शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Laxmi Vilas Palace : १७० खोल्यांचं घर, ₹२०००० कोटींची संपत्ती; कोण आहेत जगातील सर्वात मोठ्या घराचे मालक समरजीतसिंह गायकवाड

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2024 8:41 AM

1 / 10
Laxmi Vilas Palace in Gujarat: बडोद्यातील लक्ष्मी विलास पॅलेस हे जगातील सर्वात मोठं खाजगी निवासस्थान आहे. बकिंगहॅम पॅलेसपेक्षा ४ पट मोठ्या या आलिशान घरासमोर तुम्ही सर्व काही विसरून जाल. लक्ष्मी विलास पॅलेस हा बडोद्याच्या राजघराण्याचं म्हणजे गायकवाड कुटुंबाचं निवासस्थान आहे.
2 / 10
राजवाड्याच्या एका भागात राजघराण्याचं वास्तव्य आहे, तर त्यांनी एक भाग सर्वसामान्यांसाठी खुला केला आहे, जिथे सर्वसामान्य लोक येऊन राजवाडा पाहू शकतात. या ठिकाणी महाराजा फतेह सिंह संग्रहालय उभारण्यात आलंय.
3 / 10
लक्ष्मी विलास पॅलेसची उभारणी गायकवाड घराण्याचे महाराजा सयाजीराव गायकवाड-तिसरे यांनी १८९० केली होती. सध्या महाराजा समरजीतसिंह गायकवाड आणि त्यांच्या पत्नी महाराणी राधिकाराजे गायकवाड हे आपल्या कुटुंबासह या राजवाड्यात राहतात.
4 / 10
समरजीतसिंह गायकवाड यांचा जन्म २५ एप्रिल १९६७ रोजी झाला. रणजितसिंह प्रतापसिंह गायकवाड आणि शुभांगिनी राजे यांचे ते एकुलते एक चिरंजीव आहेत. डेहराडूनच्या दून स्कूलमध्ये त्यांनी आपलं शिक्षण घेतलं. समरजितसिंग गायकवाड हे माजी क्रिकेटपटू आहेत.
5 / 10
२०१२ मध्ये महाराजा रणजितसिंह गायकवाड यांच्या निधनानंतर समरजीतसिंह गायकवाड हे नवे महाराजा बनले. ते सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूही होते. समरजीतसिंह गायकवाड यांनी रणजी करंडकात बडोद्याचं प्रतिनिधित्व केलंय. ते सहा प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. बडोदा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिलंय.
6 / 10
लक्ष्मी विलास पॅलेस हे जगातील सर्वात मोठं खाजगी निवासस्थान म्हणून ओळखलं जातं. राजवाड्याचं एकूण क्षेत्रफळ ३,०४,९२,००० चौरस फूट आहे. लंडनच्या रॉयल पॅलेसशी तुलना केल्यास बकिंगहॅम पॅलेस ८,२८,८२१ चौरस फुटांवर पसरलेला आहे. हा राजवाडा बांधण्यासाठी १२ वर्षे लागली. चार्ल्स फेलो चिशोल्म यांनी या राजवाड्याची रचना केली.
7 / 10
किंमतीबद्दल बोलायचं झालं तर लक्ष्मी विलास पॅलेस २७,००,००० रुपये म्हणजेच १,८०,००० पौंडमध्ये बांधण्यात आला होता. ज्या भागात राजवाडा बांधण्यात आला आहे, त्या भागातील मालमत्तेची किंमत सध्या प्रति चौरस फूट ८००० रुपयांपेक्षा अधिक आहे. त्यानुसार तुम्ही किंमतीचा अंदाज लावू शकता.
8 / 10
संपूर्ण राजवाडा, गार्डन एरिया, गोल्फ कोर्स आदींसह हा राजवाडा सुमारे ७०० एकरमध्ये पसरलेला आहे. अशा प्रकारे याची किंमत २,४३,९३,६०,००,००० रुपयांच्या जवळपास आहे. म्हणजेच या राजवाड्याची किंमत सुमारे २५००० कोटी रुपये आहे. रिअल इस्टेट मार्केटच्या दरानुसार ही केवळ अंदाजित किंमत आहे.
9 / 10
समरजीतसिंह गायकवाड यांना कुटुंबाकडून २० हजार कोटी रुपयांची संपत्ती आणि राजा रवी वर्मा यांची अनेक पेंटिंग्स वारशानं मिळाली आहेत. त्यांच्याकडे सोन्या-चांदीचे दागिनेही आहेत. गायकवाड कुटुंबीय गुजरात आणि वाराणसीतील १७ मंदिरांचे ट्रस्ट देखील सांभाळतात.
10 / 10
समरजीतसिंह गायकवाड हे राजकारणातही सक्रिय आहेत. त्यांनी २०१४ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र २०१७ पासून ते राजकारणात फार सक्रिय नाहीत. २००२ मध्ये त्यांनी राजकुमारी राधिकाराजे गायकवाड यांच्याशी विवाह केला. त्यांना दोन मुलीही आहेत.
टॅग्स :Gujaratगुजरातbusinessव्यवसाय