शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

यंदाच्या प्रेमसप्ताहात या चार राशींना होणार प्रेमदेवता प्रसन्न!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2021 16:12 IST

1 / 4
अतिशय स्पष्टवक्ते आणि रुक्ष स्वभाव अशी ओळख असणारे सिंह राशीचे जातक त्यांच्या कडक स्वभावामुळे प्रेम मिळवण्यासाठी नेहमी झुरत राहतात. परंतु, गेल्या काही दिवसात जर तुमचे कोणाशी सूर जुळत असतील, तर अधिक वेळ न घालवता, तुम्ही नात्याचा पुढचा टप्पा गाठण्यासाठी प्रयत्न करा. यश नक्की मिळेल. प्रेमळ व्यक्तिच्या सहवासात तुमचे जीवन आंतर्बाह्य बदलून जाईल. तुम्ही आधीपासून नात्यात असाल, पण नात्यात काही मतभेद निर्माण झाले असतील, तर ते दूर करण्यासाठी हा आठवडा अतिशय अनुकूल आहे.
2 / 4
व्यक्तिगत आणि सामाजिक जीवनाचा समतोल साधणे या राशीच्या जातकांना उत्तम रितीने जमते. म्हणूनच की काय, या प्रेमसप्ताहात तुम्हाला अपेक्षित असलेली प्रेमदेवतेची मूर्ती आपणहून तुमच्या भेटीस येईल. ती तुमच्या अपेक्षेपेक्षा अधिक चांगली असेल. अशी व्यक्ती भेटलीच तर तिने विचारण्याची वाट बघत बसू नका. तुम्हीदेखील पुढाकार घ्या आणि आपल्या प्रेमाची कबुली देऊन हा प्रेमसप्ताह अविस्मरणीय बनवा.
3 / 4
हा प्रेमसप्ताह आपल्या मनातील गोंधळ बाजूला सारून प्रेमाचा योग्य मार्ग दाखवणार आहे. आपली ग्रहस्थिीती उत्तम जुळून आल्यामुळे तुमच्या प्रेमकथेला योग्य वळण मिळणार आहे. मनात शंका कुशंका न ठेवता आपले प्रेम व्यक्त करा आणि जोडीदाराकडूनही प्रेम मिळवा. या अनुकूल स्थितीचा लाभ करून घ्या.
4 / 4
या राशीचे लोक प्रेमसंबंधांच्या बाबतीत उतावीळपणा करत नाहीत, ही त्यांची जमेची बाजू आहे. परंतु, संधी वारंवार येत नाही. तुम्हाला तुमच्या जोडीदाराप्रती, प्रेयसी-प्रियकराबाबतीत वाटणारे प्रेम, आकर्षण, भावना, योग्य वेळेत व्यक्त केल्या नाहीत, तर संधी निसटून जाईल. हे लक्षात घेऊन यंदा प्रेमसंधीचे सोने करा. कारण, सद्यस्थितीत तुम्हाला ग्रहांचे उत्तम पाठबळ लाभले आहे.
टॅग्स :Valentine Weekव्हॅलेंटाईन वीक