30 lakh people will be unemployed in the it sector india 2022 this is the big reason
Job Crisis: २०२२ पर्यंत होऊ शकते IT क्षेत्रात ३० लाख कर्मचाऱ्यांची कपात; या प्रमुख कंपन्यांची तयारी By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2021 3:21 PM1 / 15कोरोनाच्या महासाथीमुळे यापूर्वीच अनेक क्षेत्रांवर मोठा परिणाम झाला होता. अशातच अनेक कर्मचाऱ्यांना वेतन कपात किंवा कामावरून कमी करण्यासारख्या प्रकारांना सामोरं जावं लागलं होतं.2 / 15परंतु येत्या काळात माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात (Information and Technology) क्षेत्रातील कर्मचाऱ्यांवरही कर्मचारी कपातीची टांगती तलवार आहे.3 / 15Nasscom च्या अहवालानुसार देशांतील सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये १.६ कोटी कर्मचारी कार्यरत आहेत. 4 / 15दरम्यान, कंपन्या २०२२ पर्यंत यातील ३० लाखांपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांची कपात करण्याच्या तयारीत आहेत, असंही यात नमूद करण्यात आलं आहे. 5 / 15असं करून देशातील आयटी कंपन्या वर्षाला १०० बिलियन डॉलर्सची बचत करू इच्छित असल्याचंही सांगण्यात आलं आहे.6 / 15Nasscom च्या रिपोर्टनुसार देशांतर्गत असलेल्या आयटी सेक्टमध्ये १.६ कोटी लोकं काम करत आहे. तसंच यापैकी जवळपास ९० लाख कर्मचारी हे लो स्किल्ड आणि BPO सेक्टरमध्ये नोकरी करत आहेत. 7 / 15या ९० लाख लो स्किल्ड आणि बीपीओमध्ये कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांमधून ३० लाख कर्मचारी २०२२ पर्यंत आपली नोकरी गमावू शकतात, असं अहवालाद्वारे सांगण्यात आलं आहे. 8 / 15ऑटोमेशनचा सर्वाधिक परिणाम लो स्किल्ड लेबरवरच होईल, असंही त्यात नमूद करण्यात आलं आहे. 9 / 15Nasscom च्या अहवालानुसार देशातील आयटी कंपन्यांपैकी TCS, Infosys, Wipro, HCL, Tech Mahindra आणि Cognizant सारख्या काही कंपन्या लवकरच ऑटोमेशनची प्रक्रिया सुरू करू शकतील. 10 / 15आयटी क्षेत्रातील ऑटोमेशनमुळे ३० लाख कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्याची योजना तयार करण्यात येऊ शकते. 11 / 15तसंच भारत आधारित रिसोर्सेसवर वर्षाला २५ हजार डॉलर्स आणि अमेरिकनं रिसोर्सेसवर वर्षाला ५० हजार डॉलर्स खर्च करते, असा दावा या अहवालातून करण्यात आला आहे. 12 / 15रिपोर्टनुसार स्किल डिसरप्शनचा सर्वाधिक परिणाम भारत आणि चीनवर पडेल. तर ASEAN, जपानवर याचा परिणाम कमी होऊ शकतो. 13 / 15भारतासारख्या उद्योन्मुख बाजारपेठेत असलेल्या नोकऱ्यांमध्ये ऑटोमेशनमुळे सर्वाधिक धोका असतो.14 / 15भारत २००२ मध्ये उत्पादन क्षेत्रात टॉपवर होता. तर १९७० मध्ये जर्मनी आणि १९९० मध्ये मॅक्सिको होता. 15 / 15दरम्यान, RPA चा सर्वात वाईट परिणाम हा अमेरिकेवर होऊ शकतो. बुधवारी बँक ऑफ अमेरिकानं जारी केलेल्या अहवालानुसार अमेरिकेतील १० लाख कर्मचाऱ्यांवर संकट आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications