शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

५ वर्ष, ५% आणि ५ कोटी, 'ही' आहे SIP ची 'ट्रिपल ५'वाली ट्रिक; महिन्याला अडीच लाखांचं पेन्शनही

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2024 8:41 AM

1 / 8
Investmet Tips : बहुतेक लोक वाढत्या वयात निवृत्तीच्या नियोजनाचा (Retirement Planning) खूप विचार करतात. पण एखादा चांगला-मोठा फंड उभा करायचा असेल तर नोकरी मिळाल्याच्या सुरुवातीच्या टप्प्यातच त्याचा विचार करायला हवा. कारण कंपाउंडिंगच्या साहाय्यानं तुम्ही निवृत्तीच्या नियोजनात मोठा निधी जमा करू शकता.
2 / 8
हे लक्षात घेण्यासारखं आहे की कंपाउंडिंगची खरी शक्ती दीर्घ काळासाठी गुंतवणूक केल्यावर दिसून येते. आज आम्ही तुम्हाला एसआयपीशी संबंधित एक टिप सांगणार आहोत, ज्यामध्ये ट्रिपल ५ ची ट्रिक तुम्हाला मोठा निधी जमवून देऊ शकते.
3 / 8
प्रथम काही गोष्टी मानूया, जेणेकरून ही ट्रिक समजून घेणं अगदी सोपं होईल. समजा तुमचं वय २५ वर्ष आहे आणि तुम्ही महिन्याला १००० रुपयांची एसआयपी जमा करत आहात. तुमच्या रिटायरमेंटच्या वयापर्यंत तुमच्या गुंतवणूकीवर सरासरी ११-१२ टक्क्यांचा रिटर्न मिळेल असं समजूया. पाहूया कसा काम करतो हा ट्रिपल ५ चा फॉर्म्युला?
4 / 8
ट्रिपल ५ फॉर्म्युल्यात पहिल्या ५ म्हणजे पाच वर्षे लवकर निवृत्त होणं. तर दुसऱ्या ५ चा अर्थ यासाठी तुम्हाला तुमची एसआयपी दरवर्षी ५ टक्क्यांनी वाढवावी लागेल. तर तिसऱ्या ५ चा अर्थ म्हणजे जर तुम्ही अशा प्रकारे सतत गुंतवणूक केली तर वयाच्या ५५ व्या वर्षापर्यंत तुमच्याकडे ५ कोटी रुपयांचा कॉर्पस असेल. म्हणजेच एसआयपीमध्ये एक छोटासा बदल केला तर तुम्ही वेळेपूर्वी निवृत्ती घेऊ शकता.
5 / 8
समजा तुम्ही दरमहिन्याला १००० रुपयांची एसआयपी किंवा वार्षिक १२००० रुपयांची एसआयपी करा. यानंतर त्यात दरवर्षी ५% वाढ करा, ज्यावर तुम्हाला सरासरी ११% परतावा मिळू शकतो.
6 / 8
असं केल्यानं ३० वर्षांत म्हणजेच वयाच्या ५५ व्या वर्षापर्यंत तुमची एकूण गुंतवणूक सुमारे ९५.६७ लाख रुपये होईल. तर कंपाउंडिंगच्या पॉवरमुळे तुम्हाला जवळपास सव्वाचार कोटी रुपयांचं व्याज मिळणार आहे. अशा प्रकारे तुमचा एकूण निधी ५.२० कोटी रुपये होईल.
7 / 8
निवृत्तीच्या वेळी तुम्हाला एफडीवर फक्त ६% व्याज मिळालं तरी तुम्हाला दमदार पेन्शन मिळेल. अशा प्रकारे ५.२० कोटी रुपयांवर तुम्हाला ६ टक्के दरानं दरवर्षी सुमारे ३१.२० लाख रुपये मिळतील. म्हणजेच तुम्हाला दरमहा सुमारे २.६० लाख रुपये मिळतील.
8 / 8
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमीच्या अधीन आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
टॅग्स :InvestmentगुंतवणूकMONEYपैसा