शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

2,000 Rupees Note: मुश्किलीनं वापरल्या जातात २ हजारांच्या नोटा; RBI गव्हर्नर म्हणाले, “डेडलाईन वाढू…”

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2023 11:53 AM

1 / 8
देशातील बँकांमध्ये आजपासून २००० रुपयांच्या नोटा बदलण्याची आणि जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. बँका २००० रुपयांच्या नोटांच्या रिव्हर्स फ्लोचे व्यवस्थापन करण्याच्या तयारीत आहेत.
2 / 8
रिझव्‍‌र्ह बँकेने बँकांना बदली करण्यासाठी जमा केलेल्या नोटांच्या आणि जमा केलेल्या नोटांच्या मूल्याचे वेगवेगळे दैनंदिन रेकॉर्ड ठेवण्यास सांगितलंय. दरम्यान, आवश्यक असल्यास हा डेटा मागवला जाणार असल्याचं रिझर्व्ह बँकेनं स्पष्ट केलंय.
3 / 8
तर दुसरीकडे सध्या उकाडा मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे ग्राहकांची गैरसोय होऊ नये यासाठी वेटिंग रुम आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याचे निर्देशही रिझर्व्ह बँकेनं दिलेयत. रिझर्व्ह बँकेनं नुकताच २ हजार रुपयांच्या नोटा चलनातून मागे घेण्याचा निर्णय घेतलाय.
4 / 8
आरबीआयने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, क्लीन नोट पॉलिसी अंतर्गत २ हजारांची नोट चलनातून बाहेर काढली जात आहे. रिझर्व्ह बँकेनं लोकांना ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत २ हजार रुपयांची नोट बँकांमध्ये बदलून किंवा जमा करण्यास सांगितलंय.
5 / 8
रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सोमवारी माध्यमांशी संवाद साधला होता. ३० सप्टेंबर २०२३ नंतर मुदत वाढवता येऊ शकते असं दास म्हणाले होते. मात्र, हा निर्णय दोन हजार रुपयांच्या नोटांच्या संख्येच्या आधारे घेतला जाणार आहे.
6 / 8
एचडीएफसी बँकेनं (HDFC) आपल्या ग्राहकांना यासंदर्भात एक ई-मेल पाठवला आहे. ग्राहक दररोज २० हजार रुपयांच्या मर्यादेसह २ हजार रुपयांच्या नोटा बदलू शकतात, असं त्यात नमूद करण्यात आलंय.
7 / 8
दरम्यान, पेट्रोल पंप आणि ग्राहकोपयोगी वस्तूंसह अनेक व्यावसायिक आस्थापनांकडे २ हजार रुपयांच्या नोटा अधिक येत आहेत. तर दुसरीकडे फूड डिलिव्हरी ॲप झोमॅटोनं दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारपासून त्यांच्या प्लॅटफॉर्मवरील ७२ टक्के कॅश-ऑन-डिलिव्हरी ऑर्डरचे पैसे २ हजार रुपयांच्या नोटांमध्ये दिले गेले आहेत.
8 / 8
बँक ऑफ बडोदाच्या रिसर्च नोटनुसार एकूण २००० रुपयांच्या ५० टक्के नोटा बँकांमध्ये जमा झाल्या, तर ठेवींमध्ये १.८ लाख कोटी रुपयांची वाढ होईल असं सांगण्यात आलंय.
टॅग्स :Reserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँकMONEYपैसाShaktikanta Dasशक्तिकांत दास