शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

१०० कोटींचा मुकुट, सोन्याच्या २० बोटी; ३.३ लाख कोटींची प्रॉपर्टी, तरी महालात राहत नाही हा राजा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2023 8:52 AM

1 / 10
King Maha Vajiralongkorn: लोकशाही अस्तित्वात आल्यापासून राजेशाही नाहीशी झाली आहे. पण, त्यांचा अभिमान आणि प्रेम आजही कायम आहे. संपत्ती आणि शाही खजिन्याचे मालक असलेल्या या राजांच्या कथा आणि कार्य याबद्दल आजही अनेकांकडून ऐकायला मिळतं. आज आपण ज्यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत, ते आपल्या अनोख्या जीवनशैलीसाठी जगभरात ओळखले जातात.
2 / 10
आम्ही बोलत आहोत थायलंडचे राजा महा वजिरालोंगकॉर्न यांच्याबद्दल. त्यांना थायलंडचे किंग रामा X म्हणूनही ओळखलं जातं. जगातील सर्वात श्रीमंत राजांच्या यादीत त्यांचे नाव देखील समाविष्ट आहे. त्यांच्याकडे इतकी संपत्ती आहे की कोणी कल्पनाही करू शकत नाही.
3 / 10
फायनान्शिअल टाईम्सनुसार, थायलंडच्या राजघराण्याची एकूण संपत्ती ४० बिलियन डॉलर्स म्हणजेच ३.३ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. राजा महा वजिरालोंगकॉर्न यांची खरी संपत्ती ही त्यांची देशभर पसरलेली मालमत्ता आहे. त्यांच्याकडे थायलंडमध्ये ६५६० हेक्टर जमीन आहे.
4 / 10
त्यांनी ही सर्व जमीन भाड्यानं दिलीये. त्यावर एकूण ४० हजार भाडे करार आहेत, ज्यामध्ये राजधानी बँकॉकमधील १७ हजार करारांचा समावेश आहे. या जमिनींवर मॉल, हॉटेलसह अनेक सरकारी इमारती आहेत.
5 / 10
याशिवाय किंग महा वजिरालोंगकॉर्न यांची देशातील मोठ्या कंपन्यांमध्येही भागीदारी आहे. थायलंडची दुसरी सर्वात मोठी बँक, सियाम कमर्शियल बँकेत त्यांची २३ टक्के भागीदारी आहे. त्याचवेळी, सियाम सिमेंट समूहातील औद्योगिक समूहामध्ये त्यांची ३३.३ टक्के भागीदारी आहे.
6 / 10
५४५.६७ कॅरेटचा अनोखा गोल्डन ज्युबिली डायमंड त्यांच्या मुकुटात जडलेला आहे, यावरून थायलंडच्या राजाच्या भव्यतेचा अंदाज लावता येतो. डायमंड अथॉरिटीनुसार, त्याची किंमत ९८ कोटी रुपये आहे. थायलंडच्या राजघराण्याचा राजेशाही थाट म्हणजे 'ग्रँड पॅलेस' आहे.
7 / 10
१७८२ मध्ये पूर्ण झालेला हा राजवाडा २३,५१,००० स्क्वेअर फूटांमध्ये पसरलेला आहे. पण, आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे राजा रामा X या राजवाड्यात राहत नाहीत. ‘ग्रँड पॅलेस’मध्ये अनेक सरकारी कार्यालये आणि संग्रहालये आहेत.
8 / 10
अफाट पैसा, जमीन, हिरे आणि दागिने याशिवाय थायलंडच्या राजाकडे अनेक आलिशान कार, विमाने आणि बोटी आहेत. फायनान्शिअल टाईम्सच्या वृत्तानुसार, राजा महा वजिरालोंगकॉर्न यांच्याकडे २१ हेलिकॉप्टरसह ३८ विमानं आहेत. विशेष म्हणजे यामध्ये बोईंग, एअरबस आणि सुखोई सुपरजेट सारख्या विमानांचा समावेश आहे.
9 / 10
याहूनही विशेष म्हणजे या विमानांच्या देखभालीवर दरवर्षी ५२४ कोटी रुपये खर्च केले जातात. राजा महा वजिरालोंगकॉर्नच्या कार्सच्या कलेक्शनमध्ये सर्वात महागड्या कार्सचाही समावेश आहे. यामध्ये लिमोझिन, मर्सिडीज बेंझसह ३०० हून अधिक महागड्या गाड्यांचा समावेश आहे.
10 / 10
याशिवाय रॉयल बोट (गोल्डन बोट) हे थायलंडच्या राजघराण्याचं सर्वात जुने प्रतीक मानलं जातं. या शाही बोटीला 'सुफानहॉन्ग' म्हणतात, ज्याच्यासोबत ५२ बोटींचा ताफाही चालतो. सर्व बोटींवर सोन्याचं नक्षीकाम करण्यात आलंय.
टॅग्स :Thailandथायलंड