शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

  • मुंबई उपनगरातील भांडुपमध्ये सर्वाधिक ६१.१२ टक्के मतदान
  • महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही
  • एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
  • बिटकॉइन घोटाळ्यातील ऑडिओ क्लिपमध्ये आवाज सुप्रिया सुळे आणि पटोलेंचाच; अजित पवारांचा दावा
  • पुणे जिल्ह्यात दुपारी १ वाजेपर्यंत २९.०३ टक्के मतदान.
  • गडचिराेली - मुलचेरा तालुक्यात १११ वर्षांच्या आजीने प्रत्यक्ष बुथवर जाऊन केले मतदान
  • केदार दिघेंवर पैसे वाटप केल्याचा शिंदे गटाचा आरोप, पोलिसांत गुन्हा दाखल
  • Jio युजर्स सतर्क व्हा! तुमच्या एका चुकीमुळे कॉल हिस्ट्री दुसऱ्याच्या हाती लागू शकते
  • झारखंडने महाराष्ट्राला पछाडले! तिकडे दुपारी एक वाजेपर्यंत ४७.९२ टक्के, इकडे एवढेच मतदान
  • दुपारी दीड वाजेपर्यंत अहिल्यानगर जिल्ह्यात सरासरी 32 टक्के मतदान
  • लातूर जिल्ह्यात दुपारी १ वाजेपर्यंत ३३.२७% मतदान
  • महाविकास आघाडीमधील ठाकरेंच्या शिवसेनेचे कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघाचे उमेदवार केदार दिघे आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांविरोधात कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
  • सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघात दुपारी एक वाजेपर्यंत सरासरी एकूण २९.४४% मतदान झालेले आहे
  • सपाला मतदान करण्यास विरोध केला म्हणून तरुणीची हत्या; मैनपुरी हादरली, बलात्काराचाही संशय
  • PM नरेंद्र मोदींचा जगात डंका; आता गयाना आणि बार्बाडोसकडून 'सर्वोच्च सन्मान' जाहीर!
  • रत्नागिरी जिल्ह्यात मतदानाला उत्साही सुरुवात, ११ वाजेपर्यंत २२.९३ टक्के मतदान
  • कोल्हापुरातील शिरोलीत भगवी टोपी घालण्यावरुन हिंदूत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते आणि पोलिस यांच्यात वाद
  • हर्षवर्धन पाटील यांनी बावडा येथे सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क
  • भुसावळ रेल्वे विभागाच्या डीआरएम इति पांडेय यांनी भुसावळ येथील डी.एस. हायस्कूल केंद्रात मतदानाचा हक्क बजावला.
  • आमदार राजू कारेमोरे त्यांच्या पत्नी रंजिता कारेमोरे व मुलगी वैभवी व वैभव सहकुटुंब त्यांची मूळ गाव एकलारी येथील मतदान केंद्रावर मतदान करताना.
  • ठाणे जिल्ह्यात ११ वाजेपर्यंत १६.६३ टक्के मतदान
  • केंद्रीय सहकार आणि नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पत्नी मोनिका आणि कन्या सिद्धी यांच्यासमवेत कोथरूड येथील एमआयटी स्कुलमध्ये मतदानाचा हक्क बजावला.
  • १०३ वय वर्ष असणारे स्वातंत्र्यसैनिक जी.जी. पारिख यांनी मलबार हिल मतदार संघात मतदानाचा हक्क बजावला.
  • मुलुंड म्हाडा कॉलनीत राहणाऱ्या प्रणव पालवे (२१) या तरुणाने दोन्ही डोळ्यांनी दिसत नसतानाही पहिल्यांदा मतदानाचा हक्क बजावला.
  • ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन व त्यांच्या पत्नी साधना महाजन यांनी जामनेर येथील मतदान केंद्रात मतदानाचा हक्क बजावला.
  • अकोला जिल्ह्यात सकाळी ११ वाजेपर्यंत सरासरी १६.३४ टक्के मतदान!
  • विधानसभा निवडणुकीत 'आप' कोणाला तिकीट देणार? अरविंद केजरीवालांकडून मोठा खुलासा
  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कल्याण-डोंबिवलीचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी ठाणे येथील वागळे इस्टेट येथील एलिमेंट आयटी पार्क येथील मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला.
  • सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघात सकाळी सात ते अकरा या वेळेत 15.66% मतदान झालेले आहे.
  • दुसऱ्या सत्रात नाशिकमध्ये वाढला मतदानाचा टक्का
  • ठाणे - येणारे सरकार पूर्णपणे महायुतीचं, बहुमताचं असेल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मतदानानंतर प्रतिक्रिया.
  • नाशिक : जिल्ह्यात सकाळी ११ वाजेपर्यंत सरासरी १८.८२ टक्के मतदान. शहरात सर्वाधिक मध्य मतदारसंघात १८.४२टक्के मतदान. जिल्ह्यात दिंडोरी मतदारसंघात २६.४१टक्के तर मालेगाव मध्यमध्ये २२.७६ टक्के मतदान.
  • रायगड जिल्हा ७ विधानसभा मतदारसंघ सकाळी ७ ते ११ या कालावधीत २०.४०% मतदान
  • कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघात ११ वाजेपर्यंत १८.२२ टक्के मतदान झाले.
  • सकाळच्या दोन तासांत नाशिक शहरात सरासरी ६ टक्के मतदान
  • अकोल्यात जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अजित कुंभार यांनी मतदान केंद्राची पाहणी करीत, मतदान प्रक्रियेची माहिती घेतली. ज्येष्ठ मतदारांशी संवाद साधला!
  • वर्सोवा विधानसभेच्या महायुतीच्या उमेदवार डॉ.भारती लव्हेकर यांनी आज सकाळी चार बंगला येथील ग्यान केंद्र शाळेत मतदानाचा हक्क बजावला.
  • नितीन गडकरी यांनी सहपरिवारासोबत टाऊन हॉल महाल येथे मतदानाचा हक्क बजावला.
  • जळगाव : पळासखेड ता. भडगाव येथे सकाळी १०.३० वाजेपर्यंत १८००पैकी ३०जणांनी मतदानाचा हक्क बजावला होता.
  • पोलीस आयुक्त मुंबई विवेक फणसळकर यांनी बजावला मतदानाचा अधिकार
  • तिरोडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजय रहांगडाले व गोंदिया विधानसभा मतदारसंघाचे आमदार विनोद अग्रवाल यांनी कुटुंबीयांसह बजाविला मतदानाचा अधिकार.
  • विषारी हवा, प्रदूषणामुळे परिस्थिती गंभीर; दिल्ली सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होमचा निर्णय
  • राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी बजावला मतदानाचा अधिकार
  • नांदेड: रवी नगर भागात एक तासापासून ईव्हीएम बंद आहे, मतदार प्रतीक्षेत, दोन मशीनमध्ये झाला बिघाड, १८२ मतदान केंद्र क्रमांक
  • सोलापूर : सोलापुरातील सर्वच मतदान केंद्रावर मतदानास प्रारंभ; बूथ प्रमुख, नेतेमंडळी व पक्षाच्या प्रमुखांसोबत कार्यकर्त्यांचे मतदान सुरू

LIC IPO मध्ये गुंतवणूक करताना मिळणार ३ पर्याय; अवघ्या ३० सेकंदात जाणून घ्या कसा कराल अर्ज?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2022 3:43 PM

1 / 8
भारतीय आयुर्विमा महामंडळाचा (LIC) आयपीओ ४ मे रोजी खुला होणार आहे. या आयपीओमध्ये रिटेल गुंतवणूकदार ९ मेपर्यंत गुंतवणूक करू शकणार आहेत. या आयपीओमध्ये गुंतणूकदार मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करतील अशी सरकारला अपेक्षा आहे. यात बहुतांश गुंतवणूक पहिल्यांदाच एखाद्या आयपीओमध्ये गुंतवणूक करणारे म्हणजे नवखे असणार आहेत. LIC IPO ची बेस प्राइज बँड ९०२ रुपयांपासून ९४९ रुपये ठेवण्यात आली आहे.
2 / 8
एलआयसीच्या आयपीओला अर्ज दाखल करताना गुंतवणूकदारांना पर्याय निवडताना अडचणींना सामोरं जावं लागू शकतं. विशेषत: जे लोक पहिल्यांदाच एकाद्या आयपीओमध्ये गुंतवणूक करणार आहेत अशांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. कारण या आयपीओमध्ये गुंतवणूकदार म्हणून तुम्हाली तीन पर्याय असणार आहेत. त्यातील एक पर्याय निवडावा लागणार आहे.
3 / 8
एलआयसीच्या आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याची सोपी पद्धत आपण जाणून घेऊयात. ज्यात तुम्ही केवळ ३० सेकंदात तुमचा योग्य पर्याय निवडू शकता. कोणत्याही प्रकारच्या आयपीओमध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुमचं डिमॅट अकाऊंट असणं बंधनकारक आहे.
4 / 8
जेव्हा तुम्ही कोणत्याही ब्रोकरेज हाऊसच्या डिमॅट अकाऊंटमधून LIC च्या IPO साठी अप्लाय कराल तेव्हा गुंतवणूकदार कॅटेगरीमध्ये तीन पर्याय दिसून येतील. यात 1. New, 2. Policyholder, 3. Employee असं तीन पर्याय असतील.
5 / 8
जर तुमच्याकडे एलआयसीची पॉलीसी आहे. म्हणजेच तुम्ही LIC पॉलिसीधारक आहात. तर तुम्हाला Policyholder पर्याय निवडावा लागेल. या कॅटेगरीची निवड केल्यानंतर तुम्हाला एलआयसीच्या आयपीओमध्ये १० टक्के आरक्षण प्राप्त होईल. याशिवाय पॉलिसी धारकांसाठी आयपीओमध्ये प्रति शेअर ६० रुपयांचा डिस्काऊंट देखील देण्यात आला आहे. जर तुम्ही पॉलिसीधारक कोट्यातून अप्लाय करत आहात तुम्हाला अपर प्राइस बँडच्या हिशोबानुसार किमान (९४९-६०= ८८९x१५= 13,335 रुपये) एकूण १३ हजार ३३५ रुपये गुंतवावे लागणार आहेत.
6 / 8
तुम्ही जर एलआयसीचे कर्मचारी आहात तर तुम्हाला Employee पर्याय निवडावा लागेल. एलआयसी कर्मचाऱ्यांना या आयपीओमध्ये अप्लाय केल्यानंतर प्रति शेअर ४५ रुपयांची सूट मिळणार आहे. अपर प्राइज बँडनुसार त्यांना एका लॉटच्या अर्जासाठी १३,५६० रुपये गुंतवावे लागणार आहेत.
7 / 8
तुमच्याकडे जर एलआयसीची पॉलिसी नाही किंवा तुम्ही एलआयसीची कर्मचारी देखील नाही. मग तुम्हाला सामान्य कॅटेगरीची निवड करावी लागेल. म्हणजेच तुम्ही New हा पर्याय निवडून अर्ज करू शकता. यात शेअरच्या एका लॉटसाठी तुम्हाला १४,२३५ रुपये मोजावे लागतील.
8 / 8
एलआयसी आयपीओच्या माध्यमातून सरकार आपला ३.५ टक्क्यांचा हिस्सा विकण्याच्या तयारीत आहे. यातून २१ हजार कोटी रुपये जमविण्याचा सरकारचा मानस आहे. यापद्धतीनं एलआयसीचा आयपीओ आजवरच्या भारतीय शेअर मार्केटच्या इतिसाहासातील सर्वात मोठा आयपीओ ठरण्याची शक्यता आहे. सरकारनं आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये निर्गंतवणुकीतून ६४ हजार कोटी रुपये जमविण्याचं लक्ष्य ठेवलं आहे.
टॅग्स :Lic IPOएलआयसी आयपीओLIC - Life Insurance Corporationएलआयसी