शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

राहुची महादशा, गुरु दृष्टीचा प्रभाव; काँग्रेसचा एक्का चालेल? २०२४ ला राहुल गांधी PM बनतील?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2023 7:07 AM

1 / 12
Rahul Gandhi Kundali Predictions: आगामी २०२४ ला होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणीला आणि जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. भाजपला चितपट करण्यासाठी विरोधकांनी INDIA नावाची नवी आघाडी स्थापन करण्यात आली आहे. लोकसभेपूर्वी ५ राज्यात विधानसभा निवडणुका होणार असल्याचे बोलले जात आहे.
2 / 12
भारत जोडो यात्रा, मोदी आडनावाची बदनामी प्रकरणी रद्द झालेली खासदारकी आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने शिक्षेवर स्थगिती दिल्यानंतर पुन्हा खासदारकी मिळणे यातून राहुल गांधी राजकारणात आधीपेक्षा अधिक सक्रीय तसेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. अनेकविध मुद्द्यांवरून केंद्र सरकारला आणि भाजपला कोंडीत पकडायचा राहुल गांधी यांनी प्रयत्न केला. (Rahul Gandhi Astrology Kundali Predictions)
3 / 12
राहुल गांधी अतिशय ठळकपणे सक्रीय झाले आहेत. राहुल गांधी यांनी तरुणांमध्ये आपली ओळख निर्माण करण्यास सुरुवात केली आहे. राहुल गांधी अमेठी येथून लोकसभा निवडणूक लढू शकतात, असे सांगितले जात आहे. मागील वेळेपेक्षा काँग्रेस पक्ष लोकसभा निवडणुकीत चांगली कामगिरी करू शकेल का? राहुल गांधी पंतप्रधान पदाचे प्रबळ उमेदवार होतील का? प्रसंगी २०२४ ला राहुल गांधी पंतप्रधान होऊ शकतील का? राहुल गांधी यांची कुंडली काय सांगते? जाणून घेऊया...
4 / 12
राहुल गांधी यांचा जन्म १९ जून १९७० रोजी नवी दिल्लीत झाला. लग्नस्थानी तूळ राशीत गुरु ग्रह आहे. गुरुची दृष्टी भाग्य स्थानी असून, सूर्य आणि मंगळ त्या स्थानी विराजमान आहेत. तर चंद्र गुरुचे स्वामित्व असलेल्या धनु राशीत आहे. म्हणजेच राहुल गांधी यांची रास धनू आहे. अलीकडेच धनु राशीची शनीच्या साडेसातीतून मुक्तता झाली आहे. गुरुचा सौम्य प्रभाव राहुल गांधी यांच्या व्यक्तिमत्त्वावर दिसून येतो, असे म्हटले जात आहे.
5 / 12
लग्न स्थानाचा स्वामी शुक्र छाया ग्रहांमध्ये आहे. तसेच सप्तम स्थानी शनी नीचेचा आहे. यामुळे राहुल गांधी यांना काही अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे म्हटले जात आहे. चंद्राच्या सप्तम स्थानी सूर्य, मंगळ आहे. याचाही प्रतिकूल प्रभाव पडत असल्याचे सांगितले जात आहे.
6 / 12
राहुल गांधींच्या कुंडलीमध्ये चंद्रासोबत त्याच स्थानी दुसरा कोणताच ग्रह नाही. त्यामुळे केमद्रुम नामक योग तयार होतो. याने राहुल गांधींना वारंवार अपयश येते. इतरांच्या विचारांनी ते सहज प्रभावित होतात.बहुतांश वेळी बऱ्याच गोष्टींसाठी ते इतरांवर अवलंबून राहिलेले पाहायला मिळू शकतात. त्यांची दूरदृष्टी वापरण्यास असमर्थ असतात, ज्यामुळे त्यांचे नुकसान होते. या ग्रहस्थितीमुळे राहुल गांधींना कधी कधी ठोस निर्णय घेण्यात अडचण येते आणि विरोधक त्याचा गैरफायदा घेतात, असे म्हटले जाते.
7 / 12
बुध ग्रहही दोन प्रतिकूल ग्रहांनी युक्त आहे. राजकारणात सर्वात जास्त काम करणारी गोष्ट म्हणजे वाणी किंवा बोलणे वा संवाद कौशल्य. बुध ग्रहाच्या अशा प्रतिकूल स्थितीमुळे बोलण्यावर किंवा वाणीवर सर्वाधिक प्रभाव पडत असल्याचे म्हटले जात आहे. राहुल गांधी यांचे म्हणणे फारसे गांभीर्याने घेतले जात नाही. विरोधी पक्षांकडून राहुल गांधी यांची अनेकदा खिल्ली उडवली जाते.
8 / 12
सध्याची परिस्थिती बघितली तर सन २०२२ ते मे २०२४ पर्यंत राहुल गांधींच्या कुंडलीत राहुच्या महादशेत गुरुची अंतर्दशा सुरू आहे. त्यामुळेच अनेक न्यायालयीन खटले चालू आहेत. राहुच्या महादशामध्ये बृहस्पति म्हणजेच गुरुची अंतर्दशा अत्यंत प्रतिकूल मानली जाते. निवडणुकीच्या वेळी ग्रहांची स्थिती आणि गोचराबाबत विचार केल्यास, त्यावेळेस गुरु आठव्या घरात प्रवेश करेल. कुंभ राशीच्या पाचव्या स्थानी शनी असेल. मंगळ आणि राहु सहाव्या स्थानी असतील.
9 / 12
निकालाच्या वेळी सूर्य आठव्या स्थानी असेल. राहुल गांधींची कुंडली काँग्रेसचे प्रतिनिधित्व करते आणि त्यांच्या कुंडलीत मंगळ आणि राहुसारखे ग्रह सहाव्या स्थानी असतील. शनि त्रिकोणात असेल. या एकूण ग्रहस्थितीमुळे काँग्रेस पक्षाला गेल्या निवडणुकीपेक्षा कितीतरी पटीने चांगल्या जागा मिळू शकतील, असा दावा केला जात आहे.
10 / 12
राहुल गांधींच्या कुंडलीतील ग्रहस्थिती निवडणुकीच्या वेळी फारशी अनुकूल आणि त्यामुळेच २०२४ मध्ये राहुल गांधींच्या नशिबी पंतप्रधानपदाची खुर्ची येऊ शकेल, असे वाटत नाही, असा दावा केला जात आहे.
11 / 12
राहुल गांधीच्या कुंडलीत लग्न आणि गुरु वर्गोत्तम आहेत. सातव्या स्थानी योगकारक शनी आहे आणि दशमात लग्न स्वामी शुक्र विराजमान आहे. कुंडलीतील या शुभ योगांमुळे राहुल गांधींना राजघराण्यासारखे परिपूर्ण आणि समृद्ध कुटुंब लाभले. दुसरीकडे, मात्र राहुल गांधी यांच्या कुंडलीत काही प्रतिकूल योगही आहे. त्यामुळे अधिक मेहनत करूनही अपेक्षित यश साध्य करता येत नाही, असे सांगितले जाते.
12 / 12
सदर कोणत्याही दाव्यांची पुष्टी केली जात नाही. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषRahul Gandhiराहुल गांधीlok sabhaलोकसभाZodiac Signराशी भविष्यcongressकाँग्रेस