शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Coronavirus Jobs : कोरोनाचा फटका; निर्बंधांमुळे एप्रिल महिन्यात तब्बल ७५ लाख कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2021 1:50 PM

1 / 12
गेल्या काही दिवसांपासून देशात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. अशा परिस्थितीत कोरोनाची साखळी तोडण्यासाठी अनेक निर्बंध लावण्यात आले.
2 / 12
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी स्थानिक स्तरावर लावण्यात आलेल्या निर्बंधांचा कर्मचारी वर्गाला मोठा फटका बसला आहे.
3 / 12
कोरोना महासाथीची दुसरी लाट आणि त्यावर मात करण्यासाठी स्थानिक स्तरावर लावण्यात आलेल्या लॉकडाऊन आणि अन्य निर्बंधांमुळे ७५ लाखांपेक्षा अधिक लोकांना आपली नोकरी गमवावी लागली आहे.
4 / 12
यामुळे देशातील बेरोजगारी दर चार महिन्याच्या सर्वोच्च म्हणजेच ८ टक्क्यांवर पोहोचला आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (CMIEE) नं सोमवारी याबाबतची माहिती दिली.
5 / 12
भविष्यात रोजगारच्या बाबतीत ही परिस्थिती आव्हानात्मक राहील. मार्चच्या तुलनेत एप्रिलमध्ये आम्ही ७५ लाख रोजगार गमावला, अशी माहिती सीएमआयईचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) महेश व्यास यांनी दिली.
6 / 12
यामुळे बेरोजगारीचं प्रमाण वाढलं आहे. केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार राष्ट्रीय बेरोजगारीचा दर ७.९७ टक्क्यांवर पोहोचला आहे.
7 / 12
शहरी भागात बेरोजगारीचे प्रमाण ९.७८ टक्के आहे. तर ग्रामीण भागात ते ७.१३ टक्के असल्याचं त्यांनी सांगितलं.
8 / 12
यापूर्वी मार्चमध्ये राष्ट्रीय बेरोजगारीचा दर ६.५० टक्के होता आणि ग्रामीण तसंच शहरी भागातही हा दर तुलनेने कमी होता.
9 / 12
कोरोना महासाथीच्या वाढत्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी अनेक राज्यांनी लॉकडाऊनसह अन्य निर्बंधही घातले आहेत.
10 / 12
याचा मोठ्या प्रमाणात परिणाम झाला असून त्यामुळे कर्मचाऱ्यांना नोकऱ्याही गमवाव्या लागल्या आहेत.
11 / 12
'कोरोनाची महासाथ पीकवर केव्हा जाईल याची माहिती नाही. परंतु रोजगाराच्या बाबतीत मोठी समस्या दिसून येऊ शकते.' असं व्यास म्हणाले.
12 / 12
सध्या स्थिती तेवढीही बिकट नाही, जितकी पहिल्या लॉकडाऊनच्या वेळी होती. त्यावेळी बेरोजगारीचा दर २४ टक्क्यांवर पोहोचला होता, असंही त्यांनी नमूद केलं.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतjobनोकरीUnemploymentबेरोजगारीEmployeeकर्मचारी