शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

२५ लाख लग्नांचा उडणार बार; होणार ३ लाख कोटींचा खर्च

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2022 7:25 AM

1 / 8
यंदाच्या सणासुदीच्या हंगामात २.५ लाख कोटी रुपयांचा व्यवसाय होण्याची शक्यता आहे. सणासुदीच्या हंगामानंतर १४ नोव्हेंबरपासून लग्नाचा हंगाम सुरू होईल. पुढील वर्षी जून-जुलैपर्यंत तो चालेल. डिसेंबरअखेरपर्यंत देशात २५ लाख विवाह सोहळे होतील, तसेच त्यावर ३ लाख कोटी रुपये खर्च होतील, असा अंदाज आहे.
2 / 8
कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (कैट) ही माहिती दिली आहे. कैटने म्हटले की, कोरोनाचा फटका बसल्यानंतर यंदा लग्नाचा हंगाम तेजीत आहे. ८० टक्के विवाहस्थळे आणि मेजवानी हॉल आताच बुक झाले आहेत. बुकिंगमध्ये ३०% वाढ झाली.
3 / 8
मॅरिएट इंटरनॅशनल हॉटेलच्या मनीषा दिवाण यांनी सांगितले की, यंदा विवाहविषयक व्यवसाय कोविडपूर्व पातळीच्या पुढे गेला आहे. महसुलात ४० टक्के वाढ होण्याची शक्यता आहे.
4 / 8
२५%दरवर्षी वाढ - सध्या देशात दरवर्षी १.१० कोटी विवाह होतात. मॅट्रिमॉनी डॉट कॉमनुसार विवाहात दरवर्षी २५% वाढ होते. सध्या ८ लाख कोटी रुपयांचा असलेला विवाह बाजार पुढील १० वर्षांत ४१ लाख कोटी रुपयांचा होईल.
5 / 8
सर्वाधिक व्यस्त तारखा - नोव्हेंबरमध्ये १४, २०, २१, २४, २५, २७, २८ आणि ३० या तारखांना हॉटेलांचे सर्वाधिक बुकिंग आहे. डिसेंबरमध्ये ४, ५, ७, ८, ९ व १४ या तारखांना सर्वाधिक बुकिंग आहे.
6 / 8
छोट्या शहरांत बुकिंग वाढ - मोठ्या शहरांसोबतच कोल्हापूर, नागपूर, नवी मुंबई, नाशिक, जयपूर, इंदौर, आग्रा, पाटणा यासारख्या टिअर-२ आणि टिअर-३ शहरांतही हॉटेलांच्या बुकिंगमध्ये २५ ते ३० % वाढ झाली आहे. दुबई, अमेरिका, थायलंड, सिंगापूर, फ्रान्समध्ये डेस्टिनेशन वेडिंगसाठी चौकशी ६० टक्क्यांनी वाढली आहे.
7 / 8
आठवड्यात सोने २,५०० रुपयांनी स्वस्त - या वर्षीही सोने खरेदीत वाढ होण्याची शक्यता आहे. दिवाळीपूर्वी एका आठवड्यात सोन्याच्या किमती प्रति १० ग्रॅम २,५०० रुपयांनी उतरल्या असून, ग्राहकांना सोने खरेदीची संधी चालून आली आहे.
8 / 8
देशाचा विवाह बाजार? २५% ते ३०% दराने दरवर्षी वाढत आहे विवाह बाजार. ६.६० ते ८.२५ लाख कोटी रुपयांचा आहे विवाह बाजार. ५० कोटी अविवाहित आहेत देशात. ६ कोटी लोक विवाहयोग्य.
टॅग्स :marriageलग्नbusinessव्यवसाय