शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

7th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांना मोदी सरकार लवकरच देणार गिफ्ट! पगारात होणार ८,००० रुपयांची वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2023 12:03 PM

1 / 10
मोदी सरकार लवकरच केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करणार आहे, मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कर्मचाऱ्यांना ४ टक्क्यांनी महागाई भत्त्यात वाढ केली होती.
2 / 10
आता काही दिवसातच मोदी सरकार कर्मचाऱ्यांना गिफ्ट देण्याच्या तयारीत आहे. या निर्णयानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगावात मोठी वाढ होणार आहे.
3 / 10
सरकार काही दिवसातच कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात आणखी ४ टक्क्यांनी वाढ करणार असल्याचे बोलले जात आहे. ही वाढ केल्यानंतर कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ४६ टक्क्यांपर्यंत होणार आहे.
4 / 10
सरकारने मार्च २०२३ मध्ये ४ टक्के DA वाढीची घोषणा केली आहे. यानंतर महागाई भत्ता ४२ टक्के झाला आहे. ही वाढ सरकारने १ जानेवारीपासून लागू केली आहे.
5 / 10
आता पुढील डीए १ जुलैपासून लागू होणार आहे. दुसऱ्या सहामाहीसाठी महागाई भत्ता आणि महागाई मदत चार टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा आहे. सध्या डीए ४२ टक्के आहे. १ जुलैपासून लागू होणारा डीए ४६ टक्क्यांपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे.
6 / 10
यावेळी ऑगस्टमध्ये घोषणा होण्याची शक्यता आहे दुसऱ्या सहामाहीसाठी म्हणजेच जुलै ते डिसेंबर २०२३ साठी DA मधील वाढ सरकारने जाहीर केली आहे.
7 / 10
प्रत्येक वेळी दुसऱ्या सहामाहीचा DA सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये जाहीर केला जातो. मात्र यावेळी वाढीव डीए ऑगस्टमध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे.
8 / 10
वर्षाच्या पहिल्या सहामाहीत ४ टक्के वाढ आधीच जाहीर करण्यात आली आहे. चलनवाढीचा दर पाहता केंद्र सरकारकडून केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये वाढ करण्यात आली आहे. महागाई जास्त असेल तर डीएमध्ये वाढही जास्त असेल.
9 / 10
दुसऱ्या सहामाहीत केंद्रीय कर्मचार्‍यांचा डीए ४६ टक्क्यांपर्यंत वाढवला, तर पगारही त्यानुसार वाढेल. जर एखाद्या केंद्रीय कर्मचाऱ्याला सध्या मूळ वेतन १८,००० रुपये आहे आणि त्याला सध्या ४२ टक्के दराने ७५६० रुपये DA मिळतो.
10 / 10
जर त्याचा डीए ४६ टक्के झाला तर कर्मचाऱ्याचा महागाई भत्ता ८,२८० रुपये होईल. अशाप्रकारे, दरमहा ७२० रुपयांची वाढ होईल. याबाबत सरकारकडून कोणतेही अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले नाही.
टॅग्स :GovernmentसरकारEmployeeकर्मचारी