शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Rakesh Jhunjhunwala यांचे ५ 'गुरुमंत्र' जे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना करू शकतील 'मालामाल'!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2022 3:10 PM

1 / 6
शेअर मार्केटचे Big Bull राकेश झुनझुनवाला यांचे वयाच्या ६२व्या वर्षी निधन झाले. मुंबईच्या ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राकेश झुनझुनवाला हे शेअऱ मार्केटमधील गाजलेलं नाव जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेलं आहे. १२ वर्षांचे असतानाच त्यांनी शेअर मार्केटमध्ये करियर करण्याचा निर्णय घेतला. त्यांचा शेअर मार्केटमधला अनुभव हा अनेक गुंतवणूक करणाऱ्यांसाठी बरंच काही शिकवणार आहे. स्टॉक मार्केटमध्ये कधी पैसा गुंतवावा आणि कधी अलर्ट व्हावे, असे अनेक गुरुमंत्र त्यांनी दिले आहेत. जाणून घेऊया Rakesh Jhunjhunwala यांचे ५ 'गुरुमंत्र' जे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना करू शकतील 'मालामाल'!
2 / 6
पैसे उसणे घेऊन कधीच गुंतवणूक करू नका - राकेश यांना वडील राधेश्यामजी झुनझुनवाला यांच्याकडून मिळालेला हा पहिला गुरुमंत्र आहे. त्यांनी वडिलाचे ऐकले आणि १९८६मध्ये ५ हजार रुपयांनी गुंतवणूक सुरु केली होती. बाजाराच्या बाबतीत आपले अनुभव चुकीचे ठरू शकतात, त्यामुळे केवळ अंदाजाच्या आधारावर गुंतवणूक करू नये. ही सवय तुम्हाला अडचणीत आणू शकते आणि मोठं नुकसान होऊ शकतं.
3 / 6
मिळणाऱ्या भावाचा नेहमी आदर करा, कारण ते देवासमान आहे - स्टॉक मार्केटमधील प्राईज मनी ( भाव) याचा नेहमी सन्मान करा. विक्रेता आणि ग्राहक यांच्याकडील भाव ठरलेला असतो. पण, या दोघांपैकी कोण योग्य हे भविष्यच ठरवतं.
4 / 6
रिक्सबाबत नेहमी अलर्ट राहा - स्टॉक मार्केटमधील रिक्सबाबत नेहमी अलर्ट राहण्याचा सल्ला राकेश झुनझुनवाला देत होते. त्यामुळे जेवढं रिक्स तुम्ही पचवू शकता तेवढीच गुंतवणूक तुम्ही करायला हवी. गुंतवणूक करण्यापूर्वी स्वतःची प्रोफाईल पाहा. कधीकधी गुंतवणूकदार अधिक जोखिम घेऊन गुंतवणूक करतो. असं करण्यापासून वाचायला हवं.
5 / 6
चुकांमधून शिका- गुंतवणुक केल्यानंतर झालेल्या चुकांमधून शिका. ज्या चुका तुम्हाला सहन होतील अशाच करा आणि एकदा झालेली चूक पुन्हा करू नका.
6 / 6
विश्वास ठेवा आणि आशावादी राहा - शेअर बाजारात चढ-उतार सुरूच असतो. तो तुमची परीक्षा घेतो आणि यामुळे शेअर मार्केटसंबंधित सर्व गोष्टींचा नीट अभ्यास करायला हवा. (टीप - कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकारांचा आणि तज्ज्ञांच सल्ला घ्यावा.)
टॅग्स :Rakesh Jhunjhunwalaराकेश झुनझुनवालाshare marketशेअर बाजारbusinessव्यवसाय