शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

३०० फरारी, ५०० रॉल्स रॉयस, ४०० मर्सिडीज, अन्...: अखेर कोण आहे हा गडगंज श्रीमंत?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2023 5:34 PM

1 / 10
सुख-दुःख, दिवस-रात्र, विजय-पराजयाप्रमाणेच श्रीमंती आणि गरिबी याही एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. एकीकडे, काहींना भरभरून अन्न मिळते तर दुसरीकडे दोन वेळचे जेवणही काहींच्या नशिबी नाही. एकीकडे अमाप संपत्ती आणि त्यांच्या चैनीचा आनंद लुटणाऱ्या लोकांशी संबंधित बातम्या देखील पाहतो.
2 / 10
ब्रुनेईचा सुलतान हसनल बोलकीह असेच लग्झरी जीवन जगत आहे, ज्यांचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये देखील समाविष्ट करण्यात आले आहे. ब्रूनेई हा एक आशियाई देश आहे. जो मलेशिया आणि दक्षिण चीननं वेढलेला आहे.
3 / 10
हे एक बेट आहे, जे जगभरातील सुंदर समुद्रकिनारे आणि रेन फॉरेस्टसाठी प्रसिद्ध आहे. जागतिक बँकेच्या निर्देशांकानुसार, २०२१ मध्ये या देशाची लोकसंख्या केवळ ४.४५ लाख होती, जी मुंबई, नोएडापेक्षा खूपच कमी आहे. पण, तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की या छोट्या देशाचा सुलतान जगातील सर्वात श्रीमंत राजा मानला जातो.
4 / 10
ब्रूनेईच्या सुलतानचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद आहे. त्यांच्या लग्झरी लाईफबद्दल बोलायचे झाले तर त्यांच्याजवळ सुमारे ४ हजार कोटी रुपयांच्या केवळ कार आहेत. किंगच्या प्रायव्हेट कार कलेक्शनमध्ये अनेक महागड्या कारचा समावेश आहे.
5 / 10
या रॉल्स रॉयल, बेंटलेसह अनेक लग्झरी वाहने आहेत. एका रिपोर्टनुसार, सुलतानजवळ ३०० फरारी, ५०० रॉल्स रॉयस कार आहेत. त्यातील अर्ध्या गाड्या तर १९९० च्या काळात खरेदी केलेल्या आहेत. त्याशिवाय बेंटलेसह अन्य कारही त्यांच्या कलेक्शनमध्ये आहेत.
6 / 10
त्याचसोबत २५० हून अधिक लँबोर्गिनी, २५० एस्टन मार्टिन, १७० हून अधिक बुगाटिस, २३० पेक्षा जास्त पोर्श, ३५० बेंटले, ४४० मर्सिडीज, २६० पेक्षा जास्त ऑडी, २३० हून अधिक बीएमडब्ल्यू आणि २२० पेक्षा जास्त जगुआर, १८० हून अधिक लँड रोव्हरसारख्या कार आहेत.
7 / 10
सुलतानचे आयुष्य एखाद्या पुस्तकातील अथवा सिनेमातील राजकुमारासारखे आहे. त्यांनी १९८४ मध्ये ब्रूनेईची गादी सांभाळली. त्यानंतर आतापर्यंत ते पंतप्रधान आणि सुलतानपदावर आहेत. सुलतान यांच्या महलाची भव्यता डोळ्यातही मावणार नाही.
8 / 10
सुलतान यांच्या राजेशाहीचा अंदाज यातून घेता येईल की, त्यांच्या महलात ५ स्विमिंग पूल, १७०० खोल्या, २०० एअर कंडिशन, ३०० फरारी, ५०० रॉल्स रॉयल्स आणि १०० गॅरेज आहेत. ज्याठिकाणी त्यांच्या लग्झरी कारची दुरुस्ती केली जाते.
9 / 10
ब्रूनेईच्या सुलतानाकडे सोन्याचा मुलामा दिलेले प्रायव्हेट जेट आहे. ज्याची किंमत ३ हजार कोटींहून अधिक आहे. या विमानात आतील वॉश बेसिनही सोन्याचे बनलेले आहे. प्लेनमध्ये ९५० कोटींहून अधिक किंमतीचे सामान आहे.
10 / 10
इतकेच नाही तर सुलतानचा महाल इस्ताना नुरूल इमान पॅलेसचा घुमट २२ कॅरेट सोन्याचा आहे. ज्याची किंमत २५५० कोटी रुपये आहे. त्याशिवाय सुलतानकडे ९२ कोटींचे हिरेही आहेत. सुलतानची एकूण संपत्ती २ लाख ८८ कोटी रुपये आहे. त्यांचा महाल २० लाख स्क्वेअर फूटात पसरला आहे.