शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

२०२१ या वर्षात Gautam Adani यांच्या संपत्तीत ३.१५ लाख कोटींची वाढ, समुहाच्या शेअर्समध्येही वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2021 8:09 PM

1 / 15
२०२१ हे वर्ष दिग्गज उद्योजक गौतम अदानी (Gautam Adani) यांच्यासाठी फायद्याचं ठरलं आहे. अदानी समुहाच्या (Adani Group) कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात वाढ दिसून आली.
2 / 15
अदानी समुहाच्या शेअर्समध्ये झालेल्या वाढीमुळे त्यांच्या संपत्तीत तब्बल ४३ बिलियन डॉलर्स म्हणजे जवळपास ३.१५ लाख कोटी रूपयांची वाढ दिसून आली. तसंच ते आशियातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत.
3 / 15
ब्लूमबर्गच्या माहितीनुसार गौतम अदानी यांची एकूण संपत्ती ७६.७ बिलियन डॉलर्स म्हणजेच ५.६० लाख कोटी रूपये झाली आहे. त्यांच्या कंपनीच्या शेअर्समध्ये झालेल्या वाढीमुळे त्यांच्या संपत्तीत वाढ झाली आहे.
4 / 15
Adani Total Gas च्या शेअर्समध्ये यावर्षी तब्बल ३३० टक्क्यांची वाढ झाली. तर Adani Enterprises च्या शेअर्समध्ये २३५ टक्क्यांची वाढ झाली आहे. तर Adani Transmission च्या शेअर्समध्ये तब्बल २६३ टक्क्यांची वाढ झाली आहे.
5 / 15
बाजारातील जाणकारांच्या मते अदानी यांच्या संपत्तीत रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी, इतकंच काय तर जगातील सर्वात मोठी गुंतवणूकदार आणि बर्कशायर हॅथवेचे मालक वॉरेन बफे यांच्यापेक्षाही तेजीनं वाढली आहे. परंतु यात धोकाही आहे.
6 / 15
टेक्निकल इंडिकेटर्सला अॅनालाईज केल्यानंतर हे समोर आलं की अदानी समुहाच्या या तीन कंपन्यांच्याचे शेअर्स ओव्हरव्हॅल्यूड आणि एक्सटेंडेड आहेत, असं ब्लूमबर्ग इंटेलिजन्स अनालिस्ट गौतम पतनकर आणि नितिन चांडुका यांनी आपल्या नोटमध्ये म्हटलं.
7 / 15
अदानी समुहाच्या या तीन कंपन्यांच्या असेस्टमध्ये मॉरिशसच्या काही कंपन्यांची भागीदारी ९५ टक्क्यांपेक्षा अधिक आहे. या कंपन्यांमध्ये ऑनशोर शेअरहोल्डिंग म्हणजेच देशाच्या लोकांना आणि फंड मॅनेजर्सच्या बरोबर भागीदारी आहे, असं ब्लूमबर्गच्या इंटेलिजेन्स अॅनालिसिस्टचं म्हणणं आहे.
8 / 15
या कंसेन्ट्रेटेड पोझिशनमुळे अनेक गुंतवणूकदार कंपन्या अदानी समुहाच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यास तयार होत नाही.
9 / 15
कारण शेअरहोल्डिंगचा असा कंसेन्ट्रेटेड अनफेवरेबल रिस्क रिवॉर्ड रेशो दाखवतो. परंतु सध्या यावर अदानी समुहाकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
10 / 15
अदानी समुहाच्या कंपन्यांमध्ये परदेशी फंड मॅनेजपर्सकडेही शेअरचा मोठा हिस्सा आहे. ज्यामुळे लोकांमध्ये फ्लोटेड शेअर्सची संख्या कमी होते आणि त्यांचे स्टॉक्स वर खाली जाण्याची शक्यता असते असं ब्लूमबर्ग इंटेलिजन्सनं म्हटलं आहे.
11 / 15
ब्लूमबर्ग इंटेलिजन्सनुसार एलारा इंडिया, अपॉर्च्युनिटीज फंड, APMS इन्व्हेस्टमेंट फंड, क्रेस्टा फंड. अल्बुला इन्व्हेस्टमेंट फंड, LTS इन्व्हेस्टमेंट आणि एशिया इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशननं आपल्ये ९० टक्के अॅसेस्ट्स अदानी समुहाच्या कंपनीत लावले आहेत.
12 / 15
याशिवाय MSCI नं आपल्या इंडिया बेंचमार्क इंडेक्समध्ये अदानी समुहाच्या तीन आणखी कंपन्यांना सामिल केलं आहे. त्यामुळे या इंडेक्समध्ये अदानी समुहाच्या पाच कंपन्या सामील झाल्या आहेत.
13 / 15
यामुळे MSCI इंडिया इंडेक्समुसार ट्रॅक करण्याऱ्या इन्व्हेस्टर्ससाठी अदानी समुहाच्या कंपन्यांच्या शेअर्स खरेदी करणे अनिवार्य असतं. ज्यामुळे शेअरच्या किंमती आणखी वाढत जातात.
14 / 15
ब्लूमबर्ग इंटेलिजन्सच्या तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार अदानी समुहाच्या कंपन्यांचे स्टॉक्स ओव्हर व्हॅल्यूड आहेत. त्यांच्या शेअर्सनं २०० दिवसांच्या डेली मुव्हींग एव्हरेजपासून १५० ते २०० टक्के वर ट्रेंड करत आहेत.
15 / 15
ज्यावेळी टेस्ला या कंपनीचे शेअर्स आपल्या पीक वर पोहोचले होते तेव्हा ते आपल्या २०० दिवसांच्या डेली मुव्हींग एव्हरेजपासून केवळ १२६ टक्के वर ट्रेंड करत होते.
टॅग्स :Adaniअदानीbusinessव्यवसायshare marketशेअर बाजार