शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

घराच्या दक्षिण दिशेला तर तुम्ही घड्याळ लावले नाही ना? असेल तर आधी काढून टाका!

By ज्योत्स्ना गाडगीळ | Published: February 03, 2021 11:43 AM

1 / 6
तुमच्या घरात दक्षिण दिशेला घड्याळ लावले असेल, तर आधी घड्याळाची जागा बदला. दक्षिण दिशेचे स्वामी यमराज आहेत. म्हणून दक्षिण दिशेला घड्याळ लावू नये, असे सांगितले जाते. दक्षिण दिशेला घड्याळ लावलेल्या घरातील कुटुंबप्रमुखाला वारंवार आरोग्याच्या तक्रारी उद्भवतात, असे निदर्शनास आले आहे. म्हणून दक्षिण दिशा आणि घड्याळ हे समीकरण बदलून टाका.
2 / 6
घरातल्या खोलीच्या किंवा प्रमुख दाराच्या वर घड्याळ असेल, तर ते तिथे लावू नका. दारातून येणाऱ्या व्यक्तीवर त्याच्या वाईट लहरी परिणाम करतात. ज्याप्रमाणे काळ दाराशी येऊन ठेपला, असे आपण म्हणतो, त्यानुसार काळनिर्देशन करणारे घड्याळ दाराच्या वर लावणे तात्त्विकदृष्ट्या अडचणीचे ठरू शकते.
3 / 6
तुम्ही म्हणाल, मग घड्याळासाठी नेमकी चांगली जागा तरी कोणती? प्रश्न स्वाभाविक आहे. तर याचे उत्तर आहे, पूर्व दिशा. सूर्योदय ज्या दिशेने होतो, त्या दिशेने लावलेले घड्याळ आपल्याला चांगला काळ, रोज नवीन संधी, उज्वल भविष्य याचा दिलासा देतो. तसेच पूर्व दिशेने लक्ष्मीचेही आगमन होते, म्हणून घड्याळाच्या काट्यांबरोबर पुढे सरकणारी वेळ, तुमच्या आयुष्यात सुख, संपत्ती, वैभव आणते. म्हणून घड्याळ पूर्वेला किंवा पश्चिमेला लावावे.
4 / 6
दर तासाला टणत्कार देणारी लोलकाची घड्याळे कालबाह्य झाली. परंतु, आजही जुने ते सोने असे मानणारे लोक हौस म्हणून जुन्या पद्धतीची घड्याळे वापरणे पसंत करतात. तुम्हालाही असे लोलकाचे घड्याळ मिळाले तर अवश्य विकत घ्या आणि घरातील पश्चिम बाजूच्या भींतीवर लावा. निसटणारा काळ आणि भविष्यातील संधी यांची जाणीव करून देणारी घड्याळे आपल्याला वेळेची किंमत शिकवतात.
5 / 6
घरातून नकारात्मक ऊर्जा काढून टाकायची असेल, तर बंद पडलेली घड्याळ भंगारमध्ये देऊन टाका, नाहीर अक्षरश: फेकून द्या. काळ थांबलेला कोणाला आवडेल? कोणालाच नाही ना? मग बंद पडलेले यंत्र घरात ठेवून तरी काय उपयोग? ते वेळीच निकालात काढा.
6 / 6
घरातील रंगसंगतीला अनुसरून आपण घड्याळाचा रंग, नक्षी, आकार यांची निवड करतो. परंतु, वास्तुशास्त्रानुसार घरात काळे, नीळे आणि केशरी घड्याळ असता कामा नये. या व्यतिरिक्त अन्य कोणतेही रंग चालू शकतील. घड्याळ जर गोल आणि चौकोनी आकाराचे असेल, तर ते शुभ मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार या गोष्टींचे आपण पालन करूच, मात्र घड्याळाच्या दिशेबरोबर वेळेचेही पालन करता आले, तर आपला वैयक्तिक विकास कोणीही अडवू शकणार नाही.