शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

६६,४७५ टक्के रिटर्न, स्वातंत्र्याच्या वेळी सोनं खरेदी केलं असतं तर आज तुमच्याकडे किती पैसे असते? पाहा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2023 9:35 AM

1 / 10
15 ऑगस्ट रोजी, देश 77 वा स्वातंत्र्य दिन (Independence day 2023) साजरा करणार आहे. 15 ऑगस्ट 1947 रोजी देश स्वतंत्र झाला. स्वातंत्र्याला 76 वर्षे पूर्ण झाली आहेत. या 76 वर्षांत देशात खूप काही बदललं आहे.
2 / 10
आज आपण अर्थव्यवस्थेच्या बाबतीत जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहोत. देशातील महागाईही या 76 वर्षांमध्ये खूप वाढली आहे. स्वातंत्र्यानंतर सोनं किती महाग झालं हे तुम्हाला जाणून घ्यायचंय का?
3 / 10
सोन्याचा वापर केवळ दागिने म्हणून केला जात नाही तर तो एक चांगला गुंतवणूकीचा पर्याय देखील आहे. सोन्यानं गेल्या आर्थिक वर्षात म्हणजे 1 एप्रिल 2022 ते 31 मार्च 2023 (Gold Return in FY23) 15 टक्के उत्कृष्ट परतावा दिला. तज्ज्ञांच्या मते या आर्थिक वर्षातही सोनं 15 टक्क्यांपर्यंत परतावा देऊ शकते.
4 / 10
स्वातंत्र्याच्या वेळी सोन्याचे दर खूपच कमी होते. 1942 मध्ये जेव्हा दुसरे महायुद्ध आणि 'छोडो भारत आंदोलन' सुरू होतं तेव्हा त्यावेळी सोन्याचा भाव 44 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. इंडियन पोस्ट गोल्ड कॉइन सर्व्हिसेसनुसार, 1947 मध्ये स्वातंत्र्याच्या वेळी सोन्याची किंमत 88.62 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली होती. स्वातंत्र्यानंतर सोन्याच्या किमतीत सर्वात मोठी घसरण 1964 मध्ये झाली.
5 / 10
त्यावेळी सोन्याचा भाव 63.25 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​आला होता. यानंतर सोन्याच्या दरात झपाट्यानं वाढ झाली. 1970 मध्ये सोन्याचा दर 184 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​पोहोचला होता. त्यानंतर 1975 मध्ये 540 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 1980 मध्ये 1,333 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​पोहोचले. 1985 मध्ये सोन्याचा भाव 2,130 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. 1990 मध्ये ते 3200 रुपये प्रति 10 ग्रॅम इतके वाढले. 2000 मध्ये सोन्याचा भाव 4,400 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला होता.
6 / 10
2005 ते 2010 या काळात सोन्याच्या किमतीत प्रचंड वाढ झाली होती. 2005 मध्ये सोन्याचा भाव 7000 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. 2010 मध्ये ती वाढून 18,500 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली. 2020 पर्यंत ही किंमत 48,651 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​पोहोचली. आज सोन्याचा भाव 59,000 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या जवळपास आहे. काही महिन्यांपूर्वी सोन्याचा भाव 62,000 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पुढे गेला होता.
7 / 10
जर तुम्ही स्वातंत्र्याच्या वेळी 10,000 रुपयांचं सोनं घेतलं असतं तर आज तुमची गुंतवणूक 66,47,500 रुपये झाली असती. दुसरीकडे, जर एखाद्या व्यक्तीनं स्वातंत्र्याच्या वेळी 1 लाख रुपयांचे सोने खरेदी करून ठेवले असते, तर आज तो 6 कोटी 64 लाख रुपयांचा मालक बनला असता.
8 / 10
स्वातंत्र्यानंतर सोन्याच्या किमती 665 पटीने वाढल्या आहेत. आता तुम्ही कल्पना करू शकता की जर तुम्ही त्यावेळी सोनं खरेदी केलं असतं तर आज तुम्ही श्रीमंत झाला असता. स्वातंत्र्याच्या वेळी सोन्याचा दर 88.62 रुपये प्रति 10 होता. सध्या एमसीएक्स एक्सचेंजवर सोन्याची किंमत 59,000 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या आसपास व्यवहार करताना दिसत आहे. अशा प्रकारे सोन्याने स्वातंत्र्यानंतर 66,475 टक्के परतावा दिला आहे.
9 / 10
जागतिक अर्थव्यवस्थेत मंदी असेल, शेअर बाजार घसरत असतील, जगात कोणताही भू-राजकीय तणाव असेल किंवा बाजारात अनिश्चिततेचे वातावरण असेल, तर सोन्याचे दर वाढतात. सोनं हे सेफ हेवन असेट्स मानले जाते.
10 / 10
जेव्हा जेव्हा जागतिक अर्थव्यवस्थेत अस्थिरता किंवा अनिश्चितता असते आणि शेअर बाजार घसरायला लागतात तेव्हा गुंतवणूकदार सोन्याकडे वळतात. याशिवाय मध्यवर्ती बँका जेव्हा सोने खरेदी करतात तेव्हाही सोन्याची किंमत वाढते.
टॅग्स :GoldसोनंIndependence Dayस्वातंत्र्य दिनbusinessव्यवसाय