7th pay commission after union budget modi govt to hike dearness allowance 3 percent
अर्थसंकल्पानंतर सरकारी कर्मचारी होणार मालामाल! ९० हजार रुपयांनी वेतनात होणार वाढ By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2023 12:03 PM1 / 9२०२३-२४ या वर्षाचे अर्थसंकल्प काही दिवसातच जाहीर होणार आहे. या टर्ममधील मोदी सरकारचे हे बजेट शेवटचे असणार आहे, त्यामुळे या बजेटकडे सर्वसामान्य जनतेचे लक्ष लागले आहे. 2 / 9या बजेटमध्ये सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळू शकतो असं बोलले जात आहे. इंधन, गॅस दरांमधून सर्वसामान्यांना दिलासा मिळू शकतो.3 / 9काही अहवालानुसार, या बजेटमध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठं गिफ्ट मिळणार असल्याचे बोलले जात आहे.4 / 9केंद्रीय कर्मचाऱ्यांचे फिटमेंट फॅक्टर वाढवण्याची अपेक्षा आहे. पण केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या डीए वाढीची घोषणा मार्चमध्ये होणार आहे.5 / 9एक कोटी केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना या डीए वाढीचा लाभ मिळणार आहे.6 / 9मार्चमधील महागाई भत्त्याची घोषणा १ जानेवारीपासून लागू होईल. जानेवारीअखेरीस येणाऱ्या डिसेंबरच्या AICPI निर्देशांकाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होईल. यावेळी DA किती वाढणार आहे? जुलै 2022 मधील वाढीच्या आधारे केंद्रीय कर्मचाऱ्यांना 38% महागाई भत्ता मिळत आहे. आगामी काळात हा आकडा 41% पर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे.7 / 9या वर्षी डीएमध्ये किमान 3 टक्के वाढ निश्चित असल्याचे मानले जात आहे. कर्मचाऱ्यांसाठी ही मोठी दिलासादायक बातमी असेल. जर एखाद्या कर्मचाऱ्याचा मूळ पगार 25000 रुपये असेल, तर 3 टक्क्यांनुसार त्याचा पगार दरमहा 750 रुपयांनी वाढेल. त्यांचा एकूण पगार वार्षिक आधारावर 9000 रुपयांनी वाढेल.8 / 9कॅबिनेट सचिव स्तरावरील अधिकाऱ्यांच्या पगारात दरमहा 7,500 रुपयांनी म्हणजेच वार्षिक 90,000 रुपयांची वाढ अपेक्षित आहे.9 / 9कर्मचाऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी महागाई भत्ता दिला जातो. त्याची गणना कर्मचाऱ्याच्या मूळ वेतनाच्या आधारावर केली जाते. आणखी वाचा Subscribe to Notifications