Why is silk cloth and mat more important in worship? Find out the scientific reason!
पूजेत रेशमी वस्त्राला, आसनाला अधिक महत्त्व का असते? जाणून घ्या वैज्ञानिक कारण! By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2022 3:21 PM1 / 4रेशीम विद्युतवाहक आहे. काळोखात रेशमी वस्त्रावर हात घासला तर प्रत्यक्ष वीज निर्माण झालेली दिसते. मंत्रोच्चाराने निर्माण होणारी विद्युत रेशमी आसनाने आणि रेशमी वस्त्राने वाढते आणि धारणही करून ठेवते. 2 / 4रेशीम सत्वगुणोत्पादकही आहे. रेशमाप्रमाणेच ऊर्जा म्हणजे लोकरही विद्युत्पादक आहे म्हनूनच जंतुघ्नही आहे आणि मंत्रोत्पादक व मंत्रवाहकही आहे. धर्मशास्त्रात म्हटले आहे, `ऊर्जा वातेन शुघ्यति' म्हणजे लोकर केवळ वाऱ्याने म्हणजे वाऱ्यावर झटकल्यानेही शुद्ध होते. ती दररोज धुवावी लागत नाही. 3 / 4लोकरीचे वस्त्र उबदार असते. याचाच अर्थ ते विद्युत्पादक असते. म्हणून धर्मकर्मे, मंत्रजप, जज्ञयागादि कर्मे करताना व्याघ्याजिन, मृगाजिन, दर्भासन, रेशीम, लोकर याचे आसन यावर बसूनच ती कर्मे करावीत. म्हणजे फळसिद्धीला ती उपकारक होतात. 4 / 4म्हणून कधीही आसन घेतल्याशिवाय पूजा करू नका आणि आसन शक्यतो रेशमी कापडाचेच निवडा. तसेच शक्य असल्यास सोवळे नेसून पूजा केली असता, मंत्रोच्चारांचा परिणाम अधिक होईल आणि पूजा पूर्णत्वास जाईल. आणखी वाचा Subscribe to Notifications