7th pay commission modi govt likely to announce da hike today
7th Pay Commission : मोदी सरकार कर्मचाऱ्यांना देणार खुशखबर! सातव्या वेतन आयोगानुसार २७,३१२ रुपयांची वाढ होणार By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2023 11:29 AM1 / 87th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांना मोदी सरकार आज खुशखबर देऊ शकते. केंद्रीय कर्मचाऱ्यांना पेन्शनसारखीच डीए वाढचीही सरकारी कर्मचारी मागणी करत आहेत. आज सरकारी कर्मचाऱ्यांना या संदर्भात आनंदाची बातमी मिळू शकते. 2 / 8यावेळी सरकारी कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये ४ टक्क्यांनी वाढ होऊ शकते. यानंतर डीएमध्ये वाढ होऊन ४२ टक्के होणार आहे. 3 / 8मागच्या वर्षी म्हणजेच २८ सप्टेंबर २०२२ मध्ये डीएमध्ये वाढ झाली होती. यावेळी डीए ३८ टक्के झाला होता. हा डीए १ जुलै २०२२ पासून लागू करण्यात आला होता. 4 / 8आज केंद्राची या संदर्भात बैठक होणार आहे. त्यामुळे डीए वाढीला मंजुरी मिळेल असं बोलले जात आहे. यानंतर अर्थ मंत्रालयाकडून अधिसूचना जारी केली जाईल. नुकतीच केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक १४ मार्च रोजी होणार होती. पण काही कारणास्तव ती बैठक आज १७ मार्च रोजी होत आहे.5 / 8त्यामुळे शुक्रवारी होणाऱ्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत महागाई भत्ता वाढीचा निर्णय होणार आहे. कर्मचाऱ्यांना मार्च वेतन आणि पेन्शनमध्ये वाढीव डीए आणि डीएचा लाभ मिळेल. 6 / 8यात दोन महिन्यांचा डीएही जोडला जाणार आहे. ज्या कर्मचाऱ्याचा मूळ पगार १८००० रुपये आहे, त्यांच्या पगारात दरमहा ७२० रुपयांची वाढ होईल. यात वार्षिक आधारावर ८६४० रुपयांची वाढ झाली आहे.7 / 8याशिवाय ५६९०० रुपये मूळ वेतन असलेल्यांना दरमहा २२७६ रुपयांचा लाभ मिळणार आहे. 8 / 8यामुळे वार्षिक आधारावर पगारात २७,३१२ रुपयांनी वाढ होईल. लाखो केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना डीए आणि डीआर वाढीचा फायदा होईल. आणखी वाचा Subscribe to Notifications