5-things-to-check-in-your-rent-agreement
Rent Agreement : तुमच्या भाडे करारामध्ये 'या' ५ गोष्टी नक्की पहा; कधीही फायद्यात रहाल By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2024 3:22 PM1 / 5भाडे करारावर स्वाक्षरी करण्यापूर्वी तुम्ही काही गोष्टी तपासून पाहिल्या पाहिजेत. भाडेकरू आणि घरमालक या दोघांच्या दृष्टीने या महत्त्वाच्या आहेत.2 / 5किती काळानंतर भाडेवाढ होणार याचा स्पष्ट उल्लेख भाडे करारात असावा. मग तो दीर्घकालीन (चार वर्षे ते पाच वर्षे) करार असेल किंवा अल्प-मुदतीचा (11 महिने) करार असेल. भाडे कोणत्या दराने वाढणार हेही यात स्पष्ट हवे.3 / 5भाडे करारात नोटीस कालावधी नमूद करणे आवश्यक आहे. कारण, अनेकदा मालक किंवा भाडेकरुनवर भाडे करार रद्द करण्याची वेळ येऊ शकते.4 / 5भाडेकरू इतर कोणालाही घर भाड्याने देऊ शकत नाही. अनेक ठिकाणी घरमालक पाळीव प्राणी ठेवण्याची किंवा सोसायटीमध्ये पार्किंगची सुविधा देत नाहीत. या सर्व गोष्टींवर आधी चर्चा करा.5 / 5बहुतेक भाडे करार फुली फर्निश्ड किंवा सेमी-फर्निश्ड घरांसाठी असतात. अशा परिस्थितीत, करारामध्ये फर्निचर आणि फिटिंगची संपूर्ण यादी असणे आवश्यक आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications