आता निवळू लागल्याने आपण आपले संबंध प्रामाणिकपणे निभावू शकाल. प्रेमीजनांना ह्या आठवड्यात मिश्र फळे मिळतील. विद्यार्थी अभ्यासाचा आनंद घेऊ शकतील. त्यांच्यात अधिक शिकण्याची इच्छा जागृत होईल, जी भविष्यात त्यांच्या उपयोगी येईल. आठवड्याचे मधले दिवस प्रवासास अनुकूल आहेत.
6 / 12
कन्या - हा आठवडा आपल्यासाठी खूपच चांगला आहे. आपण आपल्या प्रेमिकेसह एखाद्या नवीन ठिकाणी फिरावयास जाऊन वेळेचा आनंद घेऊ शकाल. आपण वॉटर पार्कला सुद्धा जाऊ शकाल. आपण आपल्या प्रेमिकेसह पावसात भिजण्याचा आनंद सुद्धा घेऊ शकाल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींच्या कामास गती येईल. त्यांची पदोन्नती होण्याची संभावना सुद्धा आहे. आपल्या हातून कोणतीही चूक होणार नाही ह्याची काळजी घेऊन आपल्या कामावर लक्ष केंद्रित करावे. व्यापाऱ्यांना त्यांच्या कामात फायदा होईल. ह्या आठवड्यात त्यांना अतिरिक्त लाभ होताना दिसून येईल. त्यामुळे त्यांच्या आनंदात भर पडेल. प्रेमीजन आपल्या प्रणयी जीवनात दृढपणे वाटचाल करतील. आठवड्याच्या अखेरच्या दोन दिवसात ते आपल्या प्रेमिकेसह रात्री भोजनास जाण्याचा कार्यक्रम सुद्धा आखू शकतील. विवाहितांसाठी हा आठवडा चांगला आहे. परस्पर समजूतदारपणामुळे संबंध दृढ होतील. आठवड्याचे सुरवातीचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.
7 / 12
तूळ - हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. प्राप्तीत वाढ होईल. पैसे आल्याने आपण खूप आनंदित व्हाल. हा आनंद आपण इतरांसह वाटून घ्याल. कौटुंबिक जीवन सुखद होईल. विवाहितांच्या जीवनात अनेक आव्हाने येतील. प्रेमीजन आपल्या संबंधांना सहजपणे समजू शकतील. आपण आपल्या प्रेमिकेसह बराच वेळ घालवू शकाल. आपल्या संबंधात प्रेम व समर्पण भावना असल्याने आपण एकमेकांना चांगले समजू शकाल. असे झाल्याने संबंधांचा पाया मजबूत होईल. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या कामाचे चांगले परिणाम मिळतील. त्यांची प्रशंसा सुद्धा होईल. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी सामान्य आहे. त्यांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात मेहनतीचे यथोचित फळ मिळेल. त्यांच्या बुद्धिमत्तेचा विकास होऊन मनोबल उंचावेल. असे झाल्यामुळे सर्व विषयांवर त्यांची पकड मजबूत होईल. हा संपूर्ण आठवडा प्रवासास अनुकूल आहे.
8 / 12
वृश्चिक - ह्या आठवड्याच्या सुरवातीस आपल्यावर थोडा मानसिक दबाव असेल. परंतु, काही कारणाने आपण आनंदित सुद्धा होऊ शकता. आपण नम्रपणे स्मित कराल व त्याच बरोबर एखादी चिंता सुद्धा व्यक्त कराल. परंतु, हे सर्व काही काळा पुरतेच असेल. खर्च वाढल्याने आपण व्यथित होण्याची संभावना असल्याने त्यावर नियंत्रण ठेवावे. आपल्या प्राप्तीत थोडी कपात संभवते. विवाहित व्यक्ती आपल्या संबंधांप्रती खूप गंभीर होतील. आपल्या वैवाहिक जोडीदारावर मोकळेपणाने प्रेम करून आपले व्यक्तिगत जीवन अधिक सुखद करण्याचा प्रयत्न करतील. आपणास आपली चूक समजल्याने ज्यांच्याशी आपण नीट वागला नसाल त्यांची क्षमा सुद्धा मागाल. हा आठवडा प्रेमीजनांसाठी खूप चांगला आहे. आपल्या प्रेमिकेशी जवळीक साधण्याची संधी मिळेल. अविवाहितांचा विवाह ठरण्याची संभावना आहे. विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षेसाठी निवड होऊन त्यात यश प्राप्तीची संभावना सुद्धा आहे. आठवड्याचे मधले दिवस प्रवासास अनुकूल आहेत. नोकरी करणाऱ्यांच्या कामात चढ - उतार येतील. त्यामुळे त्यांना कामावर अधिक लक्ष द्यावे लागेल. व्यावसायिकांसाठी हा आठवडा चांगला आहे. त्यांच्या कामात जलद गतीने प्रगती होईल.
9 / 12
धनु - हा आठवडा आपल्यासाठी सामान्य फलदायी आहे. आपण आपल्या कुटुंबास अधिक महत्व द्याल. कुटुंबीयांप्रती आपण भावुक सुद्धा व्हाल. त्याच्या बदल्यात कुटुंबीय आवश्यक असेल तेव्हा आपल्या पाठीशी उभे राहतील, जे आपल्यासाठी खूपच उपयुक्त ठरेल. विवाहितांचे वैवाहिक जीवन सामान्य असेल. समस्या आता कमी होऊ लागतील. प्रेमीजनांसाठी हा आठवडा प्रतिकूल असल्याने त्यांनी सावध राहावे. हा आठवडा नोकरी करणाऱ्यांसाठी चांगला आहे. त्यांची पदोन्नती संभवते. त्यांच्या कामाची प्रशंसा होईल. आपल्यावर मोठी जवाबदारी सोपविण्यात येऊ शकते. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी खूपच अनुकूल आहे. आपण आपल्या कामात प्रगती करू शकाल. प्रगती झाल्याने आपण आनंदित व्हाल. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा चढ - उतारांचा आहे. तेव्हा सावध राहावे. आठवड्याचे सुरवातीचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.
10 / 12
मकर - हा आठवडा आपल्यासाठी खूपच चांगला आहे. आपल्या प्राप्तीत वाढ होईल. खर्चात सुद्धा थोडी कपात होईल. प्रकृती उत्तम राहील. आपण विरोधकांवर मात करू शकाल. आपली बुद्धिमत्ता आपल्या उपयोगी येईल. त्यामुळे नोकरीत प्रगती करण्यात आपण यशस्वी व्हाल. आपल्या कामात येणारे अडथळे आता दूर होऊ लागतील. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी खूपच चांगला आहे. आपण आपल्या मेहनतीने कार्यात प्रगती करू शकाल. विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखद होईल. आपण आपल्या संबंधात प्रेमाची भर घालण्याचा प्रयत्न कराल. प्रेमीजनांच्या प्रणयी जीवनात प्रेम व आकर्षण वाढल्याने ते आनंदित होतील. विद्यार्थी अभ्यासाचा आनंद घेऊ शकतील. आठवड्याचे अखेरचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.
11 / 12
कुंभ - हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. आपण सर्व लक्ष आपल्या कामावर केंद्रित कराल. त्यामुळे आपल्या कामात ज्या चुका झाल्या होत्या त्या सुद्धा आता दूर होतील. आपल्या मेहनतीचे यथोचित परिणाम आपणास मिळेल. कौटुंबिक वातावरण चांगले असेल. कुटुंबियांच्या परस्पर प्रेमात वृद्धी होईल. नोकरी करणाऱ्या व्यक्ती आपल्या कामाचे महत्व समजू शकतील. असे असले तरी आपल्या सहकार्यांशी आपले काही वाद संभवतात. तेव्हा सावध राहावे. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी चांगला आहे. आपल्या व्यवसायास गती आल्याने आपणास चांगला फायदा होईल. प्रेमीजन आपल्या प्रेमिकेच्या कुशाग्र बुद्धिमत्तेमुळे प्रभावित झाल्याने त्यांचे प्रेमिकेप्रती प्रेम वाढेल. विवाहितांचे वैवाहिक जीवन सामान्यच असेल. विद्यार्थी अभ्यासात खूप मेहनत करून चांगले परिणाम मिळवतील. आठवड्याचे सुरवातीचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.
12 / 12
मीन - हा आठवडा आपल्यासाठी खूप चांगला आहे. आपणास नशिबाची साथ मिळेल. आठवड्याच्या सुरवातीस आपण नदी काठी फिरावयास जाऊ शकाल. आपल्या मनात धार्मिक विचार येतील. धार्मिक कार्ये केल्याने आपणास आनंद प्राप्त होईल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. कुटुंबीय एकमेकांना मदत करतील. कुटुंबियांवर प्रभुत्व मिळविण्यासाठी आपण प्रयत्न करू शकाल. नोकरीत आपणास चांगले परिणाम मिळतील. आपली कामगिरी चांगली होईल. व्यावसायिकांची कामगिरी सुद्धा चांगली होईल. ह्या आठवड्यात त्यांना त्यांच्या मेहनतीचा चांगला लाभ होऊन चांगले परिणाम मिळू शकतील. विद्यार्थ्यांना अभ्यासात प्रगतीची संधी मिळेल. विवाहित व्यक्ती आपल्या वैवाहिक जीवनात संतुष्ट व आनंदी राहतील. आपला वैवाहिक जोडीदार आपली संपूर्ण काळजी घेईल. आपण आपल्या वैवाहिक जीवनाचा आनंद घेऊ शकाल. प्रेमीजनांना गुरुदेवांचा आशीर्वाद प्राप्त होईल. आपण आपला संबंध पुढे नेण्याचा प्रयत्न करताना आपल्या प्रेमिके समोर विवाहाचा प्रस्ताव ठेवू शकाल. आठवड्याचे सुरवातीचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत. आपण दीर्घ पल्ल्याचा प्रवास करू शकाल.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य