7 features of SIP which are not available in other schemes know before investing mutual funds
SIP मध्ये मिळतात असे ७ फीचर्स जे दुसऱ्या स्कीम्समध्ये मिळत नाहीत, गुंतवणूकीपूर्वी जाणून घ्या By जयदीप दाभोळकर | Published: October 09, 2024 1:26 PM1 / 9एसआयपी आजच्या काळात झपाट्यानं लोकप्रिय होत आहे. बाजाराशी निगडित स्कीम असल्यानं जोखीम जरी अधिक असली तरी मिळणाऱ्या परताव्यामुळे लोकांचा त्यावरील विश्वास वाढला आहे. एसआयपीद्वारे पैसा म्युच्युअल फंडात गुंतवला जातो. 2 / 9एसआयपीच्या माध्यमातून दीर्घ मुदतीत सरासरी १२ टक्के परतावा मिळतो, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे, जो इतर कोणत्याही योजनेच्या तुलनेत चांगला आहे. कधी कधी तर यापेक्षाही चांगला परतावा मिळू शकतो. तुम्हीही अद्याप आपल्या पोर्टफोलिओमध्ये एसआयपीचा समावेश केला नसेल तर आताच करू शकता. यामध्ये असे ७ फीचर्स आहेत जे तुम्हाला इतर कोणत्याही योजनांमध्ये सापडणार नाहीत.3 / 9कमी रकमेत गुंतवणूक - जे लोक मोठी रक्कम गुंतवू शकत नाहीत त्यांच्यासाठी एसआयपी हा गुंतवणुकीचा चांगला पर्याय आहे. असे लोक कमी रकमेतून एसआयपी सुरू करू शकतात. तुम्ही महिन्याला ५०० रुपयांपासूनही एसआयपी सुरू करू शकता आणि कालांतराने उत्पन्न वाढत असल्यानं ही रक्कम वाढवू शकता.4 / 9गुंतवणूकीतील सातत्य - जेव्हा तुम्हाला एसआयपीचा हप्ता जमा करायचा असतो, तेव्हा त्यासाठी तुम्हाला साप्ताहिक, मासिक किंवा त्रैमासिक अशा सर्व अंतराचा पर्याय दिला जातो, तुम्ही स्वतःनुसार त्याची निवड करू शकता. एसआयपीच्या नियमित गुंतवणुकीच्या पद्धतीमुळे तुम्हाला रुपी कॉस्ट एव्हरेजिंगचा फायदा मिळतो, ज्यामुळे गुंतवणूकदारांना बाजारातील चढ-उतारांपासून वाचविण्यास मदत होते. दीर्घकालीन गुंतवणुकीमुळे रुपयाच्या खर्चाच्या सरासरीचा चांगला फायदा होतो. तसेच शिस्तबद्ध गुंतवणुकीची सवय निर्माण होण्यास मदत होते.5 / 9गुंतवणूकीची निश्चित रक्कम - एसआयपी सुरू करताना तुम्ही ठराविक रकमेपासून सुरुवात करता, पण हवं तर वेळोवेळी पूरक योगदान म्हणून 'एसआयपी टॉप-अप' सुविधेचा ही वापर करू शकता. भविष्यात तुम्हाला खूप चांगला फायदा होईल. 6 / 9गुंतवणूक काही काळासाठी थांबवणं - जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही काही कारणास्तव एसआयपीचा हप्ता भरता येणार नाही, तर तुम्ही ठराविक कालावधीसाठी ते थांबवू शकता. आर्थिक संकटाच्या वेळी हा पर्याय खूप उपयुक्त ठरू शकतो. मात्र, स्टॉप पीरियड संपल्यानंतर एसआयपी आपोआप सुरू होते.7 / 9कालावधीची निवड - एसआयपीमध्ये तुम्ही साप्ताहिक, मासिक किंवा तिमाही एसआयपी दरम्यान आपल्या गुंतवणुकीचं अंतर बदलू शकता. म्हणजेच जर तुम्ही त्रैमासिक एसआयपीचा पर्याय निवडला असेल आणि तुम्हाला काही काळानंतर त्याचं मासिक एसआयपीमध्ये रुपांतर करायचं असेल तर तुम्हाला हा पर्याय मिळेल. ऑनलाइन रिक्वेस्टद्वारे किंवा आपल्या संबंधित म्युच्युअल फंड प्रोव्हायडरकडे लेखी विनंती करून आपण हे बदल करू शकता.8 / 9गुंतवणूकीची मर्यादा नाही - आपण ५०० रुपयांपासून सुरुवात करू शकता, परंतु जास्तीत जास्त गुंतवणुकीची मर्यादा नाही. म्हणजे तुम्ही यात कितीही रक्कम गुंतवू शकता.9 / 9कॅन्सलेशनची तरतूद - इतर योजनांचा जसा लॉक-इन पीरियड असतो, तसा एसआयपीमध्येही नसतो. आपण ती कधीही बंद करू शकता आणि आपले पैसे काढू शकता. (टीप : कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.) आणखी वाचा Subscribe to Notifications