7th pay commission da hike update central govt employees salary jumps 15k rupees
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! पगारात होणार १५,१४४ रुपयांची वाढ, वाढला महागाई भत्ता By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2023 3:59 PM1 / 9केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.आता वाढीव महागाई भत्त्याची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. 2 / 9सरकार लवकरच हे वाढीव पैसे कर्मचाऱ्यांच्या खात्यात वर्ग करणार आहे. एआयसीपीआयच्या आकडेवारीवरून हे स्पष्ट झाले आहे की, यावेळीही सरकार कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्क्यांनी वाढ करणार आहे. 3 / 9आतापासून कर्मचाऱ्यांना ४६ टक्के दराने महागाई भत्ता मिळणार आहे. 4 / 9महागाई भत्त्याची वाढ ही नेहमी मूळ पगारावर केली जाते. जर एखाद्या कर्मचाऱ्याचा मूळ पगार २०,००० रुपये असेल तर त्यावरच DA मोजला जाईल.5 / 9 -जर डीएमध्ये ४% वाढ झाली तर पगार दरमहा सुमारे ८००० रुपयांनी वाढेल. 6 / 9तुमच्या पागारात वाढ कशी होईल? -जर मूळ पगार बेसिक – ३१५५० रुपये असेल -नवीन महागाई भत्ता (DA) – ४६ टक्के – रुपये १४५१३/ महिना >> सध्याचा महागाई भत्ता (DA) – ४२% – रुपये १३२५१/महिना - ४ टक्के महागाई भत्ता वाढवल्यास - १२६२ रुपये अधिक मिळतील. -वार्षिक महागाई भत्ता – १५१४४ रुपये अधिक ४% वाढीवर उपलब्ध होतील -एकूण वार्षिक महागाई भत्ता – १,७४,१५६ रुपये असेल7 / 9७ व्या वेतन मॅट्रिक्सनुसार, लहान श्रेणीतील कर्मचाऱ्यांपासून अधिकारी श्रेणीपर्यंत सर्वांच्या पगारात बंपर वाढ होणार आहे.8 / 9सध्या जुलै महिन्यात वाढणाऱ्या महागाई भत्त्याचा आकडा निश्चित करण्यात आला आहे, मात्र अद्याप त्याची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात सरकारकडून याची घोषणा केली जाऊ शकते.9 / 9सप्टेंबरमध्येच मंत्रिमंडळाकडून महागाई भत्ता मंजूर केला जातो. यानंतर वित्त मंत्रालय अधिसूचित करते आणि त्यानंतर ते केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना दिले जाते. या वाढीव महागाई भत्त्याचा फरक, जो दोन महिने शिल्लक आहे, तो केंद्रीय कर्मचाऱ्यांना थकबाकीच्या स्वरूपात दिला जातो. आणखी वाचा Subscribe to Notifications