शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

'हे' ७ फॉर्म्युले डोक्यात फिट करा, कमाईसोबतच तुमचा पैसाही वाढेल; लोकही विचारतील, "हे कसं केलं?"

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2024 10:31 AM

1 / 9
Investment Tips : जर तुम्ही तुमच्या पगाराचा योग्यरितीनं वापर करत नसाल आणि आर्थिक नियोजनाकडे दुर्लक्ष करत असाल तर ही चूक तुम्हाला महागात पडू शकते. पैशाची कमतरता कधीही तुमच्या आयुष्यात अडचणी निर्माण करू शकते. योग्य आर्थिक नियोजन करणं हे काही रॉकेट सायन्स नाही, फक्त योग्य वेळी सुरुवात करणं आवश्यक आहे.
2 / 9
करिअरच्या सुरुवातीलाच हे करायला विसरलात तर हरकत नाही, पण नतंरही तुम्ही सुरुवात करू शकता. चला तर मग जाणून घेऊया ते ७ सोपे फॉर्म्युले, ज्यामुळे तुम्ही बचतच नाही तर, तुमची कमाई अनेक पटींनी वाढण्यास मदत होईल. या टिप्स फॉलो केल्यानंतर लोक येऊन विचारतील, 'भाऊ, इतका पैसा वाढवलास तरी कसा?'
3 / 9
पहिलं सेव्हिंग मग खर्च - पगार आला की आधी बचत करा. हा नियम बनवा. नुसती बचत जमा करू नका, ती गुंतवा, जेणेकरून तुमचा पैसा वाढेल.
4 / 9
पैसे योग्य ठिकाणी गुंतवा - खर्चासाठी ५० टक्के, बचतीसाठी ३० टक्के आणि मौजमजा आणि फिरण्यासाठी २० टक्के. बजेट टिकवण्याचा हा उत्तम फॉर्म्युला आहे.
5 / 9
गाडीची गरज आहे का? - २०% डाउन पेमेंट, ४ वर्षांचा लोन कालावधी आणि पगाराच्या १०% पेक्षा जास्त ईएमआयमध्ये जाऊ नये. गाडी खरेदी करताना ती विचारपूर्वक खरेदी करा.
6 / 9
इन्शुरन्सची गरज - तुमच्या पगाराच्या दहापट आयुर्विमा आणि वैद्यकीय विमा घ्या. यामुळे तुमचं आणि तुमच्या कुटुंबाचं आर्थिक तणावातून रक्षण होईल.
7 / 9
कर्जात बुडणं टाळा - ईएमआय पगाराच्या जास्तीत जास्त ३०% पर्यंत असावा. गृहकर्जाचा कालावधी कमी ठेवा म्हणजे तुम्हाला व्याजही कमी भरावं लागेल.
8 / 9
एकाच ठिकाणी गुंतवणूक नको - इक्विटी आणि म्युच्युअल फंडात गुंतवणूक करत असाल तर काळजीपूर्वक करा. त्यात २०-३० टक्क्यांपेक्षा जास्त गुंतवणूक करू नका. गुंतवणूकीचं विभाजन करा.
9 / 9
अडचणीच्या काळासाठी पैसा - दर महिन्यातील ३ ते ५ टक्के रक्कम इमर्जन्सी फंडात टाका. संकटकाळात ही रक्कम तुमच्या कामी येईल. (टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
टॅग्स :InvestmentगुंतवणूकMONEYपैसा