शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Post Office: पोस्टाच्या 'या' योजनेत दरमहा 1500 जमा करा, मिळतील लाखो रुपये, जाणून घ्या सविस्तर...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2021 6:56 PM

1 / 8
नवी दिल्ली : Post office scheme- मार्केटमध्ये पैशांची गुंतवणूक करण्यासाठी अनेक योजना आहेत. यापैकी अनेक योजनांवर दिलेला परतावा देखील अतिशय आकर्षक असतो. मात्र, यापैकी काही जोखीम देखील असतात.
2 / 8
बरेच गुंतवणूकदार कमी परताव्यासह सुरक्षित गुंतवणूक योजनांना प्राधान्य देतात. कारण त्या कमी जोखमीच्या असतात. जर तुम्हीही कमी जोखीम असलेला परतावा किंवा गुंतवणूक पर्याय शोधत असाल तर, तुमच्यासाठी पोस्ट ऑफिसची 'ग्राम सुरक्षा योजना' उपयुक्त ठरू शकते.
3 / 8
भारतीय पोस्टाद्वारे (Indian Post)ऑफर केलेली ही 'ग्राम सुरक्षा योजना' असा एक पर्याय आहे, ज्यामध्ये तुम्ही कमी जोखमीसह चांगला परतावा मिळवू शकता. ग्राम सुरक्षा योजनेअंतर्गत, बोनससह विमा रकमेची रक्कम किंवा 80 वर्षे पूर्ण झाल्यावर किंवा मृत्यू झाल्यास त्याचा कायदेशीर वारस म्हणून नामांकित व्यक्तीला मिळते.
4 / 8
19 ते 55 वर्षे वयोगटातील कोणताही भारतीय नागरिक ही विमा योजना घेऊ शकतो. तर या योजनेअंतर्गत किमान विमा रक्कम 10,000 ते 10 लाख रुपयांपर्यंत गुंतवली जाऊ शकते. या योजनेचे प्रीमियम पेमेंट मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक केले जाऊ शकते. प्रीमियम भरण्यासाठी ग्राहकाला 30 दिवसांचा अतिरिक्त कालावधी दिला जातो. पॉलिसी टर्म दरम्यान डिफॉल्ट झाल्यास, ग्राहक पॉलिसी पुनरुज्जीवित करण्यासाठी प्रलंबित प्रीमियम भरू शकतो.
5 / 8
विमा योजना कर्ज सुविधेसह येते, जे योजना खरेदीच्या चार वर्षानंतर कर्ज मिळू शकते.
6 / 8
ग्राहक 3 वर्षांनंतर योजना सरेंडर करणे निवडू शकतो. मात्र, अशा परिस्थितीत आपल्याला त्याचा कोणताही लाभ मिळणार नाही. योजनेचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे भारतीय पोस्टाने दिलेला बोनस आणि शेवटचे जाहीर केलेले बोनस 65 रुपये प्रति 1,000 रुपये प्रति वर्ष दिले जाईल.
7 / 8
जर कोणी 19 वर्षांच्या वयात 10 लाखांची ग्राम सुरक्षा योजना खरेदी केली. तर 55 वर्षांसाठी मासिक प्रीमियम 1,515 रुपये, 58 वर्षांसाठी 1,463 रुपये आणि 60 वर्षांसाठी 1,411 रुपये असेल. योजना खरेदीदाराला 55 वर्षांसाठी 31.60 लाख रुपये, 58 वर्षांसाठी 33.40 लाख रुपयांचा म्यॅच्युरिटी लाभ मिळेल. 60 वर्षांसाठी मॅच्युरिटी लाभ 34.60 लाख रुपये असेल.
8 / 8
नामांकित व्यक्तीचे नाव किंवा इतर तपशीलांमध्ये जसे की ईमेल आयडी, मोबाईल नंबरमध्ये कोणतेही अपडेट करायचे असल्यास ग्राहक जवळच्या पोस्ट ऑफिसशी संपर्क साधू शकतो. इतर प्रश्नांसाठी, ग्राहक टोल-फ्री हेल्पलाईन 1800 180 5232/155232 वर किंवा अधिकृत वेबसाइट www.postallifeinsurance.gov.in वर संपर्क साधू शकतात.
टॅग्स :Post Officeपोस्ट ऑफिसInvestmentगुंतवणूकMONEYपैसा