शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

रस्त्यांवर फुगे विकता-विकता उभी केली ४६००० कोटींची कंपनी, MRF च्या मॅमेन यांच्या यशाची कहाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2023 9:34 AM

1 / 11
टायर, क्वालिटी आणि एमआरएफ हे आता एक समीकरण झालंय. आजही देशातील लोक एमआरएफचे टायर्स बेस्ट असल्याचं म्हणतात. सध्या एमआरएफचे शेअर्सदेखील चर्चेचा विषय आहेत. सोमवारी एमआरएफचा १,०९,२६६.५० रुपयांवर बंद झाला.
2 / 11
परंतु एमआरएफची सुरुवात इतकी सोपी नव्हती. या कंपनीच्या आजवरच्या प्रवासाची कहाणी अतिशय रंजक आहे. फुगे विकणाऱ्या एका व्यक्तीनं ही कंपनी उभी केली. पाहूया कसा होता त्यांचा आजवरचा प्रवास.
3 / 11
१९४६ मध्ये केरळमध्ये जन्मलेले के.एम. मॅम्मेन मॅप्पिलाई चेन्नईच्या रस्त्यांवर फुगे विकायचे. मॅम्मेन यांना १० भाऊ आणि बहिणी होते. मॅम्मेन फुगे घेऊन गल्ल्या गल्ल्यांमध्ये जाऊन विकायचे. त्यावेळी त्यांना कल्पनाही नसेल की ते एके दिवशी तो ४६,३४१ कोटी रुपयांची मार्केट कॅप असलेली कंपनी उभी करतील.
4 / 11
१९५२ हे वर्ष त्यांच्यासाठी टर्निंग पॉइंट ठरले. एक विदेशी कंपनी टायर रिट्रेडिंग प्लांटला ट्रेड रबर पुरवत असल्याचं त्याच्या समजलं. तेव्हा एक गोष्ट त्यांच्या मनाला भिडली. आपल्या देशातच ट्रेड रबर बनवण्यासाठी कारखाना का उभारता येत नाही, असा प्रश्न त्यांच्या मनात आला.
5 / 11
मॅम्मेन यांना ही एक चांगली संधी वाटली. त्यांनी आपल्या सर्व बचतीतून ट्रेड रबर बनवण्याच्या व्यवसायात उतरण्याचा निर्णय घेतला. अशा प्रकारे मद्रास रबर फॅक्टरी म्हणजेच एमआरएफचा जन्म झाला. ट्रेड रबर बनवणारी ही भारतातील पहिली कंपनी होती.
6 / 11
त्यामुळे मॅम्मेन यांची परदेशी कंपन्यांशी थेट स्पर्धा होती. काही वेळातच त्यांचा व्यवसाय लोकप्रिय झाला. उच्च गुणवत्तेमुळे ४ वर्षांच्या आत कंपनीनं ५० टक्के मार्केट शेअर मिळवले. परिस्थिती अशी होती की अनेक परदेशी उत्पादक देश सोडून गेले.
7 / 11
१९६० मध्ये मॅम्मेन यांच्या व्यवसायात आणखी एक टर्निंग पॉइंट आला. त्यांचा व्यवसाय चांगला चालला होता. पण त्यांना केवळ रबराच्या व्यापारापुरतं मर्यादित राहायचं नव्हतं. त्यांची नजर टायरवर होती. MRF हा एक चांगला ब्रँड बनला होता आणि कंपनीला आता टायर मार्केटमध्ये उतरायचं होतं.
8 / 11
त्यावेळी मॅम्मेन यांना परदेशी कंपन्यांची मदत हवी होती. त्यांनी अमेरिकेच्या मॅन्सफिल्ड टायर आणि रबर कंपनीकडून तांत्रिक मदत घेतली आणि टायर उत्पादन युनिट स्थापन केलं. १९६१ मध्ये एमआरएफ कारखान्यात पहिलं टायर तयार करण्यात आलं. त्याच वर्षी कंपनीनं मद्रास स्टॉक एक्सचेंजमध्ये आयपीओ आणला.
9 / 11
त्यावेळी भारतीय टायर उत्पादन उद्योगात डनलॉप, फायरस्टोन आणि गुडइयर सारख्या मल्टीनॅशनल कंपन्यांचं वर्चस्व होतं. एमआरएफनं भारतीय रस्त्यांसाठी योग्य असलेले टायर्स बनवायला सुरुवात केली. तिरुवोटीयुरमध्ये तयार करण्यात आलेल्या रबर संशोधन केंद्राने कंपनीला यामध्ये मदत केली. यानंतरही एमआरएफ थांबले नाही.
10 / 11
चांगल्या मार्केटिंगमुळे कंपनीनं टायर मार्केटमध्ये वर्चस्व गाजवायला सुरुवात केली. MRF Muscleman ची १९६४ मध्ये सुरुवात झाली. टीव्ही जाहिराती आणि होर्डिंगमध्ये मसलमनचा वापर केला जात असे. यानंतर, १९६७ मध्ये अमेरिकेत टायर निर्यात करणारी ही कंपनी भारतातील पहिली कंपनी ठरली. यानंतर, १९७३ मध्ये एमआरएफ ही भारतातील पहिली कंपनी बनली जी व्यावसायिकरित्या नायलॉन ट्रॅव्हल कार टायरचे उत्पादन आणि मार्केटिंग करते.
11 / 11
एमआरएफनं १९७३ मध्ये पहिले रेडियल टायर तयार केले. २००७ मध्ये प्रथमच एमआरएफनं एक अब्ज अमेरिकन डॉलर्सची उलाढाल करून विक्रम केला होता. पुढील ४ वर्षात व्यवसाय ४ पटींनी वाढला. एमआरएफ सध्या विमान तसेच लढाऊ विमान सुखोईसाठी टायर बनवत आहे. मद्रासच्या रस्त्यांवर फुगे विकून, आपण इतकं मोठं साम्राज्य उभं करू याची कल्पनाही मॅम्मेन यांनी केली नसेल
टॅग्स :businessव्यवसायInspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी