शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

११ लाख छोटे गुंतवणूकदार, ५०० FII, ९७ म्युच्युअल फंड्स स्कीम... Paytm मुळे रडण्याची पाळी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2024 8:55 AM

1 / 7
पेटीएम पेमेंट्स बँक (PPBL) ही फिटनेस कंपनी पेटीएमची उपकंपनी सध्या मोठ्या संकटाचा सामना करत आहे. Paytm स्टॉक मार्केटमध्ये One 97 Communications या नावाने लिस्टेड आहे. केवळ लहान गुंतवणूकदारच नव्हे, तर म्युच्युअल फंड आणि परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांना (FII) सुद्धा या संकटाची कल्पना नव्हती. डिसेंबरच्या तिमाहीत त्यांनी या कंपनीतील हिस्सा वाढवला होता.
2 / 7
अवघ्या ३ दिवसांत स्टॉक ४२ टक्क्यांनी घसरला. आता ११ लाख किरकोळ गुंतवणूकदार, ५१४ एफआयआय आणि ९७ म्युच्युअल फंड स्कीम्सना पेटीएममध्ये गुंतवणूक करुन फसल्यासारखं वाटत आहेत. पेटीएम पेमेंट्स बँकेवरील संकटामुळे त्यांच्यासमोरील आव्हानं वाढली आहेत.
3 / 7
PPBL २९ फेब्रुवारीनंतर कोणत्याही ग्राहकाचं खातं, प्रीपेड इन्स्ट्रुमेंट, वॉलेट, फास्टॅग, एनसीएमसी कार्ड इत्यादी कोणत्याही ठेवी किंवा क्रेडिट व्यवहार किंवा टॉप-अप स्वीकारू शकणार नाही. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) त्यांना यासंदर्भात सूचना दिल्या आहेत.
4 / 7
डिसेंबर तिमाहीसाठी शेअरहोल्डिंग पॅटर्न असं दर्शवितं की पेटीएममधील म्युच्युअल फंड स्कीम्सचा तिमाही-दर-तिमाही हिस्सा २.७९ टक्क्यांवरून ४.९९ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. FII ची होल्डिंग २.८० टक्क्यांनी वाढून ६३.७२ टक्के झाली आहे. त्याच वेळी, २ लाख रुपयांपर्यंतची होल्डिंग असलेल्या छोट्या गुंतवणूकदारांची होल्डिंग ४.५७ टक्क्यांनी वाढून १२.८५ टक्क्यांवर गेली आहे.
5 / 7
प्रमुख FII गुंतवणूकदारांमध्ये बीएनपी परिबा आर्बिट्रेज आणि कॅनडा पेन्शन प्लॅन इन्व्हेस्टमेंट बोर्डचा समावेश आहे. पेटीएममध्ये त्यांची १ टक्क्यांहून अधिक भागीदारी आहे. मिराए म्युच्युअल फंड हा स्टॉकमधील सर्वात मोठा गुंतवणूकदार होता.
6 / 7
डिसेंबर तिमाहीच्या अखेरीस अडचणीत असलेल्या फिनटेकमध्ये तिचा २.५१ टक्के हिस्सा होता. निप्पॉन म्युच्युअल फंडाची पेटीएममध्ये १ टक्क्यांहून अधिक भागीदारी होती. अशा किमान ६ म्युच्युअल फंड योजना होत्या ज्यांचे पेटीएममध्ये १०० कोटींपेक्षा जास्त एक्सपोजर होतं.
7 / 7
रिझर्व्ह बँक २९ फेब्रुवारी रोजी पेटीएम पेमेंट्स बँकेच्या (PPBL) स्थितीचं पुनरावलोकन करेल. त्यानंतर ते पुढील निर्देश जारी करतील. रिझर्व्ह बँकेनं पेटीएम पेमेंट्स बँकेला आधीच नवीन ग्राहक जोडणं थांबवण्याचे आदेश दिले आहेत. २९ फेब्रुवारी २०२४ नंतर, पेमेंट बँक कोणत्याही ग्राहक खाते, प्रीपेड इन्स्ट्रुमेंट, वॉलेट, फास्टॅग, एनसीएमसी कार्ड इत्यादी कोणत्याही ठेवी किंवा क्रेडिट व्यवहार किंवा टॉप-अप स्वीकारू शकणार नाही. कालावधी पूर्ण झाल्यानंतर, पेटीएम पेमेंट्स बँकेच्या व्यवहारांवर बंदी घातली जाईल.
टॅग्स :Paytmपे-टीएमReserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँक