शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

साप्ताहिक राशीभविष्य: आर्थिक लाभ होणार, कामंही मार्गी लागतील; 'या' राशींसाठी उत्तम आठवडा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2023 11:21 AM

1 / 12
मेष - आपणास आपल्या आरोग्य विषयक समस्यांकडे लक्ष द्यावे लागेल, अन्यथा आपणास त्रास होऊ शकतो. आपल्या विरुद्ध एखादा खटला चालू असल्यास ह्या आठवड्यात आपल्या बाजूने निकाल लागून आपला फायदा होण्याची शक्यता सुद्धा आहे. हा आठवडा आर्थिक दृष्ट्या अनुकूल आहे. आपल्या प्राप्तीत वाढ होईल. किरकोळ खर्च सुद्धा होतील. शासकीय - प्रशासकीय लोकांशी आपली भागीदारी होईल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी आठवडा अनुकूल आहे. आपली स्थिती उत्तम असेल. आपल्या कामगिरीमुळे आपली प्रशंसा होईल. व्यापारात किरकोळ चढ - उतार आले तरी सुद्धा व्यापार उत्तम झाल्याने व्यापाऱ्यांना हा आठवडा चांगला जाईल. वैवाहिक जीवनातील तणाव कमी होऊन परस्पर संबंधात सुधारणा होत असल्याचे दिसून येईल.
2 / 12
वृषभ - हा आठवडा आपल्यासाठी चढ - उतारांचा आहे. आठवड्याच्या सुरवातीस विनाकारण आपल्या खर्चात वाढ झाल्याने आपण त्रस्त व्हाल. आपली इच्छा नसताना सुद्धा हे खर्च आपणास करावे लागल्याने आपल्या खिशावर ताण येऊ शकतो. आपली प्रकृती बिघडण्याची संभावना असून आपण आजारी पडण्याची शक्यता असल्याने आपल्या प्रकृतीकडे लक्ष द्यावे. कामे होता होता खोळंबा होऊ शकतो. तेव्हा आपल्या कुटुंबातील वयोवृद्धांचे आशीर्वाद घ्यावेत. नोकरीत धावपळ वाढेल. आपली कामे पूर्ण करण्यास आपल्याला वेळ लागेल. हा आठवडा व्यापारासाठी उत्तम आहे. आपल्या अपेक्षेहून जास्त फायदा मिळविण्यात आपण यशस्वी होऊ शकाल. विवाहित व्यक्तींना त्यांच्या वैवाहिक जीवनात समाधान लाभेल. त्यांच्या जोडीदाराने एखादे मोठे लक्ष्य साध्य केल्यामुळे ते स्वतः खुश होतील तसेच कुटुंबीय सुद्धा खुश होतील.
3 / 12
मिथुन - हा आठवडा आपल्यासाठी मिश्र फलदायी आहे. आठवड्याच्या सुरवातीस आपण आपल्या प्राप्तीच्या बाबतीत काहीसे चिंतीत असाल. येणारा पैसा अडकू शकतो, थोडा धीर धरा. प्रकृतीत चढ - उतार होताना दिसेल. पोट दुखी होण्याची संभावना आहे. ताप सुद्धा येऊ शकतो किंवा बद्धकोष्ठता सुद्धा होऊ शकते. त्यामुळे आपण त्रासून जाल. आहारावर योग्य नियंत्रण ठेवावे. कौटुंबिक जीवनात तणाव वाढू शकतो. वाद संभवतात. वैवाहिक जोडीदाराशी संबंध ठीक राहतील. प्रणयी जीवनासाठी आठवडा अनुकूल आहे. नोकरीच्या ठिकाणी काही अडचणी वाढतील. विरोधक डोके वर काढतील. व्यापारासाठी आठवडा अनुकूल आहे. शासनाकडून काही लाभ संभवतो.
4 / 12
कर्क - हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. आपल्या कार्यक्षेत्रात आपण काहीतरी नवीन काम करून प्रसिद्धी मिळवाल. त्यामुळे आपली पदोन्नती होण्याची संभावना आहे. आपली पगारवाढ होऊ शकते. असे झाल्याने आपली आर्थिक स्थिती मजबूत होईल. आपण जर व्यापार करत असाल तर पूर्वीच्या कामांमुळे आपणास मदत होण्याची संभावना आहे. व्यापारात आपणास आपल्या मित्रांचे सुद्धा सहकार्य मिळेल. वैवाहिक जीवनासाठी हा आठवडा चांगला आहे. आपले परिश्रम यशस्वी होतील. आपल्या सासुरवाडी कडील मंडळी सुद्धा आपले वैवाहिक जीवन सुखद करण्यात आपणास पूर्ण सहकार्य करतील. त्याच बरोबर आपल्या कुटुंबियांची मानसिकता सुद्धा सहकार्य करण्याचीच राहील. प्रणयी जीवनासाठी सुद्धा हा आठवडा अनुकूल आहे.
5 / 12
सिंह - ऑक्टोबर महिन्याचा हा पहिला आठवडा आपणास अनुकूल आहे. आपण एखाद्या दीर्घ पल्ल्याच्या प्रवासात असू शकता. कदाचित आपल्या वडिलांची प्रकृती बिघडण्याच्या संभावनेमुळे त्यांच्या प्रकृतीची काळजी सुद्धा आपणास घ्यावी लागेल. आपल्या मान - सन्मानात वाढ होत असल्याचे बघून आपला आत्मविश्वास उंचावेल व आपल्या आरोग्यात सुधारणा होईल. नोकरीत धावपळ होईल. त्याच बरोबर आपणास आपली वागणुक नियंत्रित ठेवावी लागेल. काही लोकांशी आपला वाद संभवतो. ह्या व्यक्ती आपल्या वरिष्ठांच्या जवळच्या असतील, तेव्हा सावध राहावे. हा आठवडा वैवाहिक जीवनासाठी अनुकूल आहे. आपल्या वैवाहिक जीवनातील समस्या दूर झाल्याने आपण खुश व्हाल. घरात सकारात्मक वातावरण राहील. आपणास नशिबाची साथ मिळेल. प्राप्तीत वाढ होईल. आपली बँकेतील शिल्लक वाढेल. हा आठवडा प्रेमीजनांसाठी अनुकूल आहे. आपल्या मनातील भावना बोलून दाखविल्याचा फायदा होत असल्याचे सुद्धा आपणास दिसून येईल.
6 / 12
कन्या - आरोग्याशी संबंधित त्रास व आर्थिक समस्या अशा दोन्ही गोष्टी आपणास पीडा देऊ शकतात. तेव्हा आपणास स्वतःवर विश्वास ठेवावा लागेल. आवश्यकता भासल्यास आपल्या जवळच्या व्यक्ती समोर आपले मन मोकळे करून ह्या त्रासातून बाहेर पडावे लागेल. थोडी ध्यान - धारणा सुद्धा करावी कि ज्यामुळे मानसिक ताण कमी होऊ शकेल. नोकरीच्या ठिकाणी परिस्थिती आपणास अनुकूल राहील. आपले परिश्रम हेच आपले शस्त्र ठरेल. आपण जे काही प्रयत्न केले आहेत त्याने आपल्या कामात सुधारणा होईल. व्यापारात काही नवीन सौदे आपली वाट बघत असतील. आपणास फक्त डोके शांत ठेवून काम करावे लागेल. विवाहित व्यक्तीने वैवाहिक जीवनातील तणाव वाढू न देण्याची खबरदारी घ्यावी, अन्यथा त्रास वाढू शकतो.
7 / 12
तूळ - हा आठवडा आपल्यासाठी अनुकूल व उन्नतीदायक असला तरी ह्या दरम्यान आपणास अनिच्छनीय परिणाम सुद्धा मिळतील. आपणास अपेक्षित नसलेले लाभ मिळण्याची संभावना सुद्धा आहे. हा आठवडा अचानकपणे आपली व्यावसायिक भरभराट करेल, परंतु कोणतेही बेकायदा काम करू नये. अन्यथा आपणास त्रास होऊ शकतो. खर्चात वाढ होईल. आपली प्रकृती सुद्धा बिघडू शकते. आपला ताप किंवा पित्त प्रकोप वाढू शकतो. प्राप्तीत वाढ होईल. कार्यक्षेत्री पदोन्नती संभवते. आपली पगारवाढ संभवते. विवाहित व्यक्तींना त्यांच्या वैवाहिक जीवनात चढ - उतार येत असल्याचे जाणवेल. आपले वैवाहिक जीवन चांगले असले तरी जोडीदाराची प्रकृती बिघडण्याची संभावना आपणास त्रस्त करेल. प्रेमीजनांसाठी आठवडा अनुकूल आहे. आपण आपल्या प्रेमिकेस विवाहाची मागणी घालू शकाल.
8 / 12
वृश्चिक - आठवड्याच्या सुरवातीस मानसिक चिंता आपणास त्रस्त करतील व त्यामुळे आपली प्रकृती बिघडू शकते. तेव्हा थोडी काळजी घ्यावी. जमीन - जुमल्याशी संबंधित बाबीत यश प्राप्ती होईल. आपण एखादी संपत्ती मिळवू शकाल. नोकरीच्या ठिकाणी परिस्थिती आपणास अनुकूल राहील. वरिष्ठ आपल्या पाठीशी उभे राहतील. व्यापाऱ्यांसाठी आठवडा अनुकूल आहे. त्यांच्या योजना यशस्वी झाल्याचा त्यांना लाभ होईल. ह्या आठवड्यात विवाहितांचे वैवाहिक जीवन सुद्धा सुखद होईल. घरगुती वातावरण सुखावह होईल. प्रेमीजनांसाठी मात्र आठवडा चढ - उतारांचा आहे. त्यांना क्रोधास सामोरे जावे लागेल.
9 / 12
धनु - आपण आपल्या संततीवर असलेले प्रेम दर्शवाल व त्यासाठी काहीसे चिंतातुर व्हाल. मात्र असे काही करण्याची गरज नाही. ते त्यांच्या क्षेत्रात उत्तम कामगिरी करतील. आपले वैवाहिक जीवन सुखद होईल. जोडीदाराशी जवळीक वाढेल. प्रणयी जीवनासाठी आठवडा अनुकूल आहे. आपल्या प्रेमिकेस विवाहाची मागणी घालण्यासाठी हीच योग्य वेळ आहे. आपणास त्याचे सकारात्मक परिणाम मिळण्याची दाट शक्यता आहे. मित्रांसह मौज मजा करण्याची संधी मिळेल. एखादे धार्मिक पुस्तक किंवा एखादी मूर्ती खरेदी करून घरी आणू शकता. मूर्तीची पूजा सुरु करू शकता. आरोग्य उत्तम राहील. जास्त मसालेदार पदार्थ मात्र टाळावे. नोकरी करणाऱ्यांची पत वाढून नोकरीतील स्थिती मजबूत होईल. आपल्या बाजूने निकाल लागेल.
10 / 12
मकर - आपणास कुटुंबियांचे सहकार्य व समर्थन मिळाल्याने आपली कामे यशाच्या मार्गावर प्रगती करतील. नोकरी करणाऱ्यांना आपली कामे लक्षपूर्वक करावी लागतील. कामात लक्ष न लागल्यास त्रास होण्याची संभावना आहे. व्यापारात आपली बुद्धी तेज गतीने कार्य करेल व त्याचा आपणास लाभ होईल. व्यापारी वृत्तीमुळे आपण उत्तम धनार्जन करू शकाल. वैवाहिक जीवनात गोड बोलण्याने व प्रेमाने आपण आपल्या जोडीदाराच्या हृदयात आपले स्थान अधिक दृढ करू शकाल. असे झाल्याने आपले वैवाहिक जीवन सुखद होईल. प्रणयी जीवनाचा आनंद आपण उपभोगू शकाल. प्रेमिकेच्या सहवासात बराचसा वेळ घालवू शकाल. आठवड्याचे सुरवातीचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.
11 / 12
कुंभ - आठवड्याच्या सुरवातीस आपण खूपच व्यस्त राहाल. मित्रांच्या सहवासात वेळ घालवाल. एखाद्या ठिकाणी फिरावयास जाऊ शकता. असे झाल्याने आपणास नवीन तजेला मिळेल. आरोग्याकडे थोडे लक्ष मात्र द्यावे लागेल. विशेषतः मसालेदार पदार्थ खाणे टाळावे लागेल तसेच वाहन सुद्धा जपून चालवावे लागेल. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या कामाचे चांगले परिणाम मिळाले तरी आपल्या सहकार्यां बरोबर संबंधात कटुता येऊ शकते. ह्याकडे लक्ष द्यावे, अन्यथा त्याचा प्रभाव आपल्या कामावर होऊ शकतो. व्यापाराच्या दृष्टिकोनातून आठवडा चांगला आहे. सरकारी क्षेत्राकडून असलेला तणाव वाढू शकतो तेव्हा सावध राहावे. विवाहित व्यक्ती त्यांच्या वैवाहिक जीवनाचा आनंद उपभोगू शकतील.
12 / 12
मीन - आठवड्याच्या सुरवातीस आपण एखाद्या गोष्टीमुळे चिंतीत असण्याची संभावना आहे. मात्र, अशी चिंता करून काहीच निष्पन्न होणार नाही. तेव्हा अशा चिंतां पासून दूर राहा व आपल्या आरोग्याकडे लक्ष द्या. असे केल्याने आपल्या आरोग्यात सुधारणा होईल. मानसिक तणावा पासून मुक्ती मिळाल्याने आपली कामे सुरळीत होतील. आपणास नशिबाची साथ मिळाल्याने नोकरीत किंवा व्यापारात आपण उत्तम कामगिरी करून आपली प्रतिमा उंचावू शकाल. ह्या आठवड्यात व्यापारात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता आहे. शासनाकडून सुद्धा चांगला लाभ होण्याची संभावना आहे. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात काहीसा तणाव असल्याचे दिसून येईल. अशा स्थितीत जोडीदाराची मनःस्थिती बघून संवाद साधणे उचित ठरेल. प्रेमीजनांना त्यांचे प्रणयी जीवन सुखद असल्याचे जाणवेल.
टॅग्स :Zodiac Signराशी भविष्य