शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

7th Pay Commission: खूशखबर! दसऱ्यापूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांचा वाढणार HRA; पाहा, पगारात किती होणार वाढ?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2021 7:38 PM

1 / 8
नवी दिल्ली : केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार (Modi Government) सणासुदीच्या काळात सरकारी कर्मचाऱ्यांना (Government Employees) चांगली बातमी देणार आहे. सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्त्यात (HRA) 3 टक्क्यांनी वाढ करणार आहे.
2 / 8
सरकारने दीड वर्षांपासून रोखलेली महागाई भत्त्याची थकबाकीही दिलेली नाही. जुलै 2021 पासून महागाई भत्ता (डीए) 17 टक्क्यांवरून 28 टक्के करण्यात आला. आता सरकारने ऑगस्ट महिन्यासाठी HRA 3 टक्के वाढवून मूळ वेतनाच्या 25 टक्के केली.
3 / 8
सरकारी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनाच्या (Basic Salary) आधारावर घरभाडे भत्ता आणि डीए वाढवण्यात यावा, असे आदेश केंद्र सरकारने जारी केले आहेत. नियमानुसार, HRA मध्ये वाढ करण्यात आली, कारण DA 25 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. अशा परिस्थितीत केंद्राने एचआरए वाढवून 27 टक्के करण्याचा निर्णय घेतला.
4 / 8
केंद्र सरकारच्या खर्च विभागाने (Expenditure Department) 7 जुलै 2017 रोजी जारी केलेल्या आदेशात म्हटले होते की, जेव्हा डीए 25 टक्क्यांपेक्षा जास्त असेल, तेव्हा एचआरए देखील बदलले जाईल. आता 1 जुलैपासून महागाई भत्ता 28 टक्के झाला, त्यामुळे एचआरएदेखील वाढवणे आवश्यक आहे.
5 / 8
कर्मचाऱ्याच्या विद्यमान शहराच्या श्रेणीनुसार एचआरए 27 टक्के, 18 टक्के आणि 9 टक्के दिले जात आहे. ही दरवाढ DA सह 1 जुलै 2021 पासून लागू झाली. HRA ची श्रेणी X, Y आणि Z वर्गाच्या शहरांनुसार आहे.
6 / 8
दुसऱ्या शब्दांत, जर एखादा केंद्रीय कर्मचारी X श्रेणीच्या शहरात असेल, तर त्याला आता दरमहा 5,400 रुपयांपेक्षा जास्त HRA मिळेल. यानंतर Y श्रेणीच्या कर्मचाऱ्यांना दरमहा 3,600 रुपये आणि Z वर्ग कर्मचाऱ्यांना दरमहा 1,800 रुपये मिळतील.
7 / 8
7 व्या वेतन आयोगानुसार, केंद्रीय कर्मचाऱ्यांचे किमान मूलभूत वेतन 18,000 रुपये आहे. त्याच वेळी, खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन 15,000 रुपयांपासून सुरू होते.
8 / 8
केंद्रीय कर्मचाऱ्यांना जून 2021 पर्यंत 17 टक्के दराने 18,000 रुपयांच्या मूळ वेतनावर 3,060 रुपये डीए मिळत होता. जुलै 2021 पासून केंद्रीय कर्मचाऱ्यांना 28 टक्के डीए दराने 5,040 रुपये दरमहा मिळतील. आता कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन 1,980 रुपयांनी वाढले.
टॅग्स :Employeeकर्मचारीMONEYपैसा