7th pay commission 17 percent salary hike for karnataka govt employees before holi
7th Pay Commission: मोदी सरकारकडून सरकारी कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट! कर्मचारी होणार मालामाल By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2023 4:48 PM1 / 87th Pay Commission: गेल्या काही महिन्यांपासून सरकारी कर्मचारी पगारवाढ आणि महागाई भत्त्याची वाट पाहत आहेत, आज अखेर कर्नाटकमधील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सरकारने आनंदाची बातमी दिली आहे. 2 / 8मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी होळीपूर्वी राज्यातील लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मोठी भेट दिली आहे. 'सरकारी कर्मचाऱ्यांना १७ टक्के पगारवाढ जाहीर केली आहे. ही वाढ १ एप्रिलपासून लागू होणार आहे, अशी घोषणा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केली आहे. 3 / 8'अतिरिक्त मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करून नवीन पेन्शन योजना, आर्थिक बाबी आणि इतर राज्यातील इतर समस्यांचा अभ्यास करून सविस्तर अहवाल सादर केला जाईल, असंही मुख्यमंत्री म्हणाले.4 / 8पगारवाढीसारख्या मागण्यांबाबत सरकारकडून आश्वासन मिळाल्यानंतर कर्नाटकातील सरकारी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप मागे घेतला आहे. याआधीही सरकार आणि कर्मचारी संघटना यांच्यात अनेक बैठका झाल्या, त्यात कोणताही निकाल लागला नाही.5 / 8सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीच्या मागणीसाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी बुधवारी बेंगळुरू येथील ब्रुहत बेंगळुरू महानगरपालिका परिसरात निदर्शने केली.6 / 8सातव्या वेतन आयोगाच्या अहवालाची अंमलबजावणी, जुनी पेन्शन योजना पुनर्संचयित करणे आणि किमान 40 टक्के फिटमेंट सुविधा सुरू करणे यासह कर्मचाऱ्यांनी कर्नाटक सरकारसमोर 3 प्रमुख मागण्या मांडल्या होत्या.7 / 8नवीन पेन्शन योजना रद्द करण्याच्या आणि OPS परत आणण्याच्या त्यांच्या मागणीवर, सरकारने सांगितले की अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समिती त्याच्या व्यवहार्यतेचा अभ्यास करेल.8 / 8केंद्र सरकारही केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये लवकरच वाढ करणार आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications