With the help of astrology, it is possible to tell about your husband character!
नारळाचे माहीत नाही, पण नवरा कसा निघेल हे ज्योतिष शास्त्राच्या मदतीने सांगता येईल! By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2022 12:51 PM1 / 7आपल्याकडे एक म्हण आहे, नवरा आणि नारळ कसा निघेल हे सांगता येत नाही. त्यामुळे ज्योतिष शास्त्राची मदत घेऊन जोडीदाराला ताडून पाहणे जरा सोपे जाईल. चला तर मग, ही उत्तम जोडीदार म्हणून सिद्ध होणारी आद्याक्षरे कोणती ते जाणून घेऊ 2 / 7अशी मुले ज्यांचे नाव 'अ' अक्षराने सुरू होते, ते आपल्या पत्नीवर खूप प्रेम करतात. आपल्या पत्नीची खूप काळजी घेतात. तिच्या छोट्यात छोट्या सुखासाठी धडपडतात. ते एक चांगले पिता, चांगले पती आणि चांगले पुत्र म्हणून सिद्ध होतात 3 / 7'क' या अद्याक्षराची मुले फारच विश्वासू असतात. ती आपल्या जोडीदाराला धोका देत नाहीत. एकपत्नीव्रत असतात. जोडीदाराला पदोपदी साथ देतात. त्यांना संसाराचा समतोल उत्तम प्रकारे साधता येतो. ते आपल्या जोडीदाराच्या विकासाला हातभार लावतात. साथ देतात. 4 / 7ज्या मुलांचे नाव प अक्षराने सुरू होते ते आपल्या जोडीदारावर खूप प्रेम करतात आणि आयुष्यभर त्यांना सुखी ठेवतात. त्यांची विनोदबुद्धी चांगली असते. ते वाद होऊ न देता संवाद साधतात. जोडीदाराला समजून घेण्याचा पुरेपूर प्रयत्न करतात. 5 / 7ज्या मुलांचे नाव र अक्षराने सुरू होते, ते बाहेरच्या जगावर राग राग करतील पण जोडीदारावर खूप प्रेम करतील, हे त्यांचे वैशिष्ट्य! त्यांचे व्यक्तिमत्त्व फणसासारखे बाहेरून काटेरी आणि आतून गोड असे असते. ते आपल्या कुटुंबाची पुरेपूर काळजी घेतात, त्यांना कुठलीही उणीव भासू देत नाहीत. 6 / 7ज्या मुलांचे नाव व अक्षराने सुरू होते ते आपला मनपसंत जोडीदार आपणहून शोधतात आणि मिळवतात. ते प्रेमविवाह करण्याला प्राधान्य देतात. ते खूप रोमँटिक असतात आणि पत्नीच्या भावनांची खूप काळजी घेतात. त्यांच्यात थोडा अहंभाव असतो, पण ते बायकोपुढे झुकते माप घेतात. 7 / 7तुमचा जोडीदार वरील दिलेल्या अद्याक्षरांपैकी एक नसेल तर वाईट वाटून घेऊ नका. आई-आजीने सांगितलेला नियम लक्षात ठेवा, कोणताही नवरा चांगला नसतोच, तो बायकोलाच चांगला घडवावा लागतो! आणखी वाचा Subscribe to Notifications