Worship the sun and experience the difference, and reap the benefits.
सूर्योपासना करा आणि फरक अनुभवा, शिवाय भरघोस फायदेही मिळवा. By ज्योत्स्ना गाडगीळ | Published: February 01, 2021 3:14 PM1 / 5नेभळट, दुर्बल, गलितगात्र, निस्तेज, चैतन्यहीन मानव, कुटुंब, समाज, राष्ट्र, संस्कृतीचा उद्धार कसा करणार? शरीराला सशक्त बनवण्यासाठी सरळ उपाय आहे, तो म्हणजे सूर्यनमस्कार. सूयोपासनेमुळे संपूर्ण व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो. आपण शरीराने स्वस्थ, मनाने सम व बुद्धीने जागृत होतो. 2 / 5माणसाचे शरीर सशक्त तसेच मेहनत करणारे असले पाहिजे. शरीर निरोगी असेल, तरच अन्य भौतिक सुखांचा उपभोग घेता येईल. सूर्यनमस्कार ही सूर्याची उपासना असली, तरीदेखील तो सर्वांग सुंदर व्यायाम प्रकार आहे. त्यामुळे शरीराच्या अंग उपांगाला व्यायाम मिळतो. सूर्यउपासनेमुळे बुद्धी तेजस्वी बनते. सूर्याचे मंत्र म्हणत नमस्कार घालावेत. आबालवृद्धांसाठी ही उपासना आशीर्वादरूपी आणि आरोग्यवर्धक आहे. 3 / 5शरीर चांगले असेल, तर मन निरोगी राहते. नित्य सूर्यदर्शनाने मानवाचे मन प्रभावी व प्रतिकारक्षम बनते. म्हणून रोज सुर्योदय आणि सूर्यास्त पहवा, असे शास्त्र सांगते.4 / 5सूर्य जगाकडून कोणतीही अपेक्षा करत नाही आणि मोबदल्यात कोणाची उपेक्षाही करत नाही. प्रामाणिकपणे, अविरतपणे आणि तितक्याच तेजाने रोज उगवतो आणि मावळतो. परंतु जाण्याआधी संपूर्ण सृष्टीला जीवनदान देऊन जातो. निष्काम कर्मयोगाचा मोठा परिपाठ सूर्याकडून मिळतो, म्हणून त्याची नित्य उपासना करावी. रोज नित्यनेमाने आपले काम करणाऱ्या व्यक्तीला वेळेची कमतरता कधीच जाणवत नाही.5 / 5सूर्योपासनेने बुद्धी तेजस्वी आणि प्रतिभासंपन्न होते. जीवनात बुद्धीला प्राधान्य देणाऱ्या ऋषींनी `ऊँ तत्सविर्तुवरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धीयो यो न: प्रचोदयात' ही सूर्य गायत्री उपासना मंत्र बनवला. या मंत्राचा आपणही वापर करावा. सूर्याला अभिवादन करावे आणि जीवन तेजस्वी बनवावे. मग तुम्ही सुद्धा सुरुवात करताय ना? आणखी वाचा Subscribe to Notifications