शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

२०० रुपयांची बचत अन् तुम्ही मालामाल; LIC ची ही योजना लाभदायी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2023 5:32 PM

1 / 7
गुंतवणुकीचा विचार मनात आल्यास आजही एलआयसी म्हणजे भारतीय आयुर्विमा संस्था हीच सर्वात विश्वासनीय मानली जाते. त्यामुळेच, देशात एलआयसीत मोठी गुंतवणूक आहे.
2 / 7
एलआयसीकडूनही ग्राहकांसाठी सातत्याने नवनवीन ऑफर्स आणल्या जातात. त्यातील अनेक योजना लोकप्रिय आहेत. आज आपण एलआयसीच्या अशाच एक योजनेची माहिती घेऊया
3 / 7
एलआयसीच्या या योजनेत तुम्ही केवळ २०० रुपयांपासूनची गुंतवणूक करू शकता. त्यातून तुम्हाला तब्बल २८ लाख रुपयांपर्यंतचा लाभ मिळू शकेल. सुरक्षा आणि बचत या दोन्ही बाबतीत ही योजना लाभदायी आहे.
4 / 7
एलआयसी जीवन प्रगती प्लॅनमध्ये नोंदणी केल्यानंतर तुम्ही दररोज २०० रुपयांची गुंतवणूक कराल. तर, एक महिन्यात तुमचे ६ हजार रुपये होतात. तर वर्षाकाठी ७२ हजार रुपये जमा होतात.
5 / 7
म्हणजेच वर्षाला ७२ हजार रुपयांची गुंतवणूक तुम्हाला जीवन प्रगती प्लॅनमध्ये करायची आहे. या योजनेत तुम्ही २० वर्षांपर्यंत रक्कम जमा केल्यास तुम्हाला मॅच्युरिटीवेळी २८ लाख रुपयांचा परतावा मिळेल.
6 / 7
या योजनेंतर्गत जर पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास एन्शुरन्सची रक्कम, सिंपर रिवर्सनरी बोनस आणि फायनल बोनस एकत्रित करुन एकूण रक्कम वारसांना दिली जाते.
7 / 7
देशात अनेक नागरिकांनी एलआयसीच्या जीवन प्रगती योजनेत गुंतवणूक केली आहे. त्यामुळेच, तुम्ही गुंतवणुकीसाठी एखादी चांगली योजना शोधत असाल, तर जीवन प्रगती योजना तुमच्यासाठी अत्यंत लाभदायी आहे.
टॅग्स :LIC - Life Insurance CorporationएलआयसीMONEYपैसाInvestmentगुंतवणूक