शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

फक्त 35 पैशांमध्ये 10 लाखांचा विमा; IRCTC वरुन तिकीट बुक करताना 'हे' काम विसरू नका...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2023 8:50 PM

1 / 5
नवी दिल्ली : आपल्यापैकी अनेकजण अनेकदा रेल्वेने प्रवास करतात. रेल्वेने प्रवास करणारे बहुतांश लोक IRCTC च्या वेबसाइटवरुन ऑनलाइन तिकीट बुक करतात. पण खूप कमी लोकांना माहित आहे की IRCTC तुम्हाला तिकीट बुकिंगसह 10 लाख रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण देते. केवळ 35 पैसे खर्च करून, तुम्ही 10 लाख रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण मिळवू शकता.
2 / 5
रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी हे विमा कवच कठीण काळात एक मोठा आधार ठरू शकते. अलीकडेच, ओडिशामध्ये कोरोमंडल ट्रेन दुर्घटना घडली, अनेकांना IRCTC कडून या 35 पैशांच्या विम्याची गरज आणि महत्त्व समजले. तुमच्यापैकी अनेकजण माहितीच्या अभावामुळे या विम्यावर दावा करू शकत नाहीत किंवा त्यांना त्याचा लाभ मिळत नाही. आज आम्ही तुम्हाला याच ट्रॅव्हल इन्शुरन्सबद्दल सांगणार आहेत.
3 / 5
IRCTC वरून ऑनलाइन तिकीट बुक करताना तुम्ही 35 पैशांचा हा विमा घेऊ शकता. तिकीट बुक करताना शेवटी विम्याचा पर्याय दिसतो. यामध्ये तुम्ही 'Yes' वर क्लिक करताच तुम्हाला एसएमएस आणि ईमेलद्वारे विम्याची माहिती मिळते. 'No' निवडणारे 35 पैशांची बचत करून धोका पत्करत आहेत. 35 पैशांच्या या विम्यामुळे तुम्हाला 10000 ते 10 लाख रुपयांपर्यंतचे सुरक्षा कवच मिळते.
4 / 5
तिकिट बुक करताना तुम्ही 35 पैशांचा हा विमा निवडला की, तुम्हाला या विम्याची माहिती लगेच मेलद्वारे मिळते. या ईमेलमध्ये ट्रॅव्हल इन्शुरन्स देणाऱ्या कंपनीचे नाव, इन्शुरन्स सर्टिफिकेट नंबर, कस्टमर केअर नंबर, ईमेल आयडी आणि हेल्पलाइन नंबर दिलेला आहे. ईमेलवर विमा दस्तऐवज प्राप्त होताच, तुम्ही ते उघडले पाहिजे आणि नॉमिनीचे तपशील भरले पाहिजे. तुम्ही असे केले नाही, तर विम्याच्या रकमेचा दावा करताना खूप समस्या येऊ शकतात.
5 / 5
रेल्वे प्रवासादरम्यान 35 पैशांचे विमा संरक्षण तुम्हाला अपघात झाल्यास 10 लाख रुपयांपर्यंतचे संरक्षण देते. मृत्यू किंवा 100% अपंगत्व असल्यास 100% रक्कम मिळते. कायमचे अपंगत्व आल्यास 7.5 लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळते. दुखापत झाल्यास 2 लाख रुपये दिले जातात. दाव्यासाठी तुम्हाला अपघातानंतर 4 महिन्यांच्या आत विमा कंपनीच्या जवळच्या कार्यालयात फॉर्म आणि आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करावा लागेल. तुम्हाला हा विमा आणि त्याच्याशी संबंधित सर्व आवश्यक माहिती IRCTC च्या वेबसाइटवर मिळते.
टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेIRCTCआयआरसीटीसीbusinessव्यवसायAccidentअपघात