शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

बोनस शेअर मिळताच 1 लाखाचे झाले 71.61 लाख! गुंतवणूकदारांची दिवाळी; मिळाला 7000% परतावा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2022 3:11 PM

1 / 10
काही दिग्गज गुंतवणूकदार फारशा पॉप्यूलर नसलेल्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यासाठी ओळखले जातात. असे शेअर्स अनेक वेळा दीर्घ मुदतीत अल्फा रिट्न देऊन जातात. गुंतवणूकदार डॉली खन्ना यांच्या पोर्टफोलिओमध्ये असलेला असाच एक शेअर पॉंडी ऑक्साइड्स अँड केमिकल्स लि. (Pondy Oxides and Chemicals Ltd) ने गुंतवणूकदारांना छप्परफाड परतावा दिला आहे.
2 / 10
डॉली खन्ना यांच्या पोर्टफोलिओतील या मल्टीबॅगर केमिकल स्टॉकने गेल्या 15 वर्षांत दोनदा बोनस शेअर जारी केले आहेत. या स्टॉकने गेल्या16 वर्षांत 7,000 टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला आहे. खरे तर या बम्पर परताव्यात दोन बोनस शेअर्सची मोठी भूमिका आहे.
3 / 10
Pondy Oxides च्या बोनस शेअरची हिस्ट्री - बीएसईच्या वेबसाइटनुसार, पॉंडी ऑक्साइडच्या शेअरने गेल्या 15 वर्षांत दोन वेळा एक्स-बोनस व्यापार केला आहे. या शेअरने 15 जानेवारी 2007 रोजी एक्स-बोनस व्यापार केला. या कंपनीने 1:10 अशा प्रमाणात बोनस शेअर दिले आहेत. म्हणजेच या कंपनीने आपल्या शेयरधारकांना प्रत्येक 10 शेयर्सवर एक बोनस शेअर दिला आहे.
4 / 10
यानंतर, पॉंडी ऑक्साइडने नुकताच 28 सप्टेंबर 2022 रोजी एक्स-बोनसचा व्यवहार केला. या स्मॉल-कॅप केमिकल कंपनी ने 1:1 प्रमाणात बोनस शेअरची घोषणा केली. याचाच अर्थ, या कंपनीच्या प्रत्येक सेअरधारकास त्याच्याकडे असलेल्या प्रत्येक इक्विटी शेअरसाठी एक बोनस शेअर दिला आहे.
5 / 10
पोंडी ऑक्साइडच्या शेअर प्राइसची हिस्ट्री - मार्च 2006 मध्ये पॉंडी ऑक्साइड्सच्या शेअरची किंमत जवळपास 18 रुपये होता, तो आता 586.05 वर पोहोचला आहे. अर्थात या काळात पॉंडी ऑक्साइडचा शेअर 3,150 टक्क्यांहून अधिक वधारला आहे. जर या केमिकल कंपनीने बोनस शेअर घोषित केला नसता, तर एका गुंतवणूकदाराला त्याच्या गुंतवणुकीवर 3,150 टक्क्यांचा परतावा मिळाला असता.
6 / 10
बोनस शेअरमुळे गुंतवणुकीवर परिणाम - पॉंडी ऑक्साइडच्या शेअरची किंमत सप्टेंबर 2006 मध्ये 18 रुपये होती. जर एखाद्या गुंतवणूकदाराने सप्टेंबर 2006 मध्ये या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती, तर त्याला कंपनीचे 5,555 शेअर्स मिळाले असते.
7 / 10
...यानंतर, जानेवारी 2007 मध्ये, या स्मॉल-कॅप केमिकल कंपनीने 1:10 बोनस शेअरची घोषणा केली. यामुळे गुंतवणूकदारांचे 555 शेअर्स वाढले. 1:10 बोनस शेअर जारी केल्यानंतर, कंपनीतील एखाद्या शेअरधारकाची शेअरहोल्डिंग 6,110 झाली असती. आता, सप्टेंबर 2022 मध्ये या मल्टीबॅगर स्टॉकने एक्स-बोनस व्यापार केला आहे. जर त्या गुंतवणूकदाराने या शेअरमध्ये दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक केली असती, तर त्याची शेअरहोंल्डींग 12,220 वर पोहोचली असती.
8 / 10
1 लाख रुपयांचे झाले 71.61 लाख रुपये - पोंडी ऑक्साइडच्या शेअरची किंमत आज 586.05 एवढी आहे. जर एखाद्या गुंतवणूकदाराने या शेअरमध्ये 15 वर्षांपूर्वी 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर, आज त्याचे (₹586.05 x 12,220) 71.61 रुपय लाख रुपये झाले असते.
9 / 10
पोंडी ऑक्साइडमध्ये डॉली खन्ना यांची हिस्सेदारी - एप्रिल ते जून 2022 पर्यंत पॉंडी ऑक्साइडच्या शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार, डॉली खन्ना यांच्याकडे कंपनीचे तब्बल 2,27,252 शेअर्स अथवा 3.91 टक्के एवढा वाटा आहे.
10 / 10
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)
टॅग्स :share marketशेअर बाजारStock Marketशेअर बाजारInvestmentगुंतवणूक