शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

१० लाख रुपयांचे केले ६७ लाख; 'या' म्युच्युअल फंडांनी ५ वर्षांत दिलाय छप्परफाड रिटर्न

By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2024 9:03 AM

1 / 8
Mutual Fund Investment : म्युच्युअल फंडात गुंतवणुकीसाठी एसआयपी हा उत्तम मार्ग मानला जातो. मात्र, म्युच्युअल फंडातून एकरकमी गुंतवणुकीच्या माध्यमातून ही मोठी रक्कम कमावता येते. एएमएफआयच्या आकडेवारीनुसार, अनेक इक्विटी म्युच्युअल फंडांनी अवघ्या काही वर्षांत गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत.
2 / 8
आज आपण अशाच ५ म्युच्युअल फंड योजनांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांनी गेल्या ५ वर्षात गुंतवणूकदारांच्या एकरकमी गुंतवणुकीत ४ पटीनं वाढ केली आहे आणि त्या सर्व स्मॉल कॅप फंड आहेत. त्यापैकी एक असा फंड आहे ज्यानं ५ वर्षात एकरकमी गुंतवणुकीत ६.७ पट वाढ केलीये.
3 / 8
एडलवाइज स्मॉल कॅप फंड - एडलवाइज स्मॉल कॅप फंडानं गेल्या पाच वर्षांत ३२.०५ टक्के परतावा दिला आहे. ५ वर्षांपूर्वी या योजनेत गुंतवलेल्या पैशात ४.१९ पटीनं वाढ झाली आहे. या योजनेत ५ वर्षांत एकरकमी १० लाख रुपयांची गुंतवणूक झाली असती तर त्याचं मूल्य आज ४१.९ लाख रुपये झाली असतं.
4 / 8
कॅनरा रोबेको स्मॉल कॅप फंड - कॅनरा रोबेको स्मॉल कॅप फंडानं गेल्या पाच वर्षांत ३६.०७ टक्के परतावा दिलाय. ५ वर्षांपूर्वी या योजनेत गुंतवलेल्या पैशात ४.३५ पटीनं वाढ झालीये. या योजनेत ५ वर्षांत एकरकमी १० लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर आज ती रक्कम वाढून ४३.५ लाख रुपये झाली असती.
5 / 8
निप्पॉन इंडिया स्मॉल कॅप फंड - निप्पॉन इंडिया स्मॉल कॅप फंडानं गेल्या पाच वर्षांत ३७.०३ टक्के परतावा दिलाय. ५ वर्षांपूर्वी या योजनेत गुंतवलेल्या पैशात ४.६६ पटीनं वाढ झाली आहे. या योजनेत ५ वर्षांत एकरकमी १० लाख रुपयांची गुंतवणूक झाली असती तर आज ती रक्कम वाढून ४६.६ लाख रुपये झाली असती.
6 / 8
बँक ऑफ इंडिया स्मॉल कॅप फंड - बँक ऑफ इंडिया स्मॉल कॅप फंडानं गेल्या पाच वर्षांत ३९.६२ टक्के परतावा दिला आहे. ५ वर्षांपूर्वी या योजनेत गुंतवलेल्या पैशात ४.९ पटीनं वाढ झाली आहे. या योजनेत ५ वर्षांत एकरकमी १० लाख रुपयांची गुंतवणूक झाली असती तर आज ती रक्कम वाढून ४९ लाख रुपये झाली असती.
7 / 8
क्वांट स्मॉल कॅप फंड - क्वांट स्मॉल कॅप फंडानं गेल्या पाच वर्षांत ४८.०१ टक्के परतावा दिला आहे. ५ वर्षांपूर्वी या योजनेत गुंतवलेल्या पैशात ६.७ पटीनं वाढ झाली आहे. या योजनेत ५ वर्षांत एकरकमी १० लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर आज ती रक्कम ६७ लाख रुपयांपर्यंत वाढली असती.
8 / 8
(टीप - यामध्ये केवळ म्युच्युअल फंडांच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
टॅग्स :InvestmentगुंतवणूकMONEYपैसा