शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

३९९ रुपयांत ३३०० जीबी डेटा आणि फ्री कॉलिंग; लुटता येणार हायस्पीड इंटरनेटचा आनंद

By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2022 5:36 PM

1 / 9
हायस्पीड इंटरनेट (Hi-Speed Internet) ही आजकाल युजर्सची गरज बनली आहे. युजर्सची ही मागणी कंपन्यांनीही समजून घेतली आहे. याच कारणामुळे सध्या बाजारात एकापेक्षा जास्त ब्रॉडबँड प्लॅन उपलब्ध आहेत.
2 / 9
यामध्ये हायस्पीड इंटरनेटसह अनेक अतिरिक्त फायदेही मिळतात. येथे आम्ही तुम्हाला Jio Fiber, Airtel आणि BSNL च्या अशा उत्तम ब्रॉडबँड प्लॅनबद्दल सांगत आहोत. यामध्ये तुम्हाला 100Mbps पर्यंतच्या स्पीडसह 3300GB डेटा मिळेल आणि या प्लॅनची ​​सुरुवातीची किंमत 399 रुपये आहे.
3 / 9
जिओ फायबरच्या या प्लॅनमध्ये तुम्हाला 30 दिवसांची वैधता मिळते. प्लॅनमध्ये इंटरनेट वापरण्यासाठी तुम्हाला 30Mbps चा स्पीड आणि 3300GB डेटा मिळेल.
4 / 9
कंपनीच्या या व्हॅल्यू पॅकची खास गोष्ट म्हणजे यामध्ये तुम्हाला देशातील सर्व नेटवर्कसाठी अमर्यादित कॉलिंग देखील मिळत आहे.
5 / 9
जर तुमचे बजेट कमी असेल तर तुम्ही Jio चा 399 रुपयांचा ब्रॉडबँड प्लॅन पाहू शकता. यामध्ये उपलब्ध असलेले सर्व फायदे 699 रुपयांच्या प्लॅनप्रमाणेच आहेत, परंतु 699 रुपयांच्या प्लॅनमध्ये 100Mbps चा स्पीड देण्यात येतो.
6 / 9
एअरटेल एक्स्ट्रीम फायबर ब्रॉडबँड पोर्टफोलिओमध्ये अनेक उत्तम प्लॅन्स ऑफर करत आहे. यापैकी एक 799 रुपयांचा प्लॅन आहे. या प्लानमध्ये कंपनी 100Mbps चा इंटरनेट स्पीड देत आहे.
7 / 9
तसंच या प्लॅनमध्ये 3300GB डेटा देण्यात येतो. प्लॅनमध्ये लोकल/एसटीडी कॉलिंगसोबत विंक म्युझिकचे फ्री सबस्क्रिप्शनही दिले जात आहे.
8 / 9
बीएसएनएलच्या 800 रुपयांपेक्षाही कमी किंमतीचे काही प्लॅन्स आहेत. कंपनीच्या 749 रुपयांच्या प्लॅनमध्ये कंपनी 100Mbps च्या स्पीडने 1000GB डेटा देते. हा प्लॅन कंपनीच्या वेबसाइटवर सुपरस्टार प्रीमियम-1 वरून लिस्टेड आहे.
9 / 9
त्याच वेळी, कंपनीच्या फायबर व्हॅल्यू प्लॅनमध्ये 799 रुपयांपासून 3300GB डेटा मिळेल. कंपनी या प्लॅनमध्ये 100Mbps स्पीड देखील देत आहे.
टॅग्स :AirtelएअरटेलReliance Jioरिलायन्स जिओBSNLबीएसएनएल