शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

देवीच्या त्रिशूळावर लिंबू का खोवलेले असते? श्री. श्री. रविशंकर यांनी केला खुलासा!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2022 2:51 PM

1 / 6
आपण सगळेच निसर्गाशी जोडलेले आहोत. नव्हे तर आपण निसर्गावर अवलंबूनदेखील आहोत. एवढेच नाही, तर आपल्या देवी देवतांनीदेखील नैसर्गिक घटकांना आपले शक्तीचे प्रतीक म्हणून दर्शवले आहे. त्यापैकी काही घटक यांचा देवतांशी आणि आपल्या आरोग्याशी काय घनिष्ट संबंध आहे, याबद्दल सांगताहेत श्री. श्री. रविशंकर!
2 / 6
देवीच्या त्रिशूळावर लिंबू खोवलेले असते. कारण देवी ही शक्ती दायिनी आहे. तिचे प्रतीक म्हणून शक्तिवर्धक लिंबू त्रिशूळावर अडकवले जाते. आरोग्याच्या दृष्टीने लिंबू अत्यंत गुणकारी असते. लिंबाच्या रसाच्या सेवनाने अतिरिक्त चरबी कमी होते. शौचास साफ होते. मळमळ थांबते. लिंबू रस घालून स्नान केल्यास केसाचे, त्वचेचे आरोग्य सुधारते. अन्न खाण्याची इच्छा नसणाऱ्यांना व अजीर्ण झालेल्यांनाही लिंबू गुणकारी ठरते.
3 / 6
जेजुरीच्या खंडोबाला हळद अतिशय प्रिय. म्हणून त्याच्या दर्शनाला गेलेले भक्त भंडाऱ्याची उधळण करतात. हळद ही जंतुनाशक आहे. निरोगी राहायचे असेल तर दररोज ओल्या हळदीचे लोणचे रोज खा. हळद दिव्य औषध आहे. हळदीच्या सेवनाने अनेक आजारांपासून रक्षण होते. दूध हळद प्यायल्याने तणाव कमी होतो. हळदीच्या लेपाने सूज उतरते तसेच जखमसुद्धा लवकर बरी होते.
4 / 6
तुळस कृष्णप्रिया आणि आवळा विष्णूंचे वसतीस्थान म्हणून ओळखले जाते. तुळशीत अनेक आरोग्यदायी गुणधर्म आहेत. तसेच जंतुनाशक म्हणूनही तिचा वापर केला जातो. म्हणून नैवेद्याचे ताट वाढल्यावर तुळशी दल ठेवण्याची प्रथा आहे. तुळशीचा काढा ताप, सर्दी, खोकला यावर उतारा ठरतो. तर आवळा तारुण्य देतो. केसांचे आरोग्य सुधारतो. रोग प्रतिकार शक्ती वाढवतो.
5 / 6
बेलाचे पान शंकराला प्रिय असते. बेल अत्यंत औषधी आणि पाचक असतो. बेलात रोग नष्ट करण्याची प्रचंड ताकद असते. पोटाचे विकार असतील तर बेलफळ खा नाहीतर बेलाचे सरबत प्या. रातांधळेपणा, डोकेदुखी, डोक्यातील उ नाशक, क्षय, बहिरेपणा, हृदयविकार, पोटाचे दुखणे, अजीर्ण, आम्लपित्त, मंदाग्नी, संग्रहणी, रक्तविकार, मधुमेह, जलोदर, त्वचाविकार, वात ज्वर, कमजोरी, अग्निदग्ध, व्रण गलगंड, तृषाविकार, रक्तातीसार, पित्त अतिसार आदी विकारांमध्ये बेल विशेष गुणकारी आहे.
6 / 6
अशा अनेक गोष्टी आयुर्वेदाच्या पोतडीत दडलेल्या आहेत. औषधं खाण्यापेक्षा वेळच्या वेळी नैसर्गिक पदार्थांचे सेवन करा. जेवणात फळे खाऊ नका. जेवणानंतर फळं खाण्याला आयुर्वेदाची संमती नाही. तसेच वजन नियंत्रित ठेवायचे असेल तर प्रथिन युक्त पदार्थ एकत्र खाऊ नका. सकाळी पोळी भाजी खाल्ली, तर संध्याकाळी भात खा. फळं नाश्त्यामध्ये खा. सगळे एकत्र खाऊ नका. याचबरोबर जेवणात कढीलिंब, कोथिंबीर, पुदिना, आले यांचा वापर करा. तसेच साखरे ऐवजी गुळाचा वापर करा. छोट्या छोट्या बदलांनी आयुष्य सोपे होईल आणि निरोगी आरोग्य लाभेल.
टॅग्स :foodअन्नHealthy Diet Planआहार योजना