शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

UPI पेमेंट सर्व्हिस लवकरच ५० नवीन ॲप्सवर मिळणार, NPCI कडून मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2024 3:43 PM

1 / 5
नवी दिल्ली : यूपीआय पेमेंट (UPI Payment) सिस्टमने भारतात डिजिटल पेमेंटचे सर्व पॅरामीटर्स बदलले आहेत. अशा परिस्थितीत आता कोणीही पेमेंटच्या या बदलत्या जगात कोणीही मागे राहू इच्छित नाही. यूपीआय मॉडेलमध्ये कंपन्यांकडे कमाईचा कोणताही ऑप्शन नाही. असे असतानाही लवकरच देशातील ५० नवीन पेमेंट ॲप्सवर यूपीआय सर्व्हिस सुरू केली जाऊ शकते.
2 / 5
यूपीआय पेमेंट सर्व्हिस मॅनेज करणारी सरकारी कंपनी 'नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया'चे (NPCI) वरिष्ठ अधिकारी म्हणाले की, मर्चेंट डिस्काउंट रेट म्हणजेच एमडीआर (पेमेंट सर्व्हिस देणाऱ्या कंपन्यांच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत) नसतानाही देशातील ५० नवीन थर्ड पार्टी ॲप्स रिअल-टाइम पेमेंटसाठी यूपीआय सर्व्हिस स्विकारण्यास इच्छुक आहेत.
3 / 5
एनपीसीआयचे एमडी आणि सीईओ दिलीप आबसे यांच्या म्हणण्यानुसार, यूपीआयमध्ये इनकम मॉडेल नसल्यामुळे, गेल्या काही वर्षांत कंपन्या या सिस्टमचा अवलंब करण्यास टाळाटळ करत होत्या, परंतु गेल्या एका वर्षात नवीन कंपन्यांचा यूपीआय पेमेंट सर्व्हिस सुरू करण्यासाठी कल वाढला आहे. जवळपास ५० नवीन थर्ड पार्टी पेमेंट ॲप्स आता मार्केटमध्ये एन्ट्री करू पाहत आहेत.
4 / 5
दरम्यान, मनीकंट्रोलशी बोलताना दिलीप आबसे यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, सध्या देशात यूपीआय व्यवहार पूर्णपणे मोफत आहेत. फिनटेक कंपन्या आणि बँका त्याच्या प्रक्रियेचा खर्च उचलतात. तसेच, भविष्यातही यूपीआय पेमेंट सर्व्हिस मोफत राहील, असेही दिलीप आबसे यांनी सांगितले.
5 / 5
मर्चेंट डिस्काउंट रेट (MDR) हे खरंतर एक शुल्क आहे, जे कंपन्या पेमेंट रिसिव्ह करण्यासाठी त्यांची सर्व्हिस वापरणाऱ्या व्यापाऱ्यांकडून आकारतात. क्रेडिट कार्ड कंपन्यांच्या उत्पन्नाचा हा मुख्य स्त्रोत आहे. यूपीआय पेमेंटमध्ये एमडीआर सुविधा नाही, कारण ती पीअर ३ पीअर नेटवर्कवर काम करते. दरम्यान, काही पेमेंट कंपन्यांनी साउंडबॉक्स, डिजिटल क्यूआर कोड आणि पीओएस सिस्टम विकसित करून यूपीआय ​​पेमेंटसाठी एमडीआरचा पर्याय शोधला आहे.
टॅग्स :businessव्यवसायtechnologyतंत्रज्ञान