शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

५००० उधारी घेत सुरु केला बिझनेस; आज कोट्यवधीच्या कंपनीचे मालक, 'असं' बदललं नशीब

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2023 8:38 AM

1 / 10
जीवनात काहीतरी करण्याचा निश्चय केला तर मोठे यश मिळवता येते. आज आम्ही तुम्हाला अशाच एका व्यक्तीबद्दल सांगणार आहोत. त्यांची यशोगाथा जाणून घेतल्यावर तुम्हालाही आयुष्यात काहीतरी मोठे करण्याची प्रेरणा मिळेल.
2 / 10
ही व्यक्ती म्हणजे ज्योती लॅबोरेटरीज लिमिटेडचे ​​संस्थापक एम.पी. रामचंद्रन, ज्यांनी आपल्या कठोर परिश्रमाने आणि समर्पणाने तरुण उद्योजकांसमोर आदर्श निर्माण केला आहे.
3 / 10
आज रामचंद्रन हे १३,५८३ कोटी रुपयांच्या कंपनीचे मालक आहेत. एम.पी. रामचंद्रन यांची कंपनी कपड्यांना सुपर व्हाईटिंगसाठी उजाला नील बनवते. एम पी रामचंद्रन यांनी एकेकाळी पाच हजार रुपयांचे कर्ज घेऊन व्यवसाय सुरू केला होता. रामचंद्रन यांनी एवढे मोठे यश कसे मिळवले हे पुढे जाणून घेऊया.
4 / 10
एम पी रामचंद्रन यांना नेहमीच शिकण्याची इच्छा होती. काहीतरी आऊट ऑफ द बॉक्स करण्याचा त्यांचा नेहमी विचार असायचा. पदव्युत्तर शिक्षणानंतर त्यांनी अकाऊटेंट म्हणून काम करायला सुरुवात केली.
5 / 10
मात्र नंतर त्यांनी व्यवसाय करण्याचा विचार केला आणि भावाकडून ५ हजार रुपये उसने घेऊन तात्पुरता कारखाना सुरू केला.या काळात त्यांनी काही वेगवेगळे प्रोडक्ट बनवले
6 / 10
आज ज्योती लॅबोरेटरीज ही मल्टी ब्रँड कंपनी बनली आहे हे त्यांच्या मेहनतीचे आणि समर्पणाचे फळ आहे. ज्योती लॅबोरेटरीजचे मार्केट कॅप सुमारे १३ हजार ५८३ कोटी रुपये आहे.
7 / 10
रिपोर्ट्सनुसार, एम पी रामचंद्रन यांनी त्यांची मुलगी ज्योती यांच्या नावावर कंपनीचे नाव ज्योती लॅबोरेटरीज ठेवले आहे. पांढर्‍या कपड्यांच्या लोकांच्या मागणीला प्रतिसाद म्हणून ज्योती लॅबने उजाला सुप्रीम लिक्विड फॅब्रिक व्हाइटनर तयार केले.
8 / 10
हे उत्पादन सुरुवातीला ६ महिलांच्या ग्रुपनं घरोघरी विकले गेले. यानंतर काही काळातच उजाला सुप्रीमने प्रत्येक भारतीय घराघरात प्रचंड लोकप्रियता मिळवली.
9 / 10
ज्योती लॅबोरेटरीजचा व्यवसाय सुरुवातीला दक्षिण भारतात वाढला आणि १९९७ पर्यंत हे उत्पादन देशभर प्रसिद्ध झाले. आज, उजालाचा राष्ट्रीय स्तरावर लिक्विड फॅब्रिक क्षेत्रात मोठा वाटा आहे.
10 / 10
ज्योती लॅबोरेटरीजची उजाला लिक्विड क्लॉथ व्हाइटनर आणि मॅक्सो मॉस्किटो रिपेलेंट ही दोन महत्त्वाची उत्पादने देशात चांगलीच प्रसिद्ध झाली आहेत.
टॅग्स :businessव्यवसाय