शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Gautam Adani : ७ बेडरूम, ६ डायनिंग रुम, किंमत ४०० कोटी; पाहा गौतम अदानींचं आलीशान घर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2023 6:01 PM

1 / 7
गौतम अदानी हे देशातील एक मोठे उद्योगपती आहेत आणि त्यांना केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात ओळखले जाते. तर गौतम अदानी यांचे नाव जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत देखील समाविष्ट आहे.
2 / 7
परंतु काही दिवसांपूर्वी हिंडेनबर्गचा अहवाल समोर आला आणि त्यांच्या समस्या वाढू लागल्या. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या संपत्तीत सातत्यानं घसरण होत आहे. याशिवाय पहिल्या १० श्रीमंतांच्या यादीतूनही ते बाहेर गेलेत. पण अशातच आज आपण फोटोंच्या माध्यमातून त्यांच्या घराची सैर करूया.
3 / 7
अशा परिस्थितीत परदेशातील लोकांना भारताची प्रगती पाहता येत नाही आणि अदानीविरोधात षड्यंत्र रचले जात असल्याचे काहींनी सांगितले. तर दुसरीकडे गौतम अदानींचे जीवनही संघर्षमयच पाहिलेले आहे.
4 / 7
ही सर्व संपत्ती गौतम अदानी यांना कुटुंबाकडून मिळाली असे नाही, पण त्यांचे बालपण अत्यंत गरिबीत गेले. गौतम अदानी यांचे कुटुंबही खूप मोठे आहे, ज्यात त्यांना भाऊ-बहिण होते आणि त्यांच्यासोबत ते एका छोट्या खोलीत राहत होते.
5 / 7
इलॉन मस्क यांचे नाव सध्या वर असले तरी अदानींनी त्यांना हळूहळू मागेही सोडले असते. काही काळापूर्वीच अदानींनी मायक्रॉसॉफ्टच्या बिल गेट्स यांना संपत्तीमध्ये मागे टाकले होते.
6 / 7
गुडगावमधील गांधीनगर हायवेजवळील सरखेजमध्ये अदानी यांचा कोट्यवधींचा बंगला आहे. एकेकाळी चाळीत राहणाऱ्या अदानी यांचा दिल्लीतील अति-पॉश भागात लुटियन्समध्ये ४०० कोटी रुपयांचा आलिशान बंगला आहे. हा बंगला ३.४ एकरात पसरलेला आहे, त्यात सात बेडरूम, ६ डायनिंग रूम, एक स्टडी रूम आणि ७००० स्क्वेअर फूटचे स्टाफ क्वार्टर्स आहेत. त्यांच्याकडे जगभरात अनेक रिअल इस्टेट मालमत्ता आहेत. (Feature Image)
7 / 7
गौतम अदानी यांचे कार कलेक्शनही प्रचंड आणि आलिशान आहे. त्यांच्याकडे जगातील सर्वात महागड्या आणि ब्रँडेड कार्स आहेत. बीएमडब्ल्यू सीरिजपासून मर्सिडीज, फेरारी आणि लिमोझिन इत्यादी कार्स त्यांच्या ताफ्यात आहेत.
टॅग्स :Gautam Adaniगौतम अदानीdelhiदिल्ली