'The' 8 big giants left their company, Steve jobs
'या' 8 दग्गजांनी आपल्याच कंपनीला सोडलं By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2019 3:42 PM1 / 8चीनच्या अलिबाबा या ई-कॉमर्स कंपनीचे संस्थापक आणि चेअरमन जॅक मा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. शिक्षण क्षेत्रात स्वत:ला झोकून देण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला होता. 2 / 8मायक्रोसॉफ्ट कंपनीचे सह-संस्थापक बिल गेट्स यांनीही कंपनीच्या सीईओ पदाचा राजीनामा दिला होता. 3 / 8ब्लॅकबेरी बनविणाऱ्या रिसर्च अँड मोशन कंपनीचे चेअरमन माइक लजारिडीस यांनी 2013 मध्ये निवृत्ती घेतली होती. 4 / 8सोशल गेमिंग कंपनी जिंगाचे संस्थापक मार्क पिंकस यांनी 2014 मध्ये आपल्या कंपनीपासून स्वत:ला वेगळं केलं. केवळ नॉन एक्झिक्युटीव्ह चेअरमनपदी ते राहिले. 5 / 8डोर्सीच्या मॅनेजमेंट स्टाईलने नाराज होऊन ट्विटरच्या बोर्ड मंडळाने मायक्रो ब्लॉगिंग साईटचे संस्थापक जैस डोर्सी यांना पदावरुन पायउतार होण्याचे सांगितले होते.6 / 8 सन 2014 मध्ये मोझिला कंपनीच्या सीईओ पदावरुन इच यांनी राजीनामा दिला होता. 7 / 8उबर या कॅबसेवा देणाऱ्या कंपनीचे प्रमुख ट्राविस कालानिक यांनी कंपनीतील वादामुळे 2017 मध्ये आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. 8 / 8सन 1985 मध्ये अॅपल कंपनीचे सह-संस्थापक स्टीव्ह जॉब्स यांना कंपनीतील वादामुळे सीईओ पदावरुन हटविण्यात आले होते. आणखी वाचा Subscribe to Notifications