Will 2022 be a year of love for your zodiac sign or will it be a year of famine? Find out!
२०२२ हे वर्ष तुमच्या राशीसाठी प्रेमाचा वर्षाव करणारे असेल की दुष्काळ दाखवणारे असेल? जाणून घ्या! By ऑनलाइन लोकमत | Published: January 01, 2022 1:00 PM1 / 13प्रेमासाठी प्रत्येक जण आतुर असतो. ते प्रेम केवळ शारीरिक स्तरावर नाही तर मानसिक, भावनिक स्तरावर आधार देणारेही असते. बोलायला, रुसायला, भांडायला आणि प्रेम करायला हक्काची व्यक्ती प्रत्येकाला हवी असते. ती व्यक्ती आपण विशेषतः जोडीदाराच्या रूपात शोधत असतो. चला तर जाणून घेऊ, या वर्षात तो शोध पूर्ण होतोय का आणि पूर्ण झालेला असेल तर जोडीदाराशी नाते आणखी दृढ होते का?2 / 13मेष राशीच्या लोकांचे प्रेमजीवन या वर्षात छान असेल. विशेषत: फेब्रुवारी आणि मार्च खूप चांगला जाईल. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत अविस्मरणीय क्षण घालवाल, पण एकमेकांच्या काही गोष्टी निराशही करू शकतात. डेटवर जाण्याच्या अनेक संधी मिळतील. विवाहेच्छुचे एप्रिलनंतर लग्नही होऊ शकते. जोडीदाराबरोबर मैत्रीपूर्ण नाते दृढ केल्यास दीर्घकाळ प्रेम वर्षाव अनुभवू शकाल. 3 / 13वृषभ राशीच्या लोकांसाठी २०२२ चे सुरुवातीचे महिने प्रेम जीवनाच्या दृष्टीने कठीण असतील. पण जसजसे दिवस सरतील तसतशी परिस्थिती सुधारत जाईल. अहंकार टाळा आणि छोट्या छोट्या चुकांना महत्त्व देऊ नका. जोडीदाराला थोडे स्वातंत्र्य द्या. मे नंतर प्रेम फुलेल. लग्नाळुंचे विवाह होऊ ठरतील, होतील. तुम्हाला मनासारखा प्रेमळ जोडीदार मिळू शकेल. जर तुम्ही तुमच्या जोडीदारावर विश्वास ठेवलात तर नाते मजबूत होईल.4 / 13मिथुन राशीच्या लोकांसाठी हे वर्ष प्रेम आणि वैवाहिक जीवनाच्या दृष्टीने चांगले राहील. वैवाहिक जीवनात चढ-उतार आले तरी तुम्ही त्यांना सामोरे जाण्यास सक्षम असाल. एप्रिलनंतर प्रेमजीवन चांगले होईल. जोडीदार तुमच्यावर प्रेम करेल. या वर्षी लग्न होण्याचीही पूर्ण शक्यता आहे. मात्र लग्न होण्यासाठी कदाचित ऑगस्टपर्यंत थांबावे लागण्याची शक्यता आहे.5 / 13कर्क राशीच्या लोकांनी प्रेमाबद्दलची भीती दूर केली तर परिस्थिती चांगली होऊ शकते. एप्रिलपर्यंत प्रेमाच्या बाबतीत तुम्ही द्विधा स्थितीत राहाल. अशा परिस्थिती टाळणे चांगले. तसे केले तरच तुमचे आणि तुमच्या पार्टनरमधील प्रेम वाढेल आणि नातेही घट्ट होईल. जोडीदाराशी प्रामाणिक राहा. विवाह बाह्य संबंधाकडे झुकू नका. महागात पडू शकते.6 / 13कर्क राशीच्या लोकांनी प्रेमाबद्दलची भीती दूर केली तर परिस्थिती चांगली होऊ शकते. एप्रिलपर्यंत प्रेमाच्या बाबतीत तुम्ही द्विधा स्थितीत राहाल. अशा परिस्थिती टाळणे चांगले. तसे केले तरच तुमचे आणि तुमच्या पार्टनरमधील प्रेम वाढेल आणि नातेही घट्ट होईल. जोडीदाराशी प्रामाणिक राहा. विवाह बाह्य संबंधाकडे झुकू नका. महागात पडू शकते.7 / 13कन्या राशीच्या लोकांसाठी २०२२ मध्ये जीवनात अडचणी येतील. तथापि, या समस्या इतरांमुळे येतील आणि या काळात तुमचा जोडीदार तुम्हाला पूर्ण पाठिंबा देईल. परस्पर समंजसपणा आणि एकमेकांचा पाठिंबा या नात्याची ताकद वेगळ्या पातळीवर घेऊन जाईल. जर तुम्हाला लग्न करायचे असेल तर जुलै नंतरचा काळ त्यासाठी चांगला आहे. विवाहित जोडप्यांनी देखील एकमेकांना पूर्ण पाठिंबा दिला पाहिजे.8 / 13तूळ राशीच्या लोकांनी आपल्या स्वभाव धर्मानुसार संतुलित वर्तन ठेवले पाहिजे. जोडीदारावर रागावणे टाळावे. तुमच्या वागणुकीने जोडीदार दुखावला जाणार नाही ना, याची काळजी घ्यावी. विवाहित जोडप्यांनी देखील एकमेकांच्या इच्छेचा आदर केला पाहिजे, तरच जीवन आनंदी होईल. खरे प्रेम ते असते ज्यामध्ये जोडीदाराला बांधून ठेवण्याऐवजी स्वातंत्र्य दिले जाते आणि त्याच्यावर विश्वास ठेवला जातो.9 / 13वृश्चिक राशीच्या लोकांचे प्रेम जीवन ठीकठाक असेल. नात्यात चढ-उतार येतील. जोडीदाराशी बोलून वाद विवाद सोडवणे चांगले राहील. एप्रिल नंतर वेळ चांगला जाईल. अविवाहितांनी आपला जोडीदार शोधण्याचा प्रयत्न करावा. काही लोकांमध्ये फूट पडण्याची परिस्थिती असेल, त्यांनीही शांततेने काम केल्यास प्रकरण मिटेल.10 / 13धनु राशीच्या लोकांचे प्रेम जीवन आधीच्या तुलनेत अधिक बहरत जाईल. जोडीदाराचे पूर्ण सहकार्य मिळेल. एकमेकांची काळजी घ्याल. काही वेळेस वाद विवादाचे प्रसंग उद्भवतील, तेव्हा तुम्ही तुमच्या मिस्कील स्वभावाने वातावरणात सहजता आणण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून वाद विकोपाला जाणार नाहीत. वर्षाअखेरीस किंवा जून जुलैमध्ये जोडीदारासोबत पर्यटनास जाऊ शकाल. 11 / 13मकर राशीच्या लोकांना या वर्षी प्रेमात ती सुंदर भावना जाणवेल, ज्यापासून ते आतापर्यंत अस्पर्शित होते. तुमच्या जोडीदारासोबत अनेक सुंदर क्षण घालवण्याची संधी मिळेल. लग्नही होऊ शकते. ज्यांचे नातेवाईक आजवर लग्नाला संमती देत नव्हते ते आता संमती देतील. एकूणच प्रेम जीवन आणि वैवाहिक जीवनासाठी संपूर्ण वर्ष खूप चांगले जाईल.12 / 13कुंभ राशीच्या लोकांची लव्ह लाईफ एप्रिलपर्यंत ठीक राहील, पण त्यानंतर प्रेम वाढवण्यासाठी केलेले प्रयत्न फळाला येतील. लग्नाचा निर्णय घेणे देखील चांगले राहील. या वर्षी असे काहीतरी घडेल जे तुम्हाला तुमच्या जोडीदाराला चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत करेल.13 / 13मीन राशीच्या लोकांच्या प्रेमजीवनासाठी हे वर्ष गेल्या वर्षीपेक्षा चांगले राहील. त्यामुळे जोडीदाराला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा आणि त्याला जास्तीत जास्त वेळ द्या. छोट्या-छोट्या गोष्टींचा ताण घेऊ नका. तुमच्या जोडीदारासोबत प्रत्येक गोष्ट शेअर केल्याने तुम्ही दोघांचेही गैरसमज दूर होतील आणि तुमच्यातील विश्वासही वाढेल. आणखी वाचा Subscribe to Notifications