शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना सरकार देणार मोठं गिफ्ट? पगारात वाढ होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2021 9:32 AM

1 / 9
नवी दिल्ली : केंद्रीय कर्मचार्‍यांना लवकरच खूप चांगली बातमी मिळू शकेल. यामुळे कोरोना विषाणूच्या महामारीमुळे होणार्‍या आर्थिक अडचणींचा सामना करण्यासाठी केंद्रीय कर्मचाऱ्यांना मदत होऊ शकते.
2 / 9
दरम्यान, कोरोना संकटामुळे केंद्र सरकारने या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता कमी केला होता. मात्र, आता अशी आशा आहे की, जानेवारी 2021 ते जून 2021 पर्यंतचा महागाई भत्ता म्हणजेच डीएमध्ये (DA) वाढ केली जाऊ शकते.
3 / 9
रिपोर्ट्सनुसार, लवकरच केंद्रीय कर्मचार्‍यांना वाढीव पगार मिळणार आहेत. तसेच, पेन्शनधारकही काहीसा डीएबाबत दिलासा मिळू शकतो.
4 / 9
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर, सरकारने गेल्या वर्षी महत्त्वपूर्ण निर्णय घेत डीएचा आधीचा रेट (17 टक्के) जून 2021 पर्यंत लागू करण्याची घोषणा केली.
5 / 9
जुलै ते डिसेंबर 2020 या कालावधीत अतिरिक्त चार टक्के डीए अजूनही कर्मचाऱ्यांच्या मासिक पगारामध्ये जमा करण्यात आला नाही. हेच कारण आहे की, सध्याचा डीए दर 21 टक्के आहे. परंतु चार टक्के कमी मिळत आहे.
6 / 9
अशा परिस्थितीत सरकार कर्मचाऱ्यांना होळी सणाच्या आसपास डीएची भेट देऊ शकेल, अशी अपेक्षा कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांना आहे. सरकारच्या या घोषणेचा फायदा 50 लाख कर्मचारी आणि 61 लाख पेन्शनधारकांना होणार आहे.
7 / 9
ACPIच्या आकडेवारीनुसार नरेंद्र मोदी सरकार जानेवारी ते जून 2021 या कालावधीत चार टक्के डीएची घोषणा करू शकते. याचा अर्थ असा आहे की, डीए जाहीर झाल्यानंतर कर्मचाऱ्यांचा डीए मूळ मासिक पगारामध्ये (17 + 4 + 4) म्हणजेच एकूणच्या 25% पर्यंत वाढू शकतो.
8 / 9
सातव्या वेतन आयोगानुसार, डीए जाहीर होताच केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांचा प्रवास भत्ता (Travel Allowance -TA) आपोआप वाढेल.
9 / 9
अशा परिस्थितीत डीएच्या घोषणेनंतर केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांच्या मासिक वेतनात अनेक पटींनी वाढ होईल. केंद्र सरकारचे कर्मचारी आणि पेन्शनधारक आतुरतेने या बातमीची वाट पाहत आहेत.
टॅग्स :Employeeकर्मचारीbusinessव्यवसायMONEYपैसा