7th pay commission good news for government employees da hike calculation on basic pay
मोदी सरकार सरकारी कर्मचाऱ्यांना देणार मोठं गिफ्ट! कर्मचारी होणार मालामाल By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2023 9:55 AM1 / 9मोदी सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी देणार असून, कर्मचाऱ्यांना लवकरच महागाई भत्ता मिळणार आहे. १ मार्च रोजी कॅटीनेटची बैठक होणार आहे. या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता संदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे.2 / 9यावेळी महागाई भत्त्यात ४ टक्क्यांनी वाढ करुन यात ४२ टक्के होऊ शकतो. कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याच्या पगारात वाढीव डीए आणि थकबाकी दोन्हीचा लाभ मिळणार आहे.3 / 9केंद्रीय कर्मचाऱ्यांना पगारासह जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन्ही महिन्याचा महागाई भत्ता मिळणार आहे. AICPI च्या आकडेवारीवरून हे स्पष्ट झाले आहे की, यावेळी महागाई भत्ता ४ टक्क्यांनी वाढणार आहे.4 / 9जानेवारी २०२३ पासून डीए ४२ टक्क्यांपर्यंत वाढेल. याचा फायदा ५२ लाख केंद्रीय कर्मचारी आणि ६० लाख पेन्शनधारकांना होणार आहे.5 / 9७ व्या वेतन आयोगाअंतर्गत महागाई भत्ता मिळणारा सध्या ३८ टक्के आहे, यात यावेळी वाढून ४२ टक्के होईल, असं नॅशनल कौन्सिल ऑफ जेसीएमचे सचिव शिव गोपाल मिश्रा यांनी सांगितली. 6 / 9७व्या वेतन आयोगाअंतर्गत कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता आणि पेन्शनधारकांसाठी महागाई भत्त्याची गणना मूळ वेतनाच्या आधारे केली जाते. जर एखाद्याचा मूळ पगार २५,००० रुपये असेल, तर त्यांना २५,००० रुपयांवर ४२% DA मिळेल. म्हणजेच २५,००० चा ४२ टक्के DA १०,५०० रुपये झाला. या आधारे इतर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीएही वाढणार आहे.7 / 9बेसिक सॅलरी - १८,००० रुपये यात ४२ टक्क्यांनी महागाई भत्ता वाढला तर ७५६० रुपये वाढीव मिळणार आहेत. जर बेसिक सॅलरी २५,००० रुपये असेल तर यात ४२ टक्के महागाई भत्ता वाढला तर यात १०,५०० रुपयांची वाढ होणार आहे. 8 / 9७ व्या वेतन आयोगाअंतर्गत, जर तुमचा मुळ पगार १८,००० रुपये असेल तर तुम्हाला ३८ टक्के मिळेल. ६८४० महागाई भत्ता उपलब्ध आहे. पण महागाई भत्ता ४२ टक्के असेल तर तो ७५६० रुपये होईल. 9 / 9याप्रमाणे, जर तुमचा मुळ पगार २५,००० रुपये असेल, तर सध्या तुम्हाला ९,५०० रुपये महागाई भत्ता मिळेल. पण डीए ४२ टक्के असल्याने तो १०,५०० रुपये होईल. आणखी वाचा Subscribe to Notifications